AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 WC 2026: टीम इंडियाने नेदरलँडला पराभूत केलं पण 7 गोलंदाज वापरले, सूर्यकुमार म्हणाला..

टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या साखळी फेरीच्या चौथ्या सामन्यात भारताने नेदरलँडचा 17 धावांनी पराभव केला. या सामन्यात भारताने 199 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. पण नेदरलँडला 176 धावांपर्यंत मजल मारता आली.

T20 WC 2026: टीम इंडियाने नेदरलँडला पराभूत केलं पण 7 गोलंदाज वापरले, सूर्यकुमार म्हणाला..
T20 WC 2026: टीम इंडियाने नेदरलँडला पराभूत केलं पण 7 गोलंदाज वापरले, सूर्यकुमार म्हणाला..Image Credit source: BCCI Twitter
| Updated on: Feb 18, 2026 | 11:08 PM
Share

टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या साखळी फेरीतील चारही सामने भारताने आपल्या झोळीत टाकले. या स्पर्धेत भारतीय फलंदाज आणि गोलंदाजांची कसोटी लागली. पण भारताने विजयी घोडदौड कायम ठेवली. भारताने पहिल्या सामन्यात अमेरिकेला पराभूत केलं. या सामन्यात भारतीय फलंदाजीचा कस लागला होता. पण भारताने बाजी मारली. नामिबियाविरूद्धचा दुसरा सामना भारताने सहज जिंकला. तर पाकिस्तानला कोलंबोत जाऊन पराभवाची धूळ चारली. या विजयासह भारताने सुपर 8 फेरीत जागा पक्की केली होती. त्यामुळे नेदरलँडविरुद्धचा सामना औपचारिक होता. पण नेदरलँडने हा विजय काही सहज दिला नाही. शिवम दुबेची बॅट चालली म्हणून 193 धावांपर्यंत मजल मारता आली. नाही तर गणित खूपच कठीण झालं असतं. भारताने विजयासाठी दिलेल्या धावांचा पाठलाग करताना नेदरलँडने 176 धावांपर्यंत मजल मारली आणि सामना 17 धावांनी गमावला. या सामन्यात भारताने एकूण 7 गोलंदाज वापरले. इतके गोलंदाज वापरल्याने समालोचकांनही आश्चर्य व्यक्त केलं. हा काही सराव सामना नाही असंही अनेकांनी मत नोंदवलं.  यावर सूर्यकुमार यादवने आपलं मत व्यक्त केलं.

सूर्यकुमार यादव म्हणाला की, ‘कधीकधी गोलंदाजीचे पर्याय असणे एक चांगले डोकेदुखी असते. माझ्याकडे मध्यभागी किती गोलंदाज आहेत? अभिषेक शर्मा आहे, नंतर हार्दिक, दुबे. तर माझ्याकडे मध्यभागी बरेच पर्याय आहेत. ते काहीही असो, दिलेल्या दिवशी, विकेटची मागणी काहीही असो, मला वाटते की ते काही षटकांमध्ये मदत करू शकतात.’ अर्शदीप सिंगने 3, जसप्रीत बुमराहने 3, वॉशिंग्टन सुंदरने 4, वरूण चक्रवर्तीने 3, हार्दिक पांड्याने 3, अभिषेक शर्माने 1 आणि शिवम दुबेने 3 षटकं टाकली.

फलंदाजाच्या फॉर्मावर सूर्यकुमार यादव म्हणाला की, ‘ज्या पद्धतीने पुढे जात आहेत त्यावर मी खूप आनंदी आहे. योगदान जवळजवळ प्रत्येक फलंदाजाकडून येत आहे. मला तेच हवे आहे, त्या छोट्या, छोट्या भागीदारी. जेव्हा खेळ थोडासा कठीण असतो, तेव्हा एक किंवा दोन फलंदाजांचा दिवस चांगला जाऊ शकतो, परंतु नंतर चांगली धावसंख्या गाठण्यासाठी आपल्याला सर्व फलंदाजांच्या पाठिंब्याची आवश्यकता असते.’

सूर्यकुमार यादवने काही क्षेत्रात काम करण्याची गरज असल्याचं सांगितलं. ‘तुम्ही असे म्हणू शकत नाही की आम्ही जवळजवळ सर्व बॉक्स टिक केले आहेत, पण तुम्ही जिंकलात तरी तुम्ही त्यातून काहीतरी शिकता. आणि आम्ही काही क्षेत्रे शिकलो आहोत. आम्ही रूममध्ये परत जाऊ, उद्या एक दिवस सुट्टी घेऊ आणि त्यावर गप्पा मारू.’, असं सूर्यकुमार म्हणाला.

Follow Us
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा