AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हा नुसता माज नाही तर… अमेरिकेतला तिरंग्याचा तो व्हिडीओ व्हायरल, भारतीय लोकांमध्ये तीव्र संताप, थेट..

न्यूयॉर्कमधील एक थक्क करणारा व्हिडीओ व्हायरल झाला. हा व्हिडीओ पाहून भारतीय लोक संताप व्यक्त करताना दिसत आहेत. भारताच्या ध्वजासोबत असे काही करण्यात आले की, ज्यानंतर प्रचंड भारतीय लोक संतापले आहेत.

हा नुसता माज नाही तर... अमेरिकेतला तिरंग्याचा तो व्हिडीओ व्हायरल, भारतीय लोकांमध्ये तीव्र संताप, थेट..
New York
| Updated on: Aug 31, 2026 | 9:02 AM
Share

न्यूयॉर्कमधील व्हिडीओ पाहून तुमच्या डोक्यात राग गेल्याशिवाय राहणार नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्या एका कार्यक्रमाच्या स्थळाजवळ निदर्शकांनी गोंधल घातला. एखाद्या व्यक्तीचा विरोध करणे ठीक आहे, तसा अधिकारही आहे. पण चक्क भारतीय राष्ट्रध्वजाचा अवमान करण्यात आला. ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. फक्त हेच नाही तर अजून काही लोक भारतीय राष्ट्रध्वजाचा अवमान करत आहेत. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर भारतीय लोकांमध्ये प्रचंड संताप बघायला मिळतोय. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी तीव्र आक्षेप नोंदवला. सोशल मीडियावरील एका पोस्टद्वारे यावर कडक शब्दांत टीका केली.

किरेन रिजिजू यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, लक्ष देऊन ऐका… आमच्या ध्वजाचा आणि माझ्या देशाचा अपमान करू नका… तुम्हाला याची मोठी किंमत मोजावी लागेल…  यादरम्यान त्यांनी न्यूयॉर्कमधील व्हिडीओही शेअर केला.  न्यूयॉर्कमधील ‘मॅडिसन स्क्वेअर गार्डनबाहेर एक निदर्शक भारतीय ध्वजाचा अनादर करताना दिसत आहे, तर इतर लोक खलिस्तानच्या समर्थनार्थ घोषणा देत आहेत.

खलिस्तानानी समर्थकांकडून ही निर्देशने केली जात होती. काही लोक उपस्थित दिसत आहेत. खलिस्तानचे झेंडेही त्यांच्या हातात दिसत आहेत. मात्र, भारताविरोधात घोषणाबाजी करत त्यांच्याकडून भारतीय ध्वजाचा अपमान केला जात होता. मॅडिसन स्क्वेअर गार्डनमधील इन्फोसिस थिएटर येथे भारतीय अमेरिकन समुदायातील 6000 हून अधिक सदस्य आणि विविध धर्मांच्या नेत्यांना संबोधित करताना भागवत यांनी विविधतेचा स्वीकार करण्याचे आवाहन केले.

खलिस्तानी समर्थक ही गेल्या काही दिवसांपासून भारताची डोकेदुखी ठरली आहे. त्यातच आता विदेशातही त्यांच्याकडून निर्देशने केली जात आहेत. भारत सरकारकडून खलिस्तानी विरोधात कडक भूमिका घेतली जात आहे. त्यातच आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. एक भारतीय म्हणून प्रत्येकजण हा व्हिडीओ पाहिल्यानंतर संताप व्यक्त करताना दिसत आहे. या व्हिडीओवर कमेंट करत अनेकजण राग व्यक्त करताना दिसत आहेत. त्यातच नरेंद्र मोदी यांच्या मंत्र्याने आता थेट इशाराच या व्हायरल व्हिडीओनंतर दिला.

Follow Us
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा