आमच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता, कोल्हापूरातील रास्ता रोकोने त्रास झाल्याने राजू शेट्टी यांनी मागितली माफी
न्याय मागण्यासाठी आम्ही आंदोलनाला बसलो असताना थोडी गैरसोय झाली तर आम्ही त्यासाठी माफी मागत आहोत अशा शब्दात राजू शेट्टी यांनी कोल्हापूरातील रास्ता रोखा आंदोलनासंदर्भात आपली भूमिका मांडली आहे.

एकतर लुटारु सारखा लुटून आमचा ऊस नेला जात आहे.न्याय मागण्यासाठी आम्ही आंदोलनाला बसलो असताना थोडी गैरसोय झाली तर आम्ही त्यासाठी माफी मागत आहोत अशा शब्दात राजू शेट्टी यांनी कोल्हापूरातील रास्ता रोखा आंदोलनासंदर्भात आपली भूमिका मांडली आहे. राजू शेट्टी गेल्या ३६ तासांपासून रास्ता रोको आंदोलन करत आहेत. त्यांच्या रास्ता रोको आंदोलनाने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा यासाठी शेतकरी नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी किणी टोलनाक्यावर (पुणे-बंगळुरू महामार्ग) मोठे आंदोलन सुरू केले आहे. गेल्या ३६ तासांहून अधिक काळ झाला हा रास्ता रोको सुरु आहे. या आंदोलनाने वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सोमोरे जावे लागत आहे.
मुंबईकरांचा दूध आणि भाजीपाला रोखणार
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पहिली उचल ४५०० रुपये देण्यात यावी अशी प्रमुख मागणी शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी केलेली आहे. त्यांनी पुणे – बंगळुरु महामार्ग रोखून धरला आहे. आता आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी मुंबईच्या दिशेने जाणारा दूध आणि भाजीपाला आम्ही रोखणार असल्याचे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे. आंदोलक शेतकरी आणि स्वत:राजू शेट्टी यांनी रस्त्यातच मुक्काम केला आहे. महामार्गावरच स्वयंपाक आणि पंगती सुरु आहेत. ऊसाच्या दराचा तिढा न सुटल्यास साखर कारखाने बंद पाडण्याचा आणि कोल्हापूर – सांगली परिसरातील ऊस वाहतूक रोखण्याचा इशाराही राजू शेट्टी यांनी दिला आहे.
