शिवसेना
शिवसेना (Shiv Sena) हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा पक्ष आहे. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी 19 जून 1966 मध्ये शिवसेनेची स्थापना केली. मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी शिवसेनेची स्थापना केली गेली. शिवसेनेने मराठी आणि मराठी माणूस हा मुद्दा हाती घेतल्याने शिवसेनेवर प्रांतवादाचा शिक्काही बसला. पण या सर्वांकडे दुर्लक्ष करत बाळासाहेब ठाकरे यांनी पक्षाची वाटचाल सुरू ठेवली. 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण हे शिवसेनेचं सुरुवातीचं ब्रिद होतं. त्यानंतर शिवसेना हळूहळू निवडणुकीच्या राजकारणात उतरली. 1989 साली शिवसेनेने भाजपसोबत युती करून निवडणुका लढवल्या. 1995मध्ये शिवसेनेला राज्यात सत्ता आली. मनोहर जोशी हे शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री झाले. त्यानंतर 1999मध्ये केंद्रातील अटल बिहारी वाजपेयी सरकारमध्येही शिवसेना सहभागी झाली होती. शिवसेनेला लोकसभेचं अध्यक्षपदही देण्यात आलं. बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे पक्षप्रमुख झाले. 2019च्या निवडणुकीत शिवसेनेचे 18 खासदार निवडून आले. मात्र, विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत महाविकास आघाडी स्थापन करून सत्ता स्थापन केली. उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री झाले. पण अडीच वर्षानंतर शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी पक्षात बंड केलं. 40 आमदार आणि 10 अपक्ष आमदारांना घेऊन शिंदे शिवसेनेतून बाहेर पडले. त्यांनी भाजपसोबत हातमिळवणी करून सत्ता स्थापन केली. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. शिवसेना कुणाची हा मुद्दा निवडणूक आयोगाकडे गेले असता आयोगाने पक्ष आणि चिन्ह शिंदे गटाला दिलं. आता हे प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे.
Read MoreDJ विरोधात भूमिका घेणाऱ्या विद्यानंद बापट यांना कॅमेऱ्यासमोरच हाणलं, नीलम गोऱ्हे यांचा संताप, शिंदे सेना जशाच तसे उत्तर देणार?
Neelam Gorhe on Vidyanand Bapat: पुण्यातील डीजेविरोधात जाहीर भूमिका घेणारे विद्यानंद बापट यांना कॅमेऱ्यासमोरच एकाने मारहाण केली. त्याविरोधात समाजातून आणि राजकीय वर्तुळातून आता संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिलेदार आणि विधान परिषदेच्या माजी उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी संताप व्यक्त केला.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Sep 3, 2026
- 1:34 pm
शिंदे गटाचा ‘सुप्रीम’ युक्तिवाद, संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया समोर; म्हणाले, वकिलांची घरे…
सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या सुनावणीवर संजय राऊत यांनी शिंदे गटाच्या युक्तिवादावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. राऊत म्हणाले की, 'पक्षांतर बंदी कायदा आणि दहाव्या शेड्यूलवर लक्ष केंद्रित करा, जुन्या पक्ष घटनेवर नाही.' ठाकरे गटाची पक्षप्रमुखांची निवड लोकशाही पद्धतीनेच झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
- भीमराव गवळी
- Updated on: Sep 3, 2026
- 12:00 pm
Vishakha Raut | ठाकरे सेनेला मुंबईत मोठा धक्का! विशाखा राऊतांची याचिका हायकोर्टाने फेटाळली; थेट नगरसेवकपदावरच टांगती तलवार
मुंबई उच्च न्यायालयाने ठाकरे सेनेच्या विशाखा राऊत यांची याचिका फेटाळल्याने त्यांच्या नगरसेवकपदावर टांगती तलवार आहे. त्यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आल्यामुळे हे पद धोक्यात आले आहे. प्रिया सरवणकर यांना हे पद मिळण्याची शक्यता आहे. याआधीही मुंबईत चार नगरसेवकांची पदे रद्द झाली आहेत.
- Harshada Gaikwad
- Updated on: Sep 3, 2026
- 10:12 am
Shivsena Hearing : सुप्रीम कोर्टात शिंदेंच्या शिवसेनेच्या युक्तिवादाचे 29 मुद्दे, 28 वा मुद्दा सर्वात खास
शिवसेनेतील एकाधिकारशाही, पक्षांतर्गत निवडणुकांचा अभाव आणि पक्षघटनेत केलेले बदल या मुद्द्यांवर शिंदे गटाचे वकील नीरज कौल यांनी सुप्रीम कोर्टात युक्तिवाद केला. निवडणूक आयोगाच्या अधिकारांना आव्हान देण्याचा ठाकरे गटाचा दावा कोर्टानेच फेटाळल्याचे ते म्हणाले. पुढील सुनावणी १५ तारखेला दुपारी अडीच वाजता होणार आहे.
- प्रिती वेद
- Updated on: Sep 2, 2026
- 8:16 pm
सिल्व्हर ओकला शिवसेना…, शिवसेना ठाकरे गटावर टीका करताना संजय शिरसाटांची जीभ घसरली, मोठं वक्तव्य
मोठी बातमी समोर येत आहे. संजय राऊत यांनी शिवसेना शिंदे गटावर जोरदार टीका केली होती. या टीकेला आता संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मात्र शिवसेना ठाकरे गटावर टीका करताना शिरसाट यांची जीभ घसरल्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
- Ajay Deshpande
- Updated on: Sep 2, 2026
- 6:19 pm
Uddhav Thackeray vs Eknath Shinde : भाजपसोबत गद्दारी, काँग्रेससोबत युती… शिंदेंच्या वकिलाचा जोरदार युक्तिवाद; काय म्हटलं नेमकं?
शिंदे गटाचे वकील नीरज कौल यांनी सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद करताना शिवसेनेतील फुटीचे कारण स्पष्ट केले. भाजपसोबत निवडणूक लढवूनही नंतर काँग्रेससोबत सत्ता स्थापन केल्याने पक्षात असंतोष वाढला आणि उठाव झाला, असे ते म्हणाले. आमचीच खरी शिवसेना असल्याचा दावा करत, पक्षांतर्गत लोकशाहीचा अभाव आणि एका व्यक्तीच्या निर्णयामुळे पक्षाची रचना बदलल्याचेही त्यांनी निदर्शनास आणले.
- भीमराव गवळी
- Updated on: Sep 2, 2026
- 4:42 pm
शिवसेना पक्ष चिन्हाबाबतची आजची सुनावणी संपली; शिंदे गटाच्या वकिलांचा नेमका युक्तिवाद काय?
सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात शिंदे गटाच्या वतीने आज युक्तिवाद संपला. नीरज किशन कौल यांनी पक्षाच्या घटनेतील बदलांवरून लोकशाहीच्या अभावावर भर दिला. पुढील सुनावणी १५ सप्टेंबर रोजी होणार आहे. दरम्यान, ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून, मुंबई उच्च न्यायालयाने विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद रद्द केले आहे.
- प्रिती वेद
- Updated on: Sep 2, 2026
- 4:34 pm
अखेर शिंदे गटाने ते कागदपत्र बाहेर काढले, सुनावणीत सुप्रीम कोर्टामध्ये मोठा ट्विस्ट; ठाकरे गटाला धक्का बसणार?
बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर शिवसेनेच्या संविधानात अनेक बदल करण्यात आले. एका सहीने जर नियुक्ती मिळत असेल तर सामान्य कार्यकर्त्यांनी काय करायला पाहिजे, असा सवाल शिंदे गटाच्या वकिलांनी उपस्थित केला.
- Prajwal Dhage
- Updated on: Sep 2, 2026
- 4:11 pm
आयोगाने सांगितलं तरी…ठाकरे गटाने केली मोठी चूक? कौल यांचा टेन्शन वाढवणारा युक्तिवाद!
सर्वोच्च न्यायालयात शिवसेना फुटीर प्रकरणाच्या सुनावणीत कौल यांनी शिंदे गटाची बाजू मांडली. आयोगाने सूचना देऊनही पक्षांतर्गत निवडणुका न घेणे, 2018 च्या घटनेतील बदल आणि पक्षप्रमुखांच्या नियुक्तीवरून त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ही पद्धत लोकशाहीविरोधी असून सदस्यांना अधिकारांपासून दूर ठेवते, असा युक्तिवाद कौल यांनी केला.
- प्रिती वेद
- Updated on: Sep 2, 2026
- 4:07 pm
Shivsena Symbol Hearing : निवडणूक आयोगाने एका रात्रीत… शिंदे गटाच्या वकिलाचा मोठा युक्तिवाद काय? सेनेतील बॉसगिरीवरच हल्ला
सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्षचिन्हावर सुनावणी सुरू असताना, शिंदे गटाचे वकील नीरज कौल यांनी 'बॉसगिरी'वर जोरदार हल्ला चढवला. त्यांनी कोणत्याही पक्षात 'बॉसचं ऐकलं नाही म्हणजे लोकं चुकली' हे चुकीचं असल्याचं म्हटलं. तसेच पक्षातील अंतर्गत निवडणुका न घेतल्याबद्दल ठाकरे गटाला धारेवर धरले. निवडणूका न घेण्यामागे 'घोडेबाजार' होण्याची भीती असल्याचे कारण अमान्य करत, निवडणूक आयोगाच्या निर्णयाची प्रक्रिया योग्य होती, असेही कौल यांनी स्पष्ट केले.
- भीमराव गवळी
- Updated on: Sep 2, 2026
- 4:47 pm
Shivsena Symbol Clash : होय निवडणूक आयोगाला तो अधिकार! शिंदे गटाच्या वकिलाने सिब्बल यांचा मुद्दा खोडला, सुनावणीत टेन्शन वाढवणारा युक्तिवाद!
आपल्या युक्तिवादात कौल यांनी 2018 सालच्या शिवसेनेच्या संविधानाचाही युक्तिवाद केला. 2018 साली काही लोकांची मनमानी पद्धतीने नियुक्ती करण्यात आली. पक्षाचे संविधान हे लोकशाहीवादी असावं, असंही सांगितलं.
- Prajwal Dhage
- Updated on: Sep 2, 2026
- 3:31 pm
शिवसेना पक्ष चिन्ह सुनावणीदरम्यान मोठा ट्विस्ट! शिंदेंचे वकिल फिरवणार डाव? नेमक्या मुद्यावर युक्तिवाद
शिवसेना पक्ष आणि चिन्ह सुनावणी सुरू झाली असून, नीरज किशन कौल यांनी युक्तिवादाला सुरुवात केली आहे. कौल यांनी २०१८ च्या शिवसेनेच्या घटनेतील बदलांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे, ज्यात अनेक पदाधिकारी लोकशाही पद्धतीने निवडून आलेले नाहीत. निवडणूक आयोगाच्या अधिकारांचा वापर योग्यच होता, असेही त्यांनी नमूद केले.
- प्रिती वेद
- Updated on: Sep 2, 2026
- 3:38 pm