Maharashtra Political News LIVE : भिवंडीत भाजपने महापौर पदासाठी स्नेहा पाटील यांचे नाव पुढे केले
Live Updates In Marathi : अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत अनेक संशय व्यक्त केली जात आहेत. यादरम्यानच आता रोहित पवार पत्रकार परिषद घेऊन काही मोठे खुलासे करू शकतात.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर मोठी खळबळ उडाली. अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर सुनेत्रा पवार यांनी काही तासातच उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्या निधनानंतर अनेक संशय व्यक्त केली जात आहेत. आमदार रोहित पवार यांनी यावर मोठे भाष्यही केले. आज रोहित पवार सकाळी 10 वाजता यासंदर्भात पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेणार आहेत. रोहित पवार यांनी कालच स्पष्ट केले की, आमच्यासाठी आता विलिगीकरण हा महत्वाचा मुद्दा नाही तर अजित पवार यांच्या अपघाताची चाैकशी हा महत्वाचा मुद्दा आहे. पुण्यासह राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर झाला आहे. यामुळे पुणे जिल्ह्यातील 873 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी लवकरच धुरळा उडण्याची शक्यता आहे. शुक्रवारपासून प्रभाग रचनेच्या कामाला सुरुवात होणार असून 7 एप्रिलला ग्रामपंचायतच्या प्रभागाचे प्रारूप प्रसिद्ध होणार आहे. सुनेत्रा पवार या आज बारामती दाैऱ्यावर आहेत, पुण्याहून त्या बारामतीकडे जातील. यासह राज्य, देश-विदेशातील अपडेट्स जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करा.
LIVE NEWS & UPDATES
-
पुण्यात जांभूळवाडी बोगद्याजवळ अपघात, डंपरची पाच ते सहा वाहनांना धडक
पुण्यात जांभूळवाडी बोगद्याजवळ अपघात
डंपरची पाच ते सहा वाहनांना धडक
बंगळुरू- पुणे हायवेवर भीषण अपघात
अपघातामध्ये चार जण जखमी, वाहनांचं मोठं नुकसान
गाड्यांना धडक देणाऱ्या डंपरने नवले पुलाजवळ घेतला पेट
-
पुणे – इंदोर महार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी, 20 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
पुणे – इंदोर महार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी
मनमाड- मालेगावदरम्यान वाहतूक कोंडी
सुमारे 20 किमीपर्यंत लागल्या वाहनांच्या रांगा
तीन तासपासून वाहतूक ठप्प
वाहतूक पोलिसांच्या हलगर्जीपणा मुळे वाहतूक ठप्प झाल्याचा आरोप
-
-
टिटवाळ्यात कंटेनरचा भीषण अपघात, 15 वाहनांचा चुराडा
टिटवाळ्यात कंटेनरचा भीषण अपघात
विरुद्ध दिशेने येत असलेल्या 15 वाहनांना उडवलं
अपघाताचा CCTV व्हिडिओ समोर
सुदैवाने जीवितहानी टळली, चार ते पाच जण किरकोळ जखमी
अपघाताची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
-
मोफत दप्तर योजनेच्या माध्यमातून जालना जिल्ह्यात 1 लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना मिळणार मोफत दप्तर
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर देण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला असून याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध झालाय. या निर्णयाचा फायदा जालना जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना झाला असून पहिली ते आठवीपर्यंतच्या जवळपास 1 लाख 12 हजार 642 विद्यार्थ्यांना या माध्यमातून मोफत दप्तर मिळणार आहे. दरम्यान पाठ्यपुस्तके आणि पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत दुपारचे जेवण दिले जाते आता या सोबतच मोफत दप्त योजना सुरू केल्याने पट नोंदणी आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढण्यास मदत होईल असा विश्वास शिक्षण विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
-
मंत्री भरत गोगावले यांनी केळी पिकाची पाहणी
सोलापूर दौऱ्यावर असणाऱ्या फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी केळी पिकाची पाहणी केली आहे. सोलापूर जिल्ह्यात केळी पिकांचे उत्पादन मोठ्याप्रमाणात होते. मंत्री गोगावले यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जात केळी पिकाची पाहणी आणि त्याची शास्त्रशुद्ध माहिती घेतली. केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्या आणि त्यांना शेती दरम्यान येणाऱ्या अडचणीही त्यांनी यावेळी जाणून घेतल्या.
-
-
नाशिक येथे कांदा आणि मका उत्पादक शेतकऱ्यांची बैठक संपन्न
कांदा आणि मक्याच्या बाजारभावात दररोज घसरण होत असल्याने कांदा आणि मका उत्पादक शेतकऱ्यांची बैठक संपन्न झाली आहे. चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीतील बैठकीत एकूण ८ मागण्यांवर चर्चा झाली. कांद्याला तीन हजार रुपये प्रति क्विंटलला हमीभाव मिळावा, विक्री झालेल्या आणि विक्री होणाऱ्या कांद्याला १५०० रुपये अनुदान मिळाले.बाजारात हमीभावापेक्षा कमी दरात विक्री होणाऱ्या मक्यातील फरक द्यावा.मका हमीभाव खरेदी केंद्रांची खरेदी मर्यादा वाढवून हमीभाव खरेदीस गती देण्यात यावी. यासह एकूण आठ मागण्यांचे निवेदन बैठकीनंतर चांदवड तहसीलदारांना देण्यात आले आहे..
-
जालना महापालिकेची कर वसुली थंडावल्याने विकास कामांना ब्रेक
जालना महापालिकेची 102 कोटी थकबाकी असून कर भरण्याकडे नागरिकांनी चालढकल केली आहे. पालिका प्रशासनाने आता कारवाईचा बडगा उगारला असून 242 जणांना नोटीस बजावल्या असून 5 लाखांच्या पुढे 20 थकबाकीदार असून 5 आस्थापने सील केली आहेत. मालमत्ता विभागाची 40 कोटी,पाणी पुरवठा विभागाची 22 कोटी, यासह शिक्षण स्वच्छता यासारख्या कराची 102 कोटी थकबाकी आहे. थकबाकी असल्याने पाणीपुरवठा,रस्ते दुरुस्ती,स्वच्छता यासारख्या विकास कामांना ब्रेक लागला आहे.
-
भिवंडीत भाजपने महापौर पदासाठी स्नेहा पाटील यांचे नाव पुढे केले
भिवंडीत भाजपने महापौर पदासाठी स्नेहा मेहुल पाटील यांच्या नावाचे पत्र दिल्यानंतर महापौर पदाचे उमेदवार नारायण चौधरी नाराज झाले असून ते काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस ( श.प.) या पक्षांच्या भिवंडी सेक्युलर फ्रंटसोबत जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहेत.
-
महादेव मुंडे हत्या प्रकरणात साक्षीदाराने घतले कराड यांच्या मुलाचे नाव
परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणात विजयसिंह उर्फ बाळा बांगर यांचा गोपनीय जबाब महत्त्वाचा ठरणार आहे. विजयसिंह उर्फ बाळा यांनी कलम 164 नुसार दिलेल्या जबाबात वाल्मीक कराडसह त्याच्या मुलाचेही नाव घेतले आहे.
-
हे सरकार मुस्लिम अल्पसंख्याक आणि दलित विरोधी-नसीम खान
हे सरकार मुस्लिम अल्पसंख्याक आणि दलित विरोधी आहे. जे निर्णय घेत आहे ते मागास वर्ग आणि मुस्लिम विरोधाचा आहे. सरकारच्या निर्णयाचे आम्ही निंदा करतो, निषेध करतो. न्यायालयाने अंतरिम आदेश दिला 5 टक्के आरक्षण शिक्षणात कायम ठेवावा, नोकरीत दिले जाणारे आरक्षण पुढील काळात विचार करण्याचे सांगितले. सरकारने आश्वासन देऊन सुद्धा आरक्षण दिले नाही असे नसीम खान यांनी म्हटले आहे.
-
महिला पत्रकाराच्या गाडीवर हल्ला
महिला स्थानिक पत्रकार श्रद्धा ठोंबरे यांच्यावर हल्ला करत गाडीची तोडफोड करण्यात आली आहे. बदलापूर पोलीस ठाण्याच्या बाहेर घडला प्रकार. भाजपा स्वीकृत नगरसेवक प्रवीण राऊत यांच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
-
मुलुंड मेट्रो दुर्घटनेनंतर ठाण्यात मनसेचे सरकारला डीवचणारे बॅनर
मुंबईच्या मुलुंड येथील मेट्रोचा स्लॅब पडल्याने एका प्रवाशाचा मृत्यू झाला या बाबत मनसेने ठाण्यातील नितीन कंपनी जंक्शन या ठिकाणी सरकारला डीवचणारे बॅनर लावण्यात आले आहे. मृत व्यक्ती आणि जखमी प्रवाशांना योग्य मोबदला देत मेट्रो अधिकारी प्रशासन आणि ठेकेदारांना कळ्या यादी टाकण्याची मागणी मनसेचे पदाधिकारी स्वप्नील महिंद्रकर यांनी केली आहे .
-
मत्स्य विज्ञान विद्यापीठातील विद्यार्थ्यांची मानधन वाढण्याची मागणी
महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी आंदोलन करत इंटर्नशिप मध्ये मिळणाऱ्या मानधनात वाढ करण्याची केली मागणी. एमबीबीएस विद्यार्थ्यांना ज्या प्रमाणे मानधनात 11 हजार वरून 18 हजार पर्यंत वाढ करण्यात आली त्याच धर्तीवर आमच्या मानधनात वाढ करावी अशी करण्यात आली मागणी. सरकारने अश्वासन देऊन सुद्धा ही मागणी पूर्ण न झाल्यास राज्यभरात मोठं आंदोलन उभारण्याचा देण्यात आला इशारा.
-
रोहित पवारांनी आरोप करण्याचे धंदे बंद करावं – राधाकृष्ण विखे पाटील
रोहित पवारांनी आरोप करण्याचे धंदे बंद करावं, अजित पवार यांच्या विमान अपघाता वरून राधाकृष्ण विखे पाटील यांनी निशाणा साधला. हा सरणावरती स्वत:ची पोळी भाजून घेण्याचा प्रकार असल्याचा आरोपही त्यांनी केला.
-
टिटवाळ्यात भरधाव कंटेनरची दुचाकी, चारचाकी आणि रिक्षाला धडक, नागरिक जखमी
कल्याण जवळील टिटवाळा येथे भरधाव कंटेनरची दुचाकी, चारचाकी आणि रिक्षाला धडक बसून मोठा अपघात झाला. यामध्ये अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाले, तसेत रस्त्यावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. या अपघातात काही नागरिक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मात्र अपघाताचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे.
-
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी असलेली पदाधिकाऱ्यांची बैठक रद्द
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी असलेली पदाधिकाऱ्यांची बैठक रद्द. राज ठाकरे यांना महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जायचे असल्याने बैठक रद्द करण्यात आली. उद्या सकाळी पुन्हा सर्व पदाधिकाऱ्यांना बैठकीसाठी बोलवले असल्याची माहिती समोर आली आहे. शहरातील सर्व प्रमुख पदे शहराध्यक्ष याची पदे भरण्याची देखील सूचना देण्यात आली आहे.
-
मुंढवा जमीन घोटाळ्याप्रकरणी खरगे समितीच्या अहवालाबद्दल काय म्हणाले बावनकुळे ?
मुंढवा जमीन घोटाळ्याप्रकरणी खरगे समितीचा अहवाल चंद्रशेखर बावनकुळेंकडे सुपूर्त. कालच माझ्याकडे अहवाल आला, सीलबंद लिफाफा मी अजून उघडला नाहीये, वाचला नाहीये. मुख्यमंत्र्यांशी या विषयावर बोलेन. असं बावनकुळे म्हणाले.
-
पुणे -स्थायी समिती अध्यक्षपदी भाजपच्या श्रीनाथ भीमाले यांचा उमेदवारी अर्ज दाखल
पुणे – स्थायी समिती अध्यक्षपदी भाजपच्या श्रीनाथ भीमाले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. स्थायी समितीचे 16 पैकी 12 सदस्य भाजपचे असल्याने भीमाले यांची निवड केवळ औपाचरिकता आहे. महापौर मंजुषा नागपुरे, सभागृह नेते गणेश बिडकर यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला.
-
पुणे भारती विद्यापीठ परिसरातील खळबळजनक घटना
पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाणे हद्दीत एका महिलेचा दगडाच्या खाणीत ढकलून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली . या प्रकरणातील तिन्ही आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
-
मनसेचे ठाणे शहर अध्यक्ष अविनाश जाधव आणि मनसे नेते अभिजीत पानसे राज ठाकरेंच्या भेटीला
मनसेचे ठाणे शहर अध्यक्ष अविनाश जाधव आणि मनसे नेते अभिजीत पानसे राज ठाकरेंच्या भेटीला पोहचले आहेत. ठाणे आणि कल्याण-डोंबिवलीचे पदाधिकारी मनसे अध्यक्षांच्या भेटीला पोहोचले आहेत. ठाणे आणि कल्याण डोंबिवलीबाबत पदाधिकाऱ्यांची भेट राज ठाकरे घेत आहेत. या भेटी दरम्यान स्वीकृत नगरसेवकांसह निवडणुकीदरम्यान पक्ष सोडून गेलेल्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांवर चर्चा अपेक्षित आहे.
-
पुणे महानगरपालिकेत सुप्रिया सुळे यांची बैठक
पुणे महानगरपालिकेत सुप्रिया सुळे यांची बैठक सुरू आहे. आयुक्त नवल किशोर राम आणि महानगरपालिकेच्या इतर अधिकाऱ्यांसोबत सुप्रिया सुळे यांची बैठक सुरू आहे. पुणे महानगरपालिकेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नगरसेवक देखील बैठकीला उपस्थित आहेत. दोन्ही पक्षाच्या नगरसेवकांसोबत सुप्रिया सुळे यांनी आयुक्तांची भेट घेतली.
-
भारतात लेअरजेट हे विमान रजिस्टरचं होऊ शकत नाही – रोहित पवार
जेव्हा तुम्ही भारताबाहेरुन एखादं विमान आणता तेव्हा त्याला STC सर्टिफिकेट दिलं जातं. यात जे सर्टिफिकेट आहेत ते लेअरजेटचे आहेत. पण याचा सखोल अभ्यास केल्यानंतर मी जबाबदारीने सांगतो की भारतात लेअरजेट हे विमान रजिस्टरचं होऊ शकत नाही – रोहित पवार
-
आमच्या घरातील माणूस गेल्याने आम्ही ही माहिती घेतली- रोहित पवार
“ब्लॅक बॉक्समध्ये एफडीआर असतो. डॉक्यूमेंट डीजीसीआयकडे आहे. आमच्या घरातील माणूस गेल्याने आम्हीही माहिती घेतली. शुभचिंतक अधिक माहिती देत आहेत. त्यामुळे डीजिसीएने व्यवस्थित चौकशी करावी. लेअर जेट रजिस्टर होऊ शकत नाही. बेकायदेशीरपणे लेअरजेट रजिस्टर झालं,” असं रोहित पवार म्हणाले.
-
सत्तेचा वापर करून चौकशी करा, प्राथमिक अहवाल द्या- रोहित पवार
“सत्तेचा वापर करून चौकशी करा, प्राथमिक अहवाल द्या. आम्ही सत्तेत नसताना पुरावे देतोय. चौकशी का करत नाही? याचं कारण रिपोर्ट तयार केला जातोय. व्हिएसआर कंपनीला वाचवलं जात आहे. दोन दिवसात रिपोर्ट आला पाहिजे. १५ फेब्रुवारीपर्यंत रिपोर्ट द्यायचा होता. नाही दिला. आज १८ तारीख आहे,” असं रोहित पवार म्हणाले.
-
मेन पायलटला किती रुपये मिळणार… विमानाचा विम्याबद्दल रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
विमानाची किंमत ३५ कोटी आहे. पण त्याची क्वॉलिटी पाहिली तर ते फक्त १० ते १५ कोटीला विकल्या जाऊ शकलं असतं. १० कोटीच्यावर हे विमान गेलं नसतं… असं काही लोकांनी सांगितलं. ५५ कोटी रुपयांचा विमा होता. लाएबिलीटी विमान होती २१० कोटी. त्यात पायलटही आले. पाचही जण आले. मेन पायलटला किती रुपये मिळणार? हा सर्वात मोठा प्रश्न आहे. ही गोष्ट पायलटला माहीत होती काय़ याचं स्पष्टीकरण मिळायला हवं… असं देखील रोहित पवार म्हणाले..
-
ब्लॅक बॉक्स जळला हे सांगण्यात येत आहे… हे केवळ मॅन्यूप्युलेट – रोहित पवार
विमानाच्या आत ब्लॅक बॉक्स असतो. त्यामुळे जळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे ब्लॅक बॉक्स जळला हे सांगण्यात येत आहे. हे केवळ मॅन्यूप्युलेट करण्यासाठी आहे. पेपर जळाले नाही. ब्लॅक बॉक्स कसा जळाला? इतर देशातही असेच अपघात झाले. सेम आग लागली. आगीची तीव्रता सेम होती. घटना सेम होती. तरीही ब्लॅक बॉक्स मिळाला आहे… असा देखील संशय रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे.
-
अकाऊंटेबल मॅनेजरचं नाव साईटवरून डीलिट केलं – रोहित पवार
अकाऊंटेबल मॅनेजरचं नाव साईटवरून डीलिट केलं. त्याचा इंटरव्ह्यू डीजीसीने घेतला. ही माणसं कुठे आहे. त्यांची चौकशी केली का. डीजीसीएने काल जी नोटीस दिली त्यात सीसी अकाऊंटेबल मॅनेजर लिहिलं. पण तो कुठे आहे…असे अनेक प्रश्न रोहित पवार यांनी उपस्थित केले आहेत.
-
विमानात फ्ल्युईल टँक अधिकचे होते… ही शंका खरी ठरताना दिसतेय – राहित पवार
विमान कोसळल्यानंतर अनेक स्फोट झाल्याचा व्हिडीओ समोर आला. विमानात फ्ल्युईल टँक अधिकचे होते… ही शंका खरी ठरताना दिसतेय. अपघाताच्या तपासाच्या वेगावर आक्षेप आहे… असं वक्तव्य देखील रोहित पवार यांनी केलं आहे.
-
होळी आणि शिमग्यासाठी मुंबईकर मोठ्या संख्येने कोकणात प्रवास करतात..
होळी आणि शिमग्यासाठी मुंबईकर मोठ्या संख्येने कोकणात प्रवास करतात. यासाठी मध्य रेल्वेने कोकणासह देशभरात जाणाऱ्या विशेष 186 गाड्या सुरु करणार आहेत.. यापैकी 94 ट्रेन होळीसाठी विशेष असतील आणि 94 नियमित विशेष ट्रेन असतील.. मुंबई-नागपूर, सावंतवाडी रोड, पुणे-नागपूर या मार्गांवर या विशेष गाड्या धावतील.. शिवाय बनारस, गोरखपूर, समस्तीपूर, दानापूरसाठीही विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत..
-
नाशिक ग्रामीण पोलीस दलाचे अधिकारी CBI च्या रडारवर
ईगतपुरीतील अवैध कॉल सेंटर प्रकरणी ग्रामीणच्या एका बड्या अधिकाऱ्यांसह 2 पोलीस निरीक्षकांची CBI चौकशी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ईगतपुरीतील रेन फॉरेस्ट रिसॉर्टवर ऑगस्ट 2025 मध्ये CBI च्या पथकाने छापा टाकत कॉल सेंटर उद्धवस्त केले होते. पोलीस अधिकाऱ्यांच्या आशीर्वादानेच अवैध कॉल सेंटर रॅकेट चालवले जात असल्याचा संशय होता. महाराष्ट्रातील अनेक IPS अधिकाऱ्यांची CBI कडून चौकशी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.
-
मविआ एकत्र असती तर, मुंबई पालिकेत भाजप सत्तेत नसती – संजय राऊत
मविआ एकत्र असती तर, मुंबई पालिकेत भाजप सत्तेत नसती… काल कोर्टात रोहित पवार यांची भेट झाली… पडद्यामागच्या घडामोडीने दादा अस्वस्थ होते… असं रोहित पवार म्हणाले… राजकीय घडामोडींमुळे दादा कसे अस्वस्थ होते… ते रोहित यांनी सांगितलं… असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.
-
शरद पवारांचे आमदार खासदार शिवसेनेच्या संपर्कात…
शरद पवारांचे आमदार खासदार शिवसेनेच्या संपर्कात आले आहेत. खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि आमदार उत्तम जानकर यांची शिवसेनेशी जवळीक साधली आहे. खासदार मोहिते पाटील यांनी एकनाथ शिंदे यांची तर आमदार जानकर यांनी उदय सामंत आणि भरतशेठ गोगावले यांची भेट घेतली. सोलापूर जिल्ह्यासह माळशिरस तालुक्याच्या राजकारणातील मोठी घट झाली आहे.
-
पोलीस भरतीसाठी आलेल्या मुलांना फुटपाथवर झोपावं लागलं
महाराष्ट्रातून विविध ठिकाणी पोलीस भरती सुरू आहे. ठाण्यात देखील 654 पदासाठी 21 हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरले आहेत. असे असताना मात्र मैदानाच्या बाहेरच विद्यार्थ्यांना रात्र फुटपाथवर काढावी लागत आहे. पोलिसांनी दिलेला सिद्धि सभागृह हॉल अपुरा पडत असल्या कारणास्तव गैरसोय होत असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले आहे.
-
शिक्षण विभागाकडून 26 शिक्षकांवर निलंबनाची कारवाई
वाशिमच्या टो येथील मैनागिरी महाराज विद्यालयातील सामूहिक कॉपी प्रकरणी शिक्षण विभागाकडून 26 शिक्षकांवर निलंबनाची कारवाई. आज होणाऱ्या रसायनशास्त्राच्या पेपरसाठी जिल्ह्यातील इतर 30 शिक्षकांची पयर्वेक्षक म्हणून नेमणूक करण्यात आलीये.परवा भौतिक शास्त्राच्या पेपर दरम्यान 581 विद्यार्थ्यांनी सामूहिक कॉपी केल्याचा अहवाल प्राथमिक शिक्षण अधिकारी संजय ससाणे यांनी दिला होता. त्यानंतर काल या प्रकरणी या परीक्षा केंद्रावरील 26 शिक्षकांचे निलंबन करण्यात आलेय.
-
डोंबिवली-मुंबईत बनावट औषधांचे मोठे रॅकेट उघड
डोंबिवली-मुंबईत बनावट औषधांचे मोठे रॅकेट उघड. उच्च रक्तदाबाच्या रुग्णांच्या जिवाशी खेळ. नामांकित कंपनीच्या नावे बनावट ‘Telma AM’ औषधाची विक्री. मनपाडा पोलिसांकडून दोन वितरक गजाआड. उच्च रक्तदाबासाठी वापरल्या जाणाऱ्या ‘Telma AM’ या नामांकित औषधाच्या बनावट गोळ्यांची विक्री. कल्याणच्या मनपाडा पोलिसांची मोठी कारवाई. डोंबिवली आणि मुंबईतील दोन बड्या औषध वितरकांना अटक.
-
होळी आणि शिमग्यासाठी कोकणात विशेष ट्रेन
होळी आणि शिमग्यासाठी मुंबईकर मोठ्या संख्येने कोकणात प्रवास करतात. यासाठी मध्य रेल्वे कोकणासह देशभरात जाणाऱ्या विशेष 186 गाड्या सुरु करणार आहे.यापैकी 94 ट्रेन होळीसाठी विशेष असतील आणि 94 नियमित विशेष ट्रेन असतील. मुंबई-नागपूर, सावंतवाडी रोड, पुणे-नागपूर या मार्गांवर या विशेष गाड्या धावतील. शिवाय बनारस, गोरखपूर, समस्तीपूर, दानापूरसाठीही विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सुनील नारकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई-सावंतवाडी रोड दरम्यान फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात ठराविक तारखांवर विशेष गाड्या धावणार आहेत. आठवड्यातून दोनदा या ट्रेन सोडण्यात येणार आहेत. यामुळे ट्रेनचं वेळापत्रक पाहून 18 फेब्रुवारीसपासून तिकिट बुक करण्याचं आवाहन प्रवाशांना केलं आहे.
-
नाशिकच्या तपोवन येथील झाड प्रकरणी पुढील सुनावणी आता 24 फेब्रुवारी ला होणार
मुंबई उच्च न्यायालयात 24 तारखेला होणार सुनावणी. मनसे पदाधिकारी आणि adv नितीन पंडित यांनी झाड तोडण्या प्रकरणी केली आहे मुंबई उच्च न्यायालयात याचिका. झाड तोडण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यासाठी नितीन पंडित यांनी केली आहे याचिका दाखल. काल झालेल्या सुनवणीत मनपा प्रश्सासनाने प्रतिज्ञापत्र सादर न केल्याने सुनावणी पुढे ढकलली. पुढच्या सुनावणी तरी महापालिकेच्या वतीने प्रतिज्ञापत्र सादर करण्यात येतो का तसेच आज न्यायालय काय निर्णय देतो याकडे लक्ष
-
धुळे शहराला पाणीपुरवठा करणारी तापीची पाईपलाईन फुटली..
मुंबई आग्रा महामार्गावर धुळे शहराला तापी नदीवरून पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन महिनाभरात पुन्हा एकदा फुटली.. पाईपलाईन फुटल्यानंतर 50 ते 60 फुटापर्यंत पाण्याचे फवारे..लाखो लिटर पाण्याची नासाडी.
-
एलईडी लाइट्समध्ये लपवलेला 65 लाखांचा गांजा जप्त
सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना चकवा देण्यासाठी प्रवाशाने एलईडी लाईटच्या आतील भागात हायड्रोपोनिक वीड (गांजा ) लपविला प्रथम दर्शनी संशयित प्रवाशाकडे बॅगेत अन्य कोणत्याही संशयात पाच वस्तू आढळली नाही मात्र संबंधित प्रवाशाविषयी असलेल्या गुप्त माहिती व बँक ऑफ होऊन आणलेल्या एलईडी लाईटचा संशय असल्याने पुन्हा एकदा तपासणी केली असता तस्करीचे बिंग फुटले
-
उमरगा पंचायत समिती सभापतीपदावरून भाजप-शिवसेना तणाव कायम
उमरगा तालुक्यात पंचायत समितीच्या सभापतीपदावरून सुरू असलेला भाजप-शिवसेना वाद अद्याप मिटलेला नाही. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष कैलास शिंदे आणि शिवसेनेचे माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची कन्या आकांक्षा चौगुले यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरूच आहे.
-
केडीएमसीत यंदा ‘अभय योजना’ नाही; थकबाकीदारांवर कडक कारवाईची घंटा
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत यापूर्वी 2023-24 व 2024-25 मध्ये योजना राबवली; मात्र यावर्षी सवलत नाही. 2025-26 साठी मालमत्ता कर व पाणीपट्टीची ‘अभय योजना’ नसल्याने मुदत चुकल्यास दरमहा लागणार 2% विलंब शुल्क; महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम नियम 41 लागू. थकबाकीदारांविरोधात जप्ती, नळजोडणी खंडित व जप्त मालमत्तांचा जाहीर लिलाव प्रक्रिया देखील पालिका राबवणार
-
दादर स्टेशनवर प्रवाशांचा संताप! एक्सलेटर बंद; ज्येष्ठ नागरिकांचा जीव मेटाकुटीला
दादर रेल्वे स्थानक येथे सकाळच्या गर्दीच्या वेळी एक्सलेटर बंद. ज्येष्ठ नागरिक, वृद्ध आणि महिलांना जिने चढताना प्रचंड त्रास. पीक अवरमध्ये हजारो प्रवाशांची वर्दळ; व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह. प्रवाशांची तीव्र नाराजी; तात्काळ सुरू करण्याची मागणी. गर्दी आणि गैरसोयीमुळे सुरक्षेचाही गंभीर प्रश्न उपस्थित
-
रोहित पवार यांच्या पत्रकार परिषदेकडे सर्वांच्या नजरा
रोहित पवार आज सकाळी 10 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. अजित पवार यांच्या विमान अपघाताबद्दल रोहित पवार मोठा खुलासा करू शकतात. सर्वांच्या नजरा या पत्रकार परिषदेकडे आहेत.
-
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज पुणे दौऱ्यावर
उपमुख्यमंत्री सुनिता पवार जिजाई बंगल्यावर दाखल. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज बारामतीला जाणार आहेत. सुनेत्रा पवार बारामतीमध्ये कार्यकर्त्यांच्या भेटी घेण्याची शक्यता आहे.
Published On - Feb 18,2026 8:08 AM
