AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हे चोरालाच पोलिसाचे काम दिल्यासारखे! रोहित पवारांची खोचक टीका

हे चोरालाच पोलिसाचे काम दिल्यासारखे! रोहित पवारांची खोचक टीका

| Updated on: Feb 18, 2026 | 12:06 PM
Share

आमदार रोहित पवारांनी एका लियरजेट विमान अपघाताच्या तपासावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. विमानाची बेकायदेशीर नोंदणी, डीजीसीएच्या नियमांचे उल्लंघन आणि तपास समितीच्या निष्पक्षतेवर त्यांनी संशय व्यक्त केला. अपघातामागील सूत्रधारांना वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत, योग्य आणि वेळेत अहवाल सादर करण्याची मागणी त्यांनी केली.

आमदार रोहित पवार यांनी नुकत्याच झालेल्या अजित पवारांच्या विमान अपघाताच्या तपासावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांच्या मते, अपघातग्रस्त लियरजेट विमान नियमानुसार भारतात नोंदणीकृत होऊ शकत नाही, तरीही ते बेकायदेशीरपणे नोंदवले गेले आहे. डीजीसीएच्या काही अधिकाऱ्यांच्या मदतीने हे घडले असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

पवारांनी तपासातील त्रुटींवर बोट ठेवले. विमानाच्या ब्लॅक बॉक्समधील कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर (CVR) केवळ 30 मिनिटांचे रेकॉर्डिंग करतो, तर डीजीसीएच्या नियमांनुसार ते दोन तासांचे असणे बंधनकारक आहे. असे असतानाही हे विमान कसे नोंदवले गेले, असा त्यांचा सवाल आहे. अपघातानंतर चार दिवसांनी तपास समितीची स्थापना करण्यात आली, यावरही त्यांनी आक्षेप घेतला. तपास समितीमध्ये डीजीसीएचेच अधिकारी असल्याने, चोरालाच पोलिसाचे काम दिल्यासारखे आहे, असे पवार म्हणाले. व्हीएसआर कंपनी किंवा अपघातामागील व्यक्तींना वाचवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला.

Published on: Feb 18, 2026 12:06 PM