Rupali Chakankar | रोहित पवारांच्या वक्तव्यावर रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया
अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर राज्यातील राजकारणात आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरूच आहे. अपघाताच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पक्षप्रमुख शरद पवार यांनी “हा अपघात आहे, यावर राजकारण करू नये,” असे स्पष्ट वक्तव्य केले होते. मात्र, त्यानंतर या प्रकरणावरून विविध नेत्यांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर आल्या.
अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर राज्यातील राजकारणात आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरूच आहे. अपघाताच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पक्षप्रमुख शरद पवार यांनी “हा अपघात आहे, यावर राजकारण करू नये,” असे स्पष्ट वक्तव्य केले होते. मात्र, त्यानंतर या प्रकरणावरून विविध नेत्यांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर आल्या. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी अलीकडेच खासगी गुप्तहेरांकडून अपघाताची चौकशी करण्याबाबत विधान केले आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा तथा राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या, “शरद पवार यांनी त्याच दिवशी हा अपघात असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, त्यानंतर अनेकांच्या मनात शंका निर्माण झाल्या असतील किंवा रोहित पवार ज्या पद्धतीने प्रश्न उपस्थित करत आहेत, त्यांच्या मनात काही संशय असेल, तर त्या शंकेचे निरसन झाले पाहिजे.” चाकणकर यांनी यावेळी पारदर्शक चौकशीची गरज आहे असे अधोरेखित करत, सत्य समोर येणे महत्त्वाचे असल्याचे नमूद केले.
Published on: Feb 17, 2026 02:06 PM
उद्धव ठाकरेंच्या उपस्थित रामरक्षा पठणाला सुरुवात; पहा व्हिडीओ
उद्धव ठाकरेंच्या राम रक्षा आंदोलनासाठी महंत आणि पंडित दादरमध्ये दाखल
धो-धो पावसादरम्यानच गेले फिरायला अन् दोघं... पांडवकडा धबधब्यावर मोठी
खरंच काँग्रेसचा आमदार शिंदेंच्या संपर्कात? 20 कोटींची ऑफर...खुद्द नेता

