AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दोन गोष्टींमुळे लक्ष्याचा घात झाला, नाही तर आज… कसा झाला होता लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मृत्यू?

मराठी आणि हिंदी सिनेसृष्टी गाजवणारे सुपरस्टार लक्ष्मीकांत बेर्डे यांचे अकाली निधन किडनीच्या आजारामुळे झाले होते. प्रचंड लोकप्रियतेच्या शिखरावर असतानाच, अजून बरेच काही देण्याची क्षमता असताना, कोणत्या दोन गोष्टींमुळे त्यांचा घात झाला? त्यांचे जीवन वाचू शकले असते का? यामागे दडलेले हृदयद्रावक सत्य आणि त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण जाणून घ्या.

दोन गोष्टींमुळे लक्ष्याचा घात झाला, नाही तर आज... कसा झाला होता लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मृत्यू?
Laxmikant BerdeImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 04, 2026 | 10:33 PM
Share

अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांनी 80-90चं दशक चांगलंच गाजवलं होतं. मराठीतील सुपरस्टार झाल्यानंतर लक्ष्मीकांत बेर्डे यांनी हिंदीकडे मोर्चा वळवला होता. हिंदीतही ते अल्पावधीत लोकप्रिय झाले. इतके की एका वर्षात तर त्यांनी 11 चित्रपट साईन केले होते. यावरून लक्ष्मीकांत बेर्डे यांची लोकप्रियता दिसून येते. पण यशाच्या शिखरावर असतानाच आणि अजून बरंच काही करून दाखवण्याची गरज असतानाच लक्ष्मीकांत बेर्डे यांनी जगाचा निरोप घेतला. किडनीच्या आजारामुळे त्यांचं निधन झालं. लक्ष्मीकांत बेर्डे अजूनही जिवंत राहू शकले असते. पण दोन गोष्टींनी त्यांचा घात केला. त्या दोन गोष्टी टाळल्या असत्या तर…

लक्ष्मीकांत बेर्डे यांनी अत्यंत गरीबीतून आपलं जग निर्माण केलं होतं. शिक्षण घेत असतानाच त्यांनी अभिनय शिकायला सुरुवात केली होती. अभिनयाच्या वेडापायीच त्यांनी साहित्य संघात नोकरी पत्करली. तिथे पडदे लावण्यापासून मिळेल ते काम ते करायचे. गणेशोत्सवात ते नाटकात भाग घ्यायचे. लोकांना पोटधरून हसवायचे. इथेच त्यांच्यातील अभिनेता आकार घेत होता. मराठी सिनेसृष्टीत नाव कमावल्यानंतर त्यांना पहिला ब्रेक मैने प्यार किया या सिनेमातून मिळाला. या सिनेमात सलमान खान होता. सलमानचा हा दुसरा सिनेमा होता. तर भाग्यश्रीचा पहिलाच सिनेमा होता. या सिनेमात लक्ष्मीकांत बेर्डे यांनी मनोहरची भूमिका केली होती. नोकराची भूमिका होती. पण अत्यंत महत्त्वाची भूमिका होती. या सिनेमातील त्यांचा कॉमिक टायमिंग पाहून सर्वच आवाक झाले होते. त्यांची ही व्यक्तिरेखा चांगलीच गाजली होती.

11 सिनेमे साईन

मैने प्यार कियामुळे लक्ष्मीकांत बेर्डे यांचं नशिबच पालटलं. त्यानंतर 90च्या दशकातील प्रत्येक हिंदी सिनेमात ते दिसू लागले. लक्ष्मीकांत बेर्डेंसाठी सिनेमात रोल नसेल तर त्यांच्यासाठी वेगळा रोल लिहिला जायचा, इतकी त्यांची लोकप्रियता वाढली होती. 1992 त्यांचे 8 सिनेमे आले होते. तर 1993 मध्ये 11 हिंदी सिनेमे आले होते. यावरून लक्ष्मीकांत बेर्डे यांची लोकप्रियता दिसून येते. त्याकाळात लक्ष्मीकांत बेर्डे हे निर्मात्यांची पहिली पसंत होते. सलमानसोबत तर त्यांनी मैंने प्यार कियासह साजन, हम आपके हैं कौन या सिनेमात काम केलं.

पहिल्या पत्नीचं निधन

लक्ष्मीकांत बेर्डे यांची दोन लग्न झाली होती. त्यांची पहिली पत्नी रुही बेर्डे यांचं 1996मध्ये अचानक निधन झालं होतं. त्यानंतर त्यांनी 1998मध्ये प्रिया अर्जुन यांच्याशी लग्न केलं. प्रिया बेर्डे आणि लक्ष्मीकांत बेर्डे दोघेही हम आपके है कौनमध्ये एकत्र दिसले होते.

दोन गोष्टींमुळे घात

लक्ष्मीकांत बेर्डे यांना किडनीशी संबंधित आजार झाला होता. सूत्रांच्या माहितीनुसार, त्यांना दारू आणि सिगारेटची सवय लागली होती. तणाव दूर करण्यासाठी ते दारू पित होते. त्यामुळे त्यांच्या दोन्ही किडन्या फेल झाल्याचं सांगितलं जातं. बराच काळ त्यांच्यावर उपचार सुरू होते. पण नंतर त्यांच्या शरीराने साथ देणं बंद केलं होतं. दोन्ही किडन्या फेल झाल्यामुळे 16 डिसेंबर 2004 रोजी लक्ष्मीकांत बेर्डे यांचं निधन झालं होतं.

Follow Us
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; ब्रीच कँडी रुग्णालयात वैद्यकीय....
Sharad Pawar Health Update : शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; ब्रीच कँडी रुग्णालयात वैद्यकीय तपासण्या सुरू
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाचा फैसला लांबणीवर; पुढील सुनावणी कधी?
Shiv Sena Symbol Row : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाचा फैसला लांबणीवर; पुढील सुनावणी कधी?
पायल झांबरे प्रकरणाच्या सुनावणीत नेमकं काय घडलं? जाणून घ्या सविस्तर
Payal Zambare Case : पायल झांबरे प्रकरणाच्या सुनावणीत नेमकं काय घडलं? जाणून घ्या सविस्तर
आधी कर्जत-जामखेडमधून निवडून येणार का ते सांगा; उमेश पाटलांचा रोहित....
Umesh Patil On Rohit Pawar : आधी कर्जत-जामखेडमधून निवडून येणार का ते सांगा; उमेश पाटलांचा रोहित पवारांना थेट सवाल
राष्ट्रवादीच्या आमदारांची सुनेत्रा पवारांसमोर नाराजी; शिंदेंच्या....
NCP Meeting Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची सुनेत्रा पवारांसमोर नाराजी; शिंदेंच्या खात्यांबाबत उपस्थित केले प्रश्न
गोकुळच्या सत्तासंघर्षात सतेज पाटलांना मोठा धक्का; चार शासननियुक्त...
Gokul : गोकुळच्या सत्तासंघर्षात सतेज पाटलांना मोठा धक्का; चार शासननियुक्त संचालकांमुळे सत्तेचं गणितच बदललं
समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांचा धुमाकूळ; सहा महिन्यांत 8 वेळा दगडफेक
Samruddhi Highway : समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांचा धुमाकूळ; सहा महिन्यांत 8 वेळा दगडफेक, 5 वेळा लुटमार; प्रवाशांमध्ये भीती
शिवसेना सुनावणीत अपात्रतेचा पेच पुन्हा ऐरणीवर; पुढील सुनावणीकडे....
Shivsena Hearing Case : शिवसेना सुनावणीत अपात्रतेचा पेच पुन्हा ऐरणीवर; पुढील सुनावणीकडे राज्याचं लक्ष 
शिंदे गटाचे वकील मेहतांनी मांडला व्हीपचा महत्त्वाचा मुद्दा, म्हणाले...
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नवा ट्विस्ट; शिंदे गटाचे वकील ध्रुव मेहतांनी मांडला व्हीपचा महत्त्वाचा मुद्दा, म्हणाले...
आमदार-खासदार विकत घ्यायला खोक्यांचे पैसे, शेतकऱ्यांना मदत करताना शेकडो
Aaditya Thackeray : आमदार-खासदार विकत घ्यायला खोके भरून पैसे, शेतकऱ्यांना मदत करताना शेकडो अटी; आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल