एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रातील एक प्रमुख नेते आहेत. कडवट शिवसैनिक म्हणून त्यांची ख्याती आहे. मितभाषी, संयमी राजकारणी म्हणून त्यांची ओळख आहे. साधा रिक्षाचालक ते मुख्यमंत्री हा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. वयाच्या 18 व्या वर्षी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि ठाण्यातील शिवसेनेचे नेते आनंद दिघे यांच्या ते संपर्कात आले. शिवसेनेच्या प्रत्येक आंदोलनात सहभाग घेतला. महाराष्ट्र-कर्नाटक सीमा आंदोलनात त्यांनी पोलिसांचा लाठीमारही खाल्ला. 1997मध्ये त्यांना आनंद दिघेंनी ठाणे महापालिका निवडणुकीचं तिकीट दिलं. या निवडणुकीत शिंदे घवघवीत मतांनी विजयी झाले. त्यानंतर ते ठाणे महापालिकेचे सभागृह नेतेही झाले. सभागृह नेते म्हणून पालिका गाजवल्यानंतर 2004मध्ये त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. पहिल्याच विधानसभा निवडणुकीत ते निवडून आले. 2004 पासून सलग चार वेळा ते कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून आमदारपदी निवडून आलेले आहेत. त्यानंतर 2014मध्ये शिवसेना विरोधी पक्षात बसणार होती. तेव्हा 12 दिवसांसाठी ते गटनेते झाले होते. त्यानंतर शिवसेना सत्तेत गेल्यानंतर ते मंत्रीही झाले. शिंदे यांनी या आधी 2015 ते 2019 पर्यंत सार्वजनिक बांधकाम या खात्याचे मंत्री म्हणून काम पाहिले. 2019मध्ये ते कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले. सध्या ते ठाकरे सरकारमध्ये नगरविकास मंत्री झाले. मात्र, ठाकरे सरकारमध्ये असतानाच शिंदे यांनी बंड केलं. शिवसेनेचे 40 आमदार आणि दहा अपक्ष आमदारांना घेऊन त्यांनी भाजपशी हातमिळवणी केली. त्यानंतर भाजप आणि शिंदे गटाने राज्यात सत्तास्थापन केली. एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर शिंदे गटाने शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्हावर हक्क सांगितला. निवडणूक आयोगानेही शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह दिलं. सध्या हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे.
Maharashtra News Live : महापालिका निवडणुकीपूर्वी शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का
देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.
- manasi mande
- Updated on: Dec 15, 2025
- 9:16 am
तुम्ही खरंच पुन्हा मुख्यमंत्री होणार का? थेट एकनाथ शिंदेंना प्रश्न; उत्तर काय आलं?
एकनाथ शिंदे पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदी विराजमान होतील, असा दावा केला जात आहे. याच दाव्याबद्दल शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांनी थेट शिंदे यांनाच प्रश्न केला आहे.
- Prajwal Dhage
- Updated on: Dec 14, 2025
- 4:24 pm
Devendra Fadnavis: अब आगे बढ़ चुका हूं मैं…हिवाळी अधिवेशनाचं सूप वाजण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांचे हृदयगीत, शेरोशायरीतून दाखवले व्हिजन
Devendra Fadnavis in Winter Session 2025: 'बदला नही, बदलाव होगा' या धोरणाच्या पुढे जात उणापुऱ्या आठवडाभराच्या हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजत असतानाच मुख्यमंत्र्यांनी अजून एक सुखद धक्का दिला. शेरोशायरीतून त्यांनी महाराष्ट्र विकासाचे व्हिजन मांडले.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Dec 14, 2025
- 1:13 pm
मोठी बातमी! एकनाथ शिंदे येत्या 2 महिन्यात पुन्हा मुख्यमंत्री होणार? ज्या नेत्याचं भाकीत खोटं ठरत नाही, त्याचीच मोठी भविष्यवाणी
राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे, एकनाथ शिंदे हे येत्या एक ते दोन महिन्यांमध्ये मुख्यमंत्री होणार असल्याचं भाकीत महाराष्ट्रातील बड्या नेत्यानं वर्तवल्यानं चर्चेला उधाण आलं आहे.
- Ajay Deshpande
- Updated on: Dec 13, 2025
- 6:04 pm
Shambhuraj Desai : गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ… शंभूराज देसाईंचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला
"गुलाम" किंवा "गांडूळ" असे संबोधून तोंडाची वाफ वाया घालवू नका, असे प्रत्युत्तर शंभूराज देसाईंनी उद्धव ठाकरेंना दिले आहे. शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणारा पक्ष असल्याचे त्यांनी म्हटले. देसाईंनी उद्धव ठाकरे यांच्या मालक-नोकर मानसिकतेवर टीका केली, तसेच उपमुख्यमंत्री पद त्यांच्या कार्यकाळात कसे स्वीकारले होते यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
- Harshada Shinkar
- Updated on: Dec 13, 2025
- 3:51 pm
Thackeray vs Shinde : गांडुळानं फणा काढायचा नसतो… गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर जहरी टीका…शिवसेनेकडूनही पटलवार
ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर नाव न घेता जहरी टीका केली. "गुलामानं प्रतिक्रिया द्यायची नसते आणि गांडुळांन फणा काढण्याचा प्रयत्न करायचा नसतो," असे ते म्हणाले. या टीकेला शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांनी प्रत्युत्तर दिले.
- Harshada Shinkar
- Updated on: Dec 13, 2025
- 2:52 pm
Sanjay Raut: उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आलेयत…संजय राऊतांचा गर्भित इशारा कुणाला? महाविकास आघाडीला ‘मनसे’ भगदाड पडणार?
Sanjay Raut on Mahavikas Aaghadi: राजकारण नेहमी 'बिटवीन द लाईन्स' वाचवं असा धुरणींचा सल्ला असतो. तो वाचता आला तर भविष्यातील नांदी अचूक टिपता येतात, असा सर्वसाधारण समज आहे. आता संजय राऊतांनी आजारापणातून आल्या आल्या भाजपसह मित्रपक्षांनाही का शिंगावर घेतले, याचा संभ्रमही लवकरच दूर होईल. तुर्तास त्यांच्या विधानाकडं गंमत म्हणून बघता येणार नाही, इतकंच.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Dec 13, 2025
- 11:29 am
Sanjay Raut: काँग्रेसने कितीही आपटली तरी…वेगळ्या विदर्भावरून संजय राऊतांची सणसणीत चपराक, आजारपणातून बाहेर येताच धडाडली तोफ
Sanjay Raut on Congress: आजारपणातून बाहेर पडताच खासदार संजय राऊत यांची तोफ धडाडली. वेगळ्या विदर्भावरून त्यांनी भाजपवर निशाणा साधतानाच महाविकास आघाडीतील काँग्रेसला सणसणीत चपराक लगावली.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Dec 13, 2025
- 11:20 am
जागा वाटपावरून कुरबुरी..शिंदे सेनेच्या आमदारांची रात्रभर खलबतं, राज्यात मोठी घडामोड? ठाण्यातून ती मोठी अपडेट काय?
Eknath Shinde Shivsena MLA Meeting: महापालिका निवडणुकीसाठी महायुती झाली असली तरी जागा वाटपाचा तिढा निर्माण होऊ शकतो. या कुरबुरीअगोदर शिंदे सेनेच्या आमदारांची रात्रभर ठाण्यात खलबतं सुरू होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी आमदारांची बैठकी झाली. काय आहे अपडेट?
- Reporter Girish Gaikwad
- Updated on: Dec 13, 2025
- 9:14 am
BMC Election : मुंबई महापालिकेसाठी महायुतीचे जागावाटप ठरलं? शिवसेना की भाजप, कोण लढवणार सर्वाधिक जागा? मोठी अपडेट समोर
Mahayuti Seat Sharing Formula for BMC Election : मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीवर संपूर्ण राज्याचे लक्ष असणार आहे. अशातच आता महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला समोर आला आहे. कोणता पक्ष किती जागा लढण्याची शक्यता आहे ते जाणून घेऊयात.
- बापू गायकवाड
- Updated on: Dec 12, 2025
- 6:38 pm
Mahayuti Alliance : मुंबईचा फॉर्म्युला फिक्स? शिंदे म्हणाले, येणाऱ्या निवडणुका महायुती एकत्र लढणार, जिथं अडचण तिथं…
मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला निश्चित झाल्याची सूत्रांची माहिती आहे. भाजप १३०-१४० जागांवर ठाम, तर शिंदे गटाच्या शिवसेनेला ८०-९० जागा मिळण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसलाही काही मुस्लिम बहुल जागांवरून चर्चा सुरू आहे. वरिष्ठ स्तरावर युतीचा निर्णय झाला असून, स्थानिक समित्या चर्चा करतील.
- Harshada Shinkar
- Updated on: Dec 12, 2025
- 5:31 pm
Eknath Shinde : आपण वयाची सेंच्युरी…. एकनाथ शिंदे यांचा थेट शरद पवार यांना फोन अन् दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी त्यांना दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या.
- Harshada Shinkar
- Updated on: Dec 12, 2025
- 12:52 pm