AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माझे आजोबा मोठे आहेत, काका मोठे होते अन् मी...; ट्रोलर्सना रोहित पवारांचं सडेतोड उत्तर

माझे आजोबा मोठे आहेत, काका मोठे होते अन् मी…; ट्रोलर्सना रोहित पवारांचं सडेतोड उत्तर

| Updated on: Feb 18, 2026 | 1:02 PM
Share

अजितदादांच्या अपघाताच्या घटनेच्या चौकशीची मागणी करत असताना भाजप ट्रोलर्सकडून होणाऱ्या ट्रोलिंगला रोहित पवार यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. माझे आजोबा शरद पवार मोठे आहेत, काका अजित पवार मोठे होते आणि मी या महाराष्ट्राचा स्वाभिमानी नागरिक आहे, असे सांगत त्यांनी तपास यंत्रणांना निष्पक्षतेचे आवाहन केले.

रोहित पवार यांनी आपल्यावर टीका करणाऱ्या ट्रोलर्सना आणि भाजपच्या काही नेत्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. अजितदादांच्या अपघाताच्या घटनेच्या चौकशीची मागणी करत असतानाच आपल्याला भाजपच्या ट्रोलर्सकडून लक्ष्य केले जात असल्याचे रोहित पवार यांनी म्हटले. यात समित ठक्कर नावाच्या एका मोठ्या ट्रोलरचा त्यांनी विशेष उल्लेख केला. ज्यांनी कथितरित्या अपघाताच्या दोन दिवस आधी महाराष्ट्रात भूकंपाची शक्यता वर्तवणारे ट्वीट केले होते.

पवार यांनी तपास यंत्रणांना कोणत्याही दबावाखाली न येता निष्पक्षपणे काम करण्याचे आवाहन केले. त्यांच्या मते, मोठे गुंतवणूकदार किंवा राजकीय वजन वापरून तपास थांबवण्याचा प्रयत्न केला जात आहे. “आमचे आजोबा शरद पवार मोठे आहेत, आमचे काका अजित पवार मोठे होते आणि मी रोहित पवार या महाराष्ट्राचा स्वाभिमानी नागरिक आहे,” असे ठणकावून सांगत त्यांनी आपण या घटनेच्या तळापर्यंत जाणार असल्याचे स्पष्ट केले.

Published on: Feb 18, 2026 01:02 PM