AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यात तरुणांच्या संशयास्पद हालचाली, पोलिसांनी ताब्यात घेताच धक्कादायक खुलासा, थेट…

Pune News : पुणे पोलिसांनी दोन तरुणांना ताब्यात घेतले. पोलिस गस्तीवर असताना संशयास्पद हालचाली पोलिसांना दिसून आल्या. त्यांनी लगेचच या दोघांना ताब्यात घेतले. चाैकशीदरम्यान हैराण करणारी माहिती पुढे आली.

पुण्यात तरुणांच्या संशयास्पद हालचाली, पोलिसांनी ताब्यात घेताच धक्कादायक खुलासा, थेट...
Pune Police
| Updated on: Feb 18, 2026 | 7:49 AM
Share

पुण्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. पोलिस गस्तीवर असताना त्यांना दोन तरुणांच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. या तरुणांवर पोलिसांनी लक्ष ठेवले आणि त्यानंतर जे काही पुढे आले ते हैराण करणारे होते. या दोन तरुणांनी तब्बल 10 दुचाकी चोरल्या होत्या. या दुचाकी त्यांनी फक्त आणि फक्त मोज मजा करण्यासाठी चोरल्या. या दुचाकीचा वापर ते नशा करायला जाण्यासाठी करत. हेच नाही तर एका विशिष्ट कंपनीच्याच दुचाकी हे चोर चोरी करत. त्यांना हव्या त्याच कंपनीच्या दुचाकीवर लक्ष ठेवत आणि योग्य संधी मिळताच त्याची चोरी करत. या दोन तरुणांना हा धंदा मागील काही महिन्यांपासून सुरू होता. अखेर पोलिसांनी त्यांना फक्त त्यांच्या हालचालीवरून ताब्यात घेतले आणि मोठा खुलासा झाला. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने यांना ताब्यात घेतले.

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांना 2 तरुण एका दुचाकीवर बसले असून त्यांच्या हालचाली संशयास्पद असल्याचे दिसून आले. यानंतर त्यांनी या तरुणांकडे चौकशी केली असता त्यांच्याकडे असलेली ही दुचाकी चोरीची असल्याचे पुढे आले. अधिक चाैकशी केली असता संपूर्ण प्रकार पोलिसांच्या पुढे आला. पवन तानाजी माने (वय 22) आणि प्रतिक शिवाजी अस्वरे (वय 20) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

या प्रकरणी आणखी 2 जणांचा शोध सुरू आहे. हडपसर, दिघी, चंदननगर पोलिस ठाण्यात या आरोपींच्या विरोधात याआधी चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने 2 तरुणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून तब्बल 10 चोरीच्या दुचाकी ताब्यात घेतल्या आहेत. विशेष म्हणजे या 10 पैकी काही गाड्या यामाहा कंपनीच्या आहेत. पोलिसांनी या दोघांकडे चौकशी केली.

त्या दोघांसोबत आणखी दोघं जणं मिळून फक्त यामाहा कंपनीच्या गाड्या चोरी करत असल्याची कबुली दिली. यामाहा कंपनीच्या दुचाकी आता बाजारात मिळत नसल्याने ते हडपसर, चंदननगर भागात यामाहा कंपनीच्या दुचाकींवर लक्ष ठेवून त्या चोरी करत असे. तसेच यातील काही तरुण या दुचाकींचा वापर नशा करायला जाण्यासाठी सुद्धा वापरत होते. पोलिसांकडून या प्रकरणात अधिक तपास केला जात आहे.

Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...