AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs NZ : विराटपेक्षा भारी कोणीच नाही! सामना हरुनही ‘किवी बॉलर’ किंग कोहलीच्या प्रेमात, तोंडभरून कौतुक, काय म्हणाला?

विराट कोहलीच्या आक्रमक खेळीने न्यूझीलंडच्या गोलंदाजालाही प्रभावित केले. सामना गमावल्यानंतर जेकब डफीने विराटचे कौतुक करत एक खास वक्तव्य केलेआहे. विशेष म्हणजे, आयपीएलमध्ये विराटसोबत ड्रेसिंग रूम शेअर केलेल्या डफीने नेट्समधील त्याचा अनुभवही सांगितला.

IND vs NZ : विराटपेक्षा भारी कोणीच नाही! सामना हरुनही 'किवी बॉलर' किंग कोहलीच्या प्रेमात, तोंडभरून कौतुक, काय म्हणाला?
Jacob Duffy praises Virat Kohli Image Credit source: BCCI
| Updated on: Nov 04, 2026 | 10:45 PM
Share

ऑकलंडमध्ये आज झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात विराट कोहलीने अवघ्या 51 चेंडूंत 74 धावांची खेळी केली. त्याने यावेळी 13 चौकार आणि 1 षटकार लगावला. पावसामुळे बाधित झालेल्या या सामन्यात भारताला डीएलएस नियमानुसार 143 धावांचे सुधारित लक्ष्य मिळाले होते. भारताने हे लक्ष्य 56 चेंडू शिल्लक असताना 5 विकेट्स गमावून पूर्ण केले. या सामन्यात भारताचा ताबडतोड फलंदाज विराट कोहलीच्या आक्रमक फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. एवढच नाही तर कोहलीच्या या खेळीने न्यूझीलंडचा गोलंदाजही प्रभावित झाला. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज जेकब डफी याने सामना गमावल्यानंतरही विराट कोहलीचे भरभरून कौतुक केलं. डफी हा आयपीएल 2026 मध्ये विराटसोबत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा भाग राहिला आहे.

विराटच्या खेळीने जेकब डफी प्रभावित

विराट कोहली आणि न्यूझीलंडचा गोलंदाज जेकब डफी हे आयपीएल 2026 मध्ये आरसीबी संघाकडून एकत्र खेळले आहेत. बंगळुरूमधील सराव सत्रादरम्यान डफीने अनेकदा विराटला गोलंदाजी केली आहे. त्यामुळे विराटची फलंदाजी जवळून पाहण्याची संधी त्याला मिळाली.

‘असं करण्यासाठी विराटपेक्षा चांगला खेळाडू कोण?’

पहिल्या वनडे सामन्यानंतर बोलताना जेकब डफीने विराटच्या खेळीबद्दल मजेशीर प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, हो, हे थोडं त्रासदायक होतं, नाही का? जेव्हा लक्ष्य छोटं असतं आणि एखादा फलंदाज अशा आक्रमक इराद्याने मैदानात उतरतो, तेव्हा तो सहज लक्ष्याचा पाठलाग करू शकतो. आणि असं करण्यासाठी विराटपेक्षा भारी खेळाडू कोण असू शकतो? त्याची कामगिरी खरोखरच प्रभावी होती.

विराटच्या फलंदाजीबद्दल बोलताना डफीने पुढे सांगितले की, त्याला चेंडूच्या उसळीचा अजिबात त्रास झाला नाही. त्याने हुक आणि पुल शॉट्स खेळण्यासाठी स्वतःला उत्तम प्रकारे तयार केलेले, त्यानंतर त्याने बॉल थेट मैदानाच्या पलीकडेही धाडले.

यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही. तो एक उत्कृष्ट खेळाडू आहे. अनेक वर्षांपासून तो अशी कामगिरी करत आहे. बंगळुरूमध्ये नेट्समध्ये सराव करतानाही त्याने माझ्याविरुद्ध अनेकदा अशीच फलंदाजी केली आहे, असंही डफी म्हणाला.

भारताची मालिकेत 1-0 ने आघाडी

पहिल्या वनडे सामन्यात भारतीय गोलंदाजांनीही शानदार कामगिरी केली. न्यूझीलंडचा डाव 185 धावांवर आटोपला. त्यानंतर विराट कोहली आणि कर्णधार शुभमन गिल यांनी दुसऱ्या विकेटसाठी 113 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. शुभमन गिलने 37 धावा केल्या. पावसामुळे सामन्यात दोनदा व्यत्यय आला. मात्र, त्याचा विराटच्या फलंदाजीवर कोणताही परिणाम झाला नाही. त्याने सुरुवातीपासून आक्रमक पवित्रा घेत भारतीय संघाला विजयी वाटचाल करुन दिली.

Follow Us
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; ब्रीच कँडी रुग्णालयात वैद्यकीय....
Sharad Pawar Health Update : शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; ब्रीच कँडी रुग्णालयात वैद्यकीय तपासण्या सुरू
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाचा फैसला लांबणीवर; पुढील सुनावणी कधी?
Shiv Sena Symbol Row : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाचा फैसला लांबणीवर; पुढील सुनावणी कधी?
पायल झांबरे प्रकरणाच्या सुनावणीत नेमकं काय घडलं? जाणून घ्या सविस्तर
Payal Zambare Case : पायल झांबरे प्रकरणाच्या सुनावणीत नेमकं काय घडलं? जाणून घ्या सविस्तर
आधी कर्जत-जामखेडमधून निवडून येणार का ते सांगा; उमेश पाटलांचा रोहित....
Umesh Patil On Rohit Pawar : आधी कर्जत-जामखेडमधून निवडून येणार का ते सांगा; उमेश पाटलांचा रोहित पवारांना थेट सवाल
राष्ट्रवादीच्या आमदारांची सुनेत्रा पवारांसमोर नाराजी; शिंदेंच्या....
NCP Meeting Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची सुनेत्रा पवारांसमोर नाराजी; शिंदेंच्या खात्यांबाबत उपस्थित केले प्रश्न
गोकुळच्या सत्तासंघर्षात सतेज पाटलांना मोठा धक्का; चार शासननियुक्त...
Gokul : गोकुळच्या सत्तासंघर्षात सतेज पाटलांना मोठा धक्का; चार शासननियुक्त संचालकांमुळे सत्तेचं गणितच बदललं
समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांचा धुमाकूळ; सहा महिन्यांत 8 वेळा दगडफेक
Samruddhi Highway : समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांचा धुमाकूळ; सहा महिन्यांत 8 वेळा दगडफेक, 5 वेळा लुटमार; प्रवाशांमध्ये भीती
शिवसेना सुनावणीत अपात्रतेचा पेच पुन्हा ऐरणीवर; पुढील सुनावणीकडे....
Shivsena Hearing Case : शिवसेना सुनावणीत अपात्रतेचा पेच पुन्हा ऐरणीवर; पुढील सुनावणीकडे राज्याचं लक्ष 
शिंदे गटाचे वकील मेहतांनी मांडला व्हीपचा महत्त्वाचा मुद्दा, म्हणाले...
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नवा ट्विस्ट; शिंदे गटाचे वकील ध्रुव मेहतांनी मांडला व्हीपचा महत्त्वाचा मुद्दा, म्हणाले...
आमदार-खासदार विकत घ्यायला खोक्यांचे पैसे, शेतकऱ्यांना मदत करताना शेकडो
Aaditya Thackeray : आमदार-खासदार विकत घ्यायला खोके भरून पैसे, शेतकऱ्यांना मदत करताना शेकडो अटी; आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल