AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Payal Zambare Case : पायल झांबरे प्रकरणाच्या सुनावणीत नेमकं काय घडलं? जाणून घ्या सविस्तर

Payal Zambare Case : पायल झांबरे प्रकरणाच्या सुनावणीत नेमकं काय घडलं? जाणून घ्या सविस्तर

| Updated on: Nov 04, 2026 | 7:57 PM
Share

पुण्यातील पायल जांबरे प्रकरणी सुनावणी पार पडली आहे. आरोपी पती अक्षय जांबरेसह सासू आणि सासऱ्यांना ७ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, या प्रकरणी नणंद अजूनही फरार आहे.

पुण्यातील पायल झांबरे हुंडाबळी प्रकरणाची सुनावणी पुणे न्यायालयात पार पडली आहे. या प्रकरणातील आरोपी पती अक्षय झांबरे, सासू आणि सासऱ्यांना ७ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

या गंभीर प्रकरणात पायलने ऋषिकेशला पाठवलेल्या एका संदेशात सासूला जबाबदार धरले होते, ज्यामुळे तपासाची गरज असल्याचे फिर्यादीचे वकील पुष्कर पाटील यांनी न्यायालयाला सांगितले. यानंतर न्यायालयाने अक्षयला आधीच ७ तारखेपर्यंत कोठडी दिली होती, तर आज सासू आणि सासऱ्यांनाही त्याच कालावधीसाठी पोलीस कोठडी सुनावली आहे.

न्यायालयात आरोपींना आणत असताना पायलच्या कुटुंबीयांनी आणि नातेवाईकांनी आरोपींना फाशीची शिक्षा द्या, पायलला न्याय द्या अशा घोषणा देत तीव्र संताप व्यक्त केला. सध्या या प्रकरणातील नणंद अजूनही फरार असून, पोलीस तिचा शोध घेत आहेत. तपास यंत्रणांवर आणि न्यायव्यवस्थेवर आपला विश्वास असल्याचे फिर्यादींच्या वकिलांनी म्हटले आहे.

Published on: Nov 04, 2026 07:57 PM

Follow Us