AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चेहरा पाहिला तर अपशकुनी वाटतो, ते जनतेतून कधीच निवडून येणार नाहीत, शिंदेंच्या आमदाराची अनिकेत तटकरेंवर बोचरी टीका

Mahendra Dalvi Targets Aniket Tatkare: अनिकेत तटकरे जनतेतून कधीच निवडून येणार नाहीत, असं म्हणत महेंद्र दळवींनी जहरी टीका केली आहे. तटकरे कुटुंबावरही निशाणा साधला आहे.

चेहरा पाहिला तर अपशकुनी वाटतो, ते जनतेतून कधीच निवडून येणार नाहीत, शिंदेंच्या आमदाराची अनिकेत तटकरेंवर बोचरी टीका
Mahendra Dalvi's Controversial Remark Against Aniket Tatkare
| Updated on: Nov 16, 2026 | 10:58 PM
Share

रायगडच्या राजकारणात पुन्हा एकदा तटकरे विरुद्ध दळवी असा राजकीय संघर्ष पेटला आहे. अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी रायगडचे आमदार अनिकेत तटकरे यांच्यावर अत्यंत आक्रमक शब्दांत टीका केली आहे. अनिकेत तटकरे हे जनतेतून कधीच निवडून येऊ शकणार नाहीत, असा दावा करत दळवींनी त्यांच्या राजकीय वाटचालीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. तटकरे कुटुंबातील राजकीय वारशावरही त्यांनी निशाणा साधला. त्यांच्या या विधानामुळे रायगडमधील राजकीय वातावरण चांगलंच तापण्याची शक्यता आहे.

अनिकेत तटकरे यांच्यावर टीका करताना महेंद्र दळवी यांनी सरोगसीचा उल्लेख केला. सरोगसी बाळ या शब्दाचं स्पेलिंग तू लिहून दाखव. मी तुला फळ्यावर सगळं लिहून दाखवतो. त्याची प्रक्रिया सांगतो, असं आव्हान देत त्यांनी खोचक टिप्पणी केली. पुढे बोलताना ते म्हणाले की, अनिकेत तटकरे जनतेतून कधीच निवडून येणार नाहीत. ते कायम वडील किंवा बहिणीचा हात धरून राजकारणात पुढे येण्याचा प्रयत्न करतील, असा टोला त्यांनी लगावला. त्यांच्या चेहऱ्याबाबतही दळवींनी वादग्रस्त टिप्पणी केली.

या विधानामुळे राजकीय वर्तुळात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. तटकरे कुटुंबाच्या राजकीय प्रभावावरही दळवींनी भाष्य केलं. घरात चुलते-पुतणे आणि आता तिसरी पिढीही राजकारणात लॉन्च होत आहे. मग इतरांनी काय फक्त कपडे धुवायचे का? असा सवाल करत त्यांनी तटकरे कुटुंबावर निशाणा साधला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आपला विरोध नसून तटकरे कुटुंबाला आपला कडवा विरोध कायम असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनाही लक्ष्य केलं. सुनील तटकरे यांना पराभूत करण्यासाठी आपण पूर्ण ताकदीने मैदानात उतरणार असल्याचा इशारा महेंद्र दळवींनी दिला. त्यामुळे आगामी काळात रायगडच्या राजकारणात तटकरे विरुद्ध दळवी संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हं आहेत. दळवींनी यावेळी राजकीय समीकरणांवर भाष्य करत एक आणा, दोन आणे आणि आमचे बारा आणे असा राजकीय हिशेबही मांडला.

तसेच महाराष्ट्राच्या मंत्री असलेल्या तटकरे कुटुंबातील संबंधित महिला नेत्याबद्दल आदर असल्याचं सांगत त्यांनी अधिक बोलणं टाळलं. दुसरीकडे, शरद पवार यांनी आता मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहावं, असा खोचक सल्लाही त्यांनी दिला. एकंदरीत अनिकेत तटकरे यांच्यावरील वैयक्तिक टीका, तटकरे कुटुंबाच्या राजकीय वारशावर केलेले सवाल आणि सुनील तटकरे यांना पराभूत करण्याचा निर्धार यामुळे रायगडमधील राजकीय संघर्षाला नवं वळण मिळालं आहे.

Follow Us
'ते' मफलरमॅन फडणवीस? रोहित पवारांचा आरोप; थेट व्हिडीओच दाखवला
Rohit Pawar : 'ते' मफलरमॅन फडणवीस? रोहित पवारांचा आरोप; थेट व्हिडीओच दाखवला
अजितदादांच्या आठवणीने फडणवीस भावुक; अमित शाहांकडे केली मागणी...
अजितदादांच्या आठवणीने फडणवीस भावुक; चौकशी अहवालाबाबत अमित शाहांकडे केली मोठी मागणी!
गृहमंत्री शाहांकडून दादांचं भरभरुन कौतुक; सांगितला 'तो' किस्सा
Amit Shah Speech : गृहमंत्री शाहांकडून दादांचं भरभरुन कौतुक; सांगितला 'तो' किस्सा
अजित दादांनी राजकारणापलीकडे नातं जपण्याचं काम केलं; शिंदेंचं विधान
अजित दादांनी राजकारणापलीकडे नातं जपण्याचं काम केलं; एकनाथ शिंदे यांचं भावनिक विधान
पुण्यात अजितदादांच्या पुतळ्याचे अनावरण; सुनेत्रा पवार भावुक...
Sunetra Pawar : पुण्यात अजितदादांच्या पुतळ्याचे अनावरण; सुनेत्रा पवार भावुक
लातूर बँक निवडणुकीत धीरज देशमुखांचा दबदबा! 19 पैकी 19 जागांचा निकाल पह
लातूर बँक निवडणुकीत धीरज देशमुखांचा दबदबा! 19 पैकी 19 जागांचा निकाल पहा...
मुलगी नताशाच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड ठाम भूमिका; शरद पवारांचा...
मुलगी नताशाच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड ठाम भूमिका; शरद पवारांचा उल्लेख करत म्हणाले...
बिनविरोध निवडीचा मान कायम! जय शाह पुन्हा सांभाळणार आयसीसीची धुरा
Jay Shah : बिनविरोध निवडीचा मान कायम! जय शाह पुन्हा सांभाळणार आयसीसीची धुरा
अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याबाहेर गोळीबाराचा कट उधळला; बिश्नोई
अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याबाहेर गोळीबाराचा कट उधळला; बिश्नोई गँगशी कनेक्शन उघड
पुण्यात दिवंगत नेते अजित पवारांच्या पुतळ्याचे अनावरण; अमित शाहांसह...
पुण्यात दिवंगत नेते अजित पवारांच्या पुतळ्याचे अनावरण; अमित शाहांसह अनेक नेत्यांची उपस्थिती!