आपल्याच देशात मंदिर-मशिदीचा मुद्दा का उचलून धरतायत, असा सल्ला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपला दिला आहे. वाराणसी येथील ज्ञानवापी मशीदीसारख्या प्रत्येक धार्मिक आणि ऐतिहासिक जागांचं उत्खनन करुन तणाव वाढवायचा, दंगांची स्थिती निर्माण करून निवडणूक जिंकायच्या, हाच भाजपच्या सध्याच्या कारवायांमागे हेतू आहे, असा आरोप संजय �
स्वराज्य पक्षाचे नेते संभाजी छत्रपती यांनी राज्यसभा निवडणुकीत अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आहे. संभाजी छत्रपती यांना राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिला आहे. तर शिवसेनेने पाठिंबा हवा असेल तर शिवसेनेत या अशी अटच घातली आहे. संभाजी छत्रपतींना आम्ही खूप मदत केली. त्यांच्या प्रत्येक भूमिकेला समर्थन दिला. पण राज्यसभेच्या जागे
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस नवी दिल्लीत म्हणाले, संजय राऊत हे रोजच टीका करतात. ते महत्वाचे माणूस नाहीत. संजय राऊत हे काही महत्त्वाचे आहेत का. तुमच्याकडं स्वतःचे प्रश्न असतील, तर मला विचारा. संजय राऊतांच्या प्रश्नांवर मी उत्तर का देऊ ते कोण आहेत एवढे मोठे, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी मीडियालाच केला. संभाजीराजेंवर देवें
मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर करण्यात आला आहे. मुंबई सत्र न्यायालयानं हा जामीन मंजूर केला आहे. अटकपूर्व जामीन दिल्यानंतर आता संदीप देशपांडे यांच्यासह संतोष धुरी यांना पोलीस चौकशीला सहकार्य करावं लागणार आहे. संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना मुंबई सत्र न्यालायानं मोठा दिलासा दिल
हार्दिक पटेल यांनी काँग्रेसच्या पदाचा आणि सक्रिय सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. ऐन गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच हार्दिक पटेल यांनी राजीनामा दिल्याने गुजरात काँग्रेसमध्ये एकच खळबळ उडाली आहे. हार्दिक पटेल यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना अत्यंत खरमरीत पत्रं लिहिलं आहे. या पत्रातून त्यांनी काँग्रेसच्�
ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घ्या, असं सांगणाऱ्या सुप्रीम कोर्टानं महत्त्वाचा निर्णय दिला आहे. सुप्रीम कोर्टानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी ओबीसी आरक्षणाला हिरवा कंदील दिलाय. त्यामुळे आता मध्य प्रदेश सरकारला मोठा दिलासा मिळालाय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पड�
सरकारी वकील घरत म्हणाले, आज कोर्टामध्ये राणा दाम्पत्याला मागच्या तारखेला नोटीस देऊन हजर राहायला सांगितलं होतं. पण खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा आज कोर्टात हजर झाले नाही. त्यांच्या वतीनं त्यांचे वकील कोर्टात हजर होते. घरत यांनी सांगितलं की, मी कोर्टात आल्यानंतर मला कळलं की आम्हाला नोटीसची कॉपीच दिलेली नाही.
एकीकडे बालगंधर्व चौकात राष्ट्रवादीतर्फे भाजपाविरोधात आंदोलन करण्यात येत आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीविरोधात अलका चौकात भाजपा आंदोलन करत आहे. राष्ट्रवादीच्या गुंडगिरीचा निषेध म्हणून हे आंदोलन करत असल्याचे भाजपातर्फे सांगण्यात आले आहे. दरम्यान, या आंदोलनाच्या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. भारती�
ज्ञानवापी मशिदीचा रिपोर्ट आज कोर्टात सादर होण्याची शक्यता कमी आहे. आमचा रिपोर्ट 50 टक्के पूर्ण आहे, अशी माहिती असिस्टंट कोर्ट कमिशनर अजय प्रताप सिंह यांनी सांगितलं. रिपोर्ट पूर्ण तयार नाही, त्यामुळे कोर्टात आज रिपोर्ट सादर होणार नाही. आम्ही कोर्टात अर्ज सादर करून वेळ मागून घेणार आहोत. आम्हाला रिपोर्ट तयार करण्यासाठी अजून दोन
अयोध्या दौऱ्याला जाण्यापूर्वी पदाधिकाऱ्यांच्या सोबत संवाद साधण्यासाठी तसेच अयोध्या दौऱ्यात सहभागी होण्यासाठी कार्यकर्त्याच्या नाव नोंदणी मोहिमेचा उदघाटन समारंभासाठी राज ठाकरे पुण्यात येणार आहेत. त्यांच्या या दौऱ्याची जोरदार तयारी पुण्यातील मनसे पदाधिकाऱ्यांच्याकडून करण्यात आली आहे अयोध्येच्या दौऱ्यापूर्वी राज ठ