AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्वात मोठ्या सरकारी रुग्णालयात अग्नितांडव, 10 जणांचा होरपळून मृत्यू, पहाटे गाढ झोपेत असतानाच….

ओडिशातील कटक येथील एससीबी मेडिकल कॉलेजच्या ट्रॉमा केअर आयसीयूमध्ये भीषण आग लागून १० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. बचावकार्य सुरू असून गंभीर रुग्णांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

सर्वात मोठ्या सरकारी रुग्णालयात अग्नितांडव, 10 जणांचा होरपळून मृत्यू, पहाटे गाढ झोपेत असतानाच....
hospital fire
| Updated on: Mar 16, 2026 | 8:11 AM
Share

ओडिशामधील सर्वात मोठे सरकारी रुग्णालय असलेल्या एससीबी (SCB) मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या ट्रॉमा केअर आयसीयूमध्ये सोमवारी पहाटे भीषण आग लागली. या दुर्दैवी घटनेत १० रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या मृतांमध्ये प्रामुख्याने आयसीयूमध्ये व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांचा समावेश आहे. या घटनेमुळे संपूर्ण राज्य हादरले असून रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे ३ वाजेच्या सुमारास पहिल्या मजल्यावरील ट्रॉमा केअर इमर्जन्सी युनिटमध्ये अचानक आग लागली. शॉट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. यावेळी रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक गाढ झोपेत होते. त्याचवेळी पहिल्या मजल्यावरील ट्रॉमा केअर इमर्जन्सी युनिटमध्ये अचानक धूर निघू लागला. यानतंर पाहता पाहता आगीने रौद्र रूप धारण केले. आयसीयूमध्ये व्हेंटिलेटर, मॉनिटर्स आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणं असल्याने ही आग वेगाने पसरली.

आयसीयूमध्ये असलेल्या रुग्णांना स्वतःहून बाहेर पडणे शक्य नव्हते. त्यातच आगीमुळे निर्माण झालेल्या धुरामुळे अनेकजण गुदमरले. यात काही रुग्णांचा जागीच मृत्यू झाला. तर काहींचा दुसऱ्या वॉर्डमध्ये शिफ्ट करत असताना मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. ही आग लागताच रुग्णालयात एकच खळबळ माजली. रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी जिवाच्या आकांताने ओरडण्यास सुरुवात केली. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी तातडीने खिडक्यांच्या काचा फोडून धूर बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.

आयसीयूमध्येच गुदमरून काहींचा मृत्यू

या घटनेची माहिती मिळताच रुग्णालयाचे स्वतःचे अग्निशमन दल आणि तीन अग्निशमन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. धुराचे लोट इतके प्रचंड होते की बचावकर्त्यांना आत शिरताना मोठी कसरत करावी लागली. तरीही, ५० हून अधिक रुग्णांना यशस्वीरित्या बाहेर काढून नवीन मेडिसिन आयसीयूमध्ये हलवण्यात आले. या भीषण दुर्घटनेत १० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी काही जणांचा मृत्यू आयसीयूमध्येच गुदमरून झाला, तर काहींचा दुसऱ्या वॉर्डमध्ये शिफ्ट करत असताना मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

सध्या यातील ५ रुग्णांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. बचावकार्य करताना रुग्णालयातील काही कर्मचारीही जखमी झाले असून त्यांच्यावरही उपचार सुरू आहेत.

उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

याप्रकरणी ओडिशा सरकारने या घटनेची अत्यंत गंभीर दखल घेतली असून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. रुग्णालयातील फायर ऑडिट नियमितपणे झाले होते का आणि अग्निशमन यंत्रणा वेळेवर का कार्यान्वित झाली नाही, याची सखोल चौकशी केली जाणार आहे. रुग्णालयातील काही कर्मचाऱ्यांनाही बचावकार्य करताना किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तसेच यात रुग्णालयाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल