फोन टिकला पण ब्लॅक बॉक्स खराब झाला! एजन्सीचं हे स्टेटमेंट हास्यास्पद – रोहित पवार
रोहित पवारांनी अजित पवारांच्या विमान अपघाताच्या तपासावर संशय व्यक्त केला आहे. फोन टिकला पण ब्लॅक बॉक्स खराब झाला या एजन्सीच्या विधानाला त्यांनी डाऊटफुल आणि हास्यास्पद म्हटले आहे. डीजीसीएच्या नियमांचे उल्लंघन करून विमानाची नोंदणी झाल्याचा आरोप करत, चौकशी पथकाच्या क्षमतेवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी अजित पवारांच्या विमान अपघाताच्या चौकशीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. फोन टिकला पण ब्लॅक बॉक्स खराब झाला असे तपास यंत्रणेने केलेले विधान डाऊटफुल आणि हास्यास्पद असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
पवार यांनी डीजीसीए (नागरिक उड्डाण महासंचालनालय) च्या भूमिकेवरही शंका व्यक्त केली आहे. परदेशातून आणलेल्या जुन्या Learjet विमानाची नोंदणी भारतीय नियमांचे उल्लंघन करून झाली असल्याचा आरोप त्यांनी केला. नियमांनुसार दोन तासांचा कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर (CVR) आवश्यक असताना, या विमानात केवळ 30 मिनिटांचा CVR होता. असे असतानाही त्याची नोंदणी झाली असल्यास, यात डीजीसीएच्या काही अधिकाऱ्यांचा सहभाग असू शकतो, असे रोहित पवारांनी नमूद केले.
जो देश शक्तिशाली असतो, तोच जगात शांतता निर्माण करू शकतो - CM फडणवीस
डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एकुलता एक मुलगा गमावला, हतबल आईला....
आदिती तटकरेंचे सचिव महिलांसोबत अर्वाच्च भाषेत... रोहिणी खडसेंचा खळबळजन
आम्ही घरी जाऊन पाठिंबा दिला म्हणून तुम्ही मुख्यमंत्री बनलात...
