राज्य कामगार विमा योजनेच्या कर्मचाऱ्याला 50 हजाराची लाच घेताना अटक
वैद्यकीय उपकरण कंपनीची थकीत बिल मंजूर करण्यासाठी त्यांनी साडे सात लाखांची लाच मागून त्यापैकी ५० हजाराचा पहिला हप्ता स्वीकारताना राज्य कामगार विमा योजनेच्या कर्मचाऱ्याला लाचलुचपत अधिकाऱ्यांनी अटक केली आहे.

राज्य कामगार विमा योजनेच्या लेखा अधिकारी आणि सहाय्यक संचालक जितेंद्र साखरकर यांना पन्नास हजाराची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली आहे. वैद्यकीय उपकरण कंपनीची थकीत बिले मंजूर करण्यासाठी साखरकर यांनी साडे सात लाखांची लाच मागितली होती.जितेंद्र साखरकर यांचा मोबाईल जप्त करण्यात आला असून त्यांच्या घराची झडती सुरु आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने राज्य कामगार विमा योजनेचे कर्मचारी जितेंद्र साखरकर यांना ५० हजाराची लाच घेताना अटक करण्यात आली आहे. वैद्यकीय उपकरण कंपनीची थकीत बिल मंजूर करण्यासाठी त्यांनी साडे सात लाखांची लाच मागितली होती. कार्यालयाने तक्रारदार यांच्या कंपनीस वैद्यकीय उपकरण पुरवण्याचे एकूण रु 16.28 कोटीचे दिनांक 4/2/26 आणि 13/10/26 रोजी कार्यादेश दिले आहेत. त्याप्रमाणे तक्रारदार यांनी वैद्यकीय उपकरणांचा पुरवठा करून बिले मंजूरसाठी कार्यालयात जमा करण्यात आले होते.
गेल्या ७ महिन्यांपासून बिल पेंडिंग असल्याने तक्रारदार हे लोकसेवकाकडे पाठपुरवा करत होते. त्यादरम्यान लोकसेवकांनी तक्रारदारांकडे बिल मंजूर झाल्यानंतर पैसे द्यावे लागेल अशी मागणी केली होती. लोकसेवक यांच्या कार्यालयाने दिनांक 16/11/26 रोजी Rs 7.5 कोटीचे बिल मंजूर करून दिले. त्यानंतर लोकसेवक यांनी तक्रारदार यांना दिनांक 16 नोव्हेंबर 26 रोजी त्यांचे कार्यालयात भेटण्यास बोलावून त्यांचेकडे केलेल्या कामाचा मोबदला म्हणून 7,50,000/- रु मागणी केली होती. १६ नोव्हेंबरला करण्यात आलेल्या पडताळणी दरम्यान लोकसेवकाने तक्रारदार यांच्याकडे रु 7,50,000/- लाचेची मागणी करून आज शक्य होईल तेवढी रक्कम स्वीकारण्याचे निश्चित केले.
दिनांक 16 नोव्हेंबर 2026 रोजी रचण्यात आलेल्या सापळ्यात लोकसेवकाने तक्रारदार यांच्याकडून लाचेची रक्कम पैकी रु 50,000/- स्वीकारताना त्यांना रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपी लोकसेवकाचा मोबाईल जप्त करण्यात आला असून त्यांच्या घराची झडती सध्या सुरू आहे.
