AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Satej Patil News: थेट दिल्लीतून आदेश… ‘गोकुळ’ गाजवणाऱ्या सतेज पाटलांकडे मोठी जबाबदारी!

गोकुळच्या निवडणुकीनंतर घडलेल्या नाट्यमय घडामोडींमुळे सत्ता येऊनही अध्यक्षपद महायुतीकडे गेले. परंतु, या राजकीय राड्यामध्ये सतेज पाटील यांच्या एकाकी लढ्याची गल्ली ते दिल्ली सर्वत्र चर्चा झाली. गोकुळची निवडणूक गाजवल्यानंतर चर्चेत आलेल्या सतेज पाटील यांच्यावर आता काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी अत्यंत महत्त्वाची जबाबदारी दिली आहे. 

Satej Patil News: थेट दिल्लीतून आदेश... 'गोकुळ' गाजवणाऱ्या सतेज पाटलांकडे मोठी जबाबदारी!
| Updated on: Nov 17, 2026 | 9:45 PM
Share

Satej Patil News: नुकतीच गोकुळ दूध संघाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी महायुतीला धक्का देत सत्ता मिळवली. मात्र निवडणुकीनंतर घडलेल्या नाट्यमय घडामोडींमुळे सत्ता येऊनही अध्यक्षपद महायुतीकडे गेले. परंतु, या राजकीय राड्यामध्ये सतेज पाटील यांच्या एकाकी लढ्याची गल्ली ते दिल्ली सर्वत्र चर्चा झाली. गोकुळची निवडणूक गाजवल्यानंतर चर्चेत आलेल्या सतेज पाटील यांच्यावर आता काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी अत्यंत महत्त्वाची जबाबदारी दिली आहे.

काँग्रेसकडून सतेज पाटलांना मोठी जबाबदारी! 

याबाबत सविस्तर वृत्त असे की, काँग्रेसचे महाराष्ट्रातील प्रमुख नेते, विधान परिषदेचे आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्यकडे काँग्रेस पक्षाने मोठी जबाबदारी दिली आहे. आगामी गोवा विधानसभा निवडणुकांसाठी अखिल भारतीय काँग्रेसने कमिटीने स्क्रीनिंग कमिटी स्थापन केली आहे. या कमिटीमध्ये सतेज पाटील यांनाही स्थान देण्यात आहे.

राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निर्देशानुसार पक्षाचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांनी याबाबतचे प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. गोवा विधानसभा स्थापन केलेल्या या स्क्रीनिंग कमिटीच्या अध्यक्षपदी के. जे. जॉर्ज यांची नियुक्ती करण्यात आली असून सतेज पाटील यांच्यासह खासदार शफी परंबिल यांनाही सदस्य म्हणून स्थान देण्यात आले आहे.

या समितीच्या माध्यमातून सतेज पाटील यांची गोवा विधानसभा निवडणुकीत उमेदवारांची छाननी आणि निवड प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका असणार आहे. उमेदवारांची लोकप्रियता, संघटनात्मक ताकद तसेच निवडणुकीबाबतची तयारी याबाबत ही समिती काम करणार असून यामाध्यमातूनच उमेदवार निवडले जाणार आहेत. या निवडीबद्दल सतेज उर्फ बंटी पाटील यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, पक्षाचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांचे आभार मानले आहेत.

गोकुळमध्ये एकाकी लढा! 

दरम्यान, गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी बलाढ्य महायुतीविरोधात एकाकी लढा दिला. महायुतीसाठी निवडणूक एकतर्फी वाटत असताना सतेज पाटील यांनी मैदानात उतरत 13 संचालक निवडून आणले. सतेज पाटील यांच्याकडे 12विरुद्ध 12 अशी विजयी आघाडी होती, मात्र सरकारने चार स्विकृत सदस्यांची नेमणूक करत गोकुळवर सत्ता मिळवली. अध्यक्षांच्या निवडणुकीत 16 मते मिळवत राजेंद्र पाटील हे नवे चेअरमन म्हणून नियुक्त झाले.

Follow Us
हप्त्याचे पैसे ठरले जीवघेणे, आयफोनच्या EMI वरून वाद; मित्रानेच केली...
Panvel : हप्त्याचे पैसे ठरले जीवघेणे, आयफोनच्या EMI वरून वाद; मित्रानेच केली मित्राची हत्या
चकाट्या पिटणारा गृहमंत्री, उद्धव ठाकरे भडकले नेमकं काय म्हणाले?
Tv9 Marathi Special Report : चकाट्या पिटणारा गृहमंत्री, उद्धव ठाकरे भडकले नेमकं काय म्हणाले?
खजूर, दालचिनीपासून सुपारी अन् पेढ्यांपर्यंत, FDAची कारवाई
FDA : खजूर, दालचिनीपासून सुपारी अन् पेढ्यांपर्यंत, FDAची कारवाई; राज्यभरातून 1 कोटी 97 लाखांचा साठा जप्त
जळगाव जिल्हा बँकेत महायुतीची बाजी; 21 पैकी 12 जागांवर उमेदवार बिनविरोध
Jalgaon District Bank Election : जळगाव जिल्हा बँकेत महायुतीची बाजी; 21 पैकी 12 जागांवर उमेदवार बिनविरोध
बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी केसरकरांना घेरलं; शिवसैनिकांची 50 खोके...
Shivsena : Deepak Kesarkar : बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी दीपक केसरकरांना घेरलं; शिवसैनिकांची 50 खोके, एकदम ओके म्हणत जोरदार घोषणाबाजी
मुली मुलांवर नाही, पैशावर प्रेम करतात; इंदुरीकरांचं पुन्हा वादग्रस्त..
Indurikar Maharaj : मुली मुलांवर नाही, पैशावर प्रेम करतात; इंदुरीकर महाराजांचं मीरा-भाईंदरमधील वक्तव्य, नव्या वादाची शक्यता
एक युग संपलं... CSK चा कणा, चाहत्यांचा लाडका थाला आता खेळाडू म्हणून...
MS Dhoni Retires from IPL : एक युग संपलं... CSK चा कणा, चाहत्यांचा लाडका थाला आता खेळाडू म्हणून IPL मध्ये दिसणार नाही, ही नवी जबाबदारी सांभाळणार
योगेश कदम ते दादा भुसे… पाच आमदारांच्या सह्यांचा उल्लेख; शिवसेना....
Shivsena : योगेश कदम ते दादा भुसे… पाच आमदारांच्या सह्यांचा उल्लेख; शिवसेना सुनावणीत ध्रुव मेहतांचा युक्तिवाद
शिवसेना पक्षाच्या सुनावणीत ध्रुव मेहतांचा मोठा युक्तिवाद; सुनील प्रभू
Shivsena : शिवसेना पक्षाच्या सुनावणीत ध्रुव मेहतांचा मोठा युक्तिवाद; सुनील प्रभूंच्या व्हीपमध्ये.....
....तर मी माझं दुकान बंद करेन, माझी शिवसेना मी बंद करेन; नरेश म्हस्के
Naresh Mhaske : ....तर मी माझं दुकान बंद करेन, माझी शिवसेना मी बंद करेन; नरेश म्हस्के असं का म्हणाले?