AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rohit Pawar: अजितदादांचा विमान अपघात, एकनाथ शिंदेंच्या बाबतही तोच प्रकार? रोहित पवारांचा मोठा बॉम्ब, काळजाला कापरं भरणार, दावा काय?

Rohit Pawar on Eknath Shinde: आमदार रोहित पवार यांनी अजितदादांच्या विमान अपघाताविषयी पत्रकार परिषदेत एक खळबळजनक दावा केला आहे. त्यामुळे अनेक शिवसैनिकांच्या काळजाला कापरं भरलं आहे. अजितदादांसारखाच प्रकार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबात घडणार होता का? काय आहे त्यांचा दावा?

Rohit Pawar: अजितदादांचा विमान अपघात, एकनाथ शिंदेंच्या बाबतही तोच प्रकार? रोहित पवारांचा मोठा बॉम्ब, काळजाला कापरं भरणार, दावा काय?
रोहित पवार,एकनाथ शिंदे, अजित पवारImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Mar 04, 2026 | 12:24 PM
Share

Rohit Pawar on Eknath Shinde: आमदार रोहित पवार हे दिवंगत अजितदादांच्या विमान अपघातावर वारंवार शंका उपस्थित करत आहेत. अपघाताचा घटनाक्रम आणि एका महिन्यानंतर यासंबंधीत चौकशी करणाऱ्या विविध संस्थांच्या कारभारावर त्यांनी ताशेरे ओढले आहे. कुणाच्या तरी दबावाखाली हा प्रकार घडल्याचा त्यांचा गंभीर आरोप आहे. दादांचा घातपात झाल्याचा त्यांचा संशय आहे. त्यादृष्टीने त्यांनी आज चौथी पत्रकार परिषद घेतली. आजच्या पत्रकार परिषदेत ही त्यांनी अनेक दावे केले. त्यामुळे खळबळ उडाली आहे. तर अजितदादांसारखाच प्रकार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत घडणार होता असा दावा त्यांनी केल्याने शिवसैनिक आणि आमदारांच्या काळजाचा थरकाप उडाला आहे. काय आहे त्याचा हा स्फोटक दावा?

एकनाथ शिंदेंबाबत तोच प्रकार?

VSR कंपनीच्या काराभाराबाबत रोहित पवार यांनी घणाघाती टीका केली आहे. व्हीएसआर कंपनीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जीव धोक्यात आणल्याचा दावा रोहित पवार यांनी केला आहे. “कोणतंही कुठेही जात असेल तर फ्लाईट प्लान द्यावा लागतो. आंतरराष्ट्रीय प्रवास असेल तर दुसऱ्या देशांची परवानगी घेतली जाते. पण नाही घेतली तर विमान पाडलं जाऊ शकतं. एकनाथ शिंदे दावोसला जात असतानाच असं काही झालं. इराणमधून त्यांचं विमान गेलं. तुम्ही आताच्या आता नाही वळला तर तुमचं विमान पाडू, असं इराणने म्हटलं होतं. त्यात एकनाथ शिंदे बसले होते. इराणवरून इराकला विमान गेलं. इराकनेही तेच केलं. एकनाथ शिंदेंच्या बाबतही तोच प्रकार होणार होता का? याबाबतची माहिती डीजीसीएने प्रसिद्ध केली का. एकनाथ शिंदे सांगू शकतील का. पण आमच्याकडे माहिती आहे. परत ते विमान बहरीनला आणलं आणि सर्व परवानग्या घेऊन मग विमानाचं उड्डाण झालं.” असा स्फोटक दावा आमदार रोहित पवार यांनी केला.

VSR कंपनी इतकी बेजबाबदार आहे, त्याचा अनुभव 2023 मध्ये एकनाथ शिंदेंना आला. 16 ते 20 जानेवारी 2023 दरम्यान तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दावोसला प्रवास झाला होता. मुंबईहून उड्डाण केल्यानंतर पहिल्यांदा इंधन भरण्यासाठी बहरीन येथे थांबले. बहारीन वरून ते झुरिच येथे जायला निघाले. त्यावेळी इराणच्या फायटर जेटने आम्ही विमान पाडू असं सांगितल होतं. यात एकनाथ शिंदे बसले होते. त्यानंतर इराकच्या हद्दीत गेल्यावर देखील इराकने विमान पडू असं सांगितलं होतं. एवढे निष्काळजी हे VSR चे लोक आहेत, असा आरोप रोहित पवार यांनी केला.

एकनाथ शिंदेंचा जीव धोक्यात?

वीएसआर संदर्भात नवी धक्कादायक माहिती समोर या निमित्ताने समोर आली आहे. VSR चा बेजबाबदारपणा उघड झाला आहे. मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदेंचा जीव होता धोक्यात असल्याची माहिती आता समोर आली आहे. एकनाथ शिंदे हे 20 जानेवारी 2023 रोजी दावोस दौऱ्यावर जाताना इराण आणि इराककडून ओव्हरफ्लाईट परवानगी नसताना हवाई क्षेत्रात विमान टाकल्याची माहिती समोर आली आहे. दोन्ही देशांकडून फायटर प्लेनने शिंदेंचं विमान पाडू असा इशारा दिला होता.तेव्हा बेहरीन ते ज्युरिक प्रवासाचा रूट बदलावा लागला होता. अशा अनेक घोड चुका VSR कडून झाल्याची माहिती समोर येत आहे.

मालक म्हणतो माझी वरपर्यंत ओळख

दरम्यान आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत रोहित पवार यांनी एक मोठा खुलासा केला. व्हीएसआर कंपनीच्या विमानाचा मालक विजय सिंह यांचा रोहित पवार यांच्या एका माणसाला फोन आला होता.एआयबीने आम्हाला क्लीयरन्स दिलाय, माझी खालपासून वरपर्यंत ओळख आहे. अजूनही सरकारमधले लोक आमचे विमान वापरत आहेत आणि अजूनही विमान उडत आहेत, असे संभाषण रोहित पवार यांनी सांगितले.विजय सिंगचे व्हॉट्सअप्प रेकॉर्ड काढा.तो कोनाकोनला भेटला तेही तपासा. महाराष्ट्र सदनामध्ये जाऊन तो कोणाला भेटला त्याची माहिती घ्या, अशी मागणी रोहित पवारांनी केळी.

Follow Us
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
Prakash Ambedkar | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल,
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल, दिल्लीत नेमकं काय घडतंय?
शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
Abhijeet Dipke | शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या...
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या भेटीला
दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
मारो... मारो! दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
Rahul Gandhi : ..म्हणून राहुल गांधी थेट पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनला बसले, स्वत:च केला खुलासा.

Rahul Gandhi : ..म्हणून राहुल गांधी थेट पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनला बसले, स्वत:च केला खुलासा

Gold Price Today : टेन्शन टेन्शन.. सलग तिसऱ्या दिवशी सोन्याचे भाव चढेच; आज 10 ग्रॅमचा दर...

Gold Price Today : टेन्शन टेन्शन.. सलग तिसऱ्या दिवशी सोन्याचे भाव चढेच; आज 10 ग्रॅमचा दर..

CJP Protest: तर हे कोणासोबतही होऊ शकतं…विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून लाठीचार्ज, जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशन भडकली.

CJP Protest: तर हे कोणासोबतही होऊ शकतं…विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून लाठीचार्ज, जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशन भडकली

वाट लागली… भारताला मोठा फटका, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, तब्बल 200 टक्के टॅरिफ...

वाट लागली… भारताला मोठा फटका, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, तब्बल 200 टक्के टॅरिफ..

Navi Mumbai : तलवार-चॉपरचा धाक दाखवत तरूणावर जीवघेणा हल्ला, आई वाचवायला आली पण… कोपरखैरणे हादरलं.

Navi Mumbai : तलवार-चॉपरचा धाक दाखवत तरूणावर जीवघेणा हल्ला, आई वाचवायला आली पण… कोपरखैरणे हादरलं

हतबल झालोय, असहाय्य वाटतंय, माणसाची किंमतच..; CJP आंदोलनावर मराठी कलाकार व्यक्त.

हतबल झालोय, असहाय्य वाटतंय, माणसाची किंमतच..; CJP आंदोलनावर मराठी कलाकार व्यक्त