AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बिस्किटच्या डब्ब्यात दडलं होतं नशीब! नवऱ्याचं 50 वर्षांपूर्वीचं गुपित उघडलं आणि विधवा झाली मालामाल

पतीच्या निधनानंतर आर्थिक अडचणीत आलेल्या एका महिलेला घरातील साफसफाई करताना बिस्किटच्या जुन्या डब्यात सोन्याची नाणी सापडली. तिच्या मृत पतीने 50 वर्षांपूर्वी खरेदी केलेली ही 62 सोन्याची नाणी 1.13 लाख पाउंडला विकली गेली. या अनपेक्षित खजिन्यामुळे तिचे नशीब रातोरात पालटले आणि ती कोट्यधीश बनली, ज्यामुळे तिचे जीवन सुरक्षित झाले.

बिस्किटच्या डब्ब्यात दडलं होतं नशीब! नवऱ्याचं 50 वर्षांपूर्वीचं गुपित उघडलं आणि विधवा झाली मालामाल
hidden gold coinsImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 16, 2026 | 10:34 PM
Share

एका महिलेच्या नवऱ्याचा मृत्यू झाला. त्यामुळे ही महिला टेन्शनमध्ये आली होती. पुढे आयुष्य कसं काढायचं? हा प्रश्न तिच्यासमोर होता. घर खर्च कसा चालवायचा? नोकरी कुठे मिळेल? असा प्रश्न तिला पडला होता. पण तिने हिंमत हारली नाही. कंबरेला पदर खोवला आणि परत आयुष्य जगण्यासाठी उभी राहिली. एके दिवशी तिने घरातील स्टोअर रुम आणि शेडची साफसफाई करण्याचा निर्णय घेतला. तिने स्टोअर रुममधील कानाकोपऱ्यातून भंगार काढलं. ही सारवासारव करत असतानाच तिचं लक्ष एका डब्ब्याकडे गेलं. हा पत्र्याचा डब्बा तिने उघडून पाहिला आणि तिचे डोळेच चमकले. तिचं नशीब रातोरात बदललं.

इंग्लंडच्या कॉर्नवाल येथील पनेजान्स येथील ही घटना आहे. घराच्या बगीच्यातील शेड आणि स्टोअर रुमची ती साफसफाई करत होती. त्यावेळी तिला पत्र्याच्या डब्ब्यात धुळीने माखलेला एक बिस्किटचा डब्बा सापडला. त्यावेळी आपल्या हातात कोट्यवधीचा खजिना आलाय याची तिला थोडीही कल्पना नव्हती. ती हा डब्बा घेऊन थेट लिलाव घरात म्हणजे लेज ऑक्शनियर्सजवळ गेली. त्यात ठेवलेली वस्तू काय आहे हे जाणून घेण्याची तिला उत्सुकता होती.

सुरुवातीला लिलाव घरातील कर्मचाऱ्यांनाही हा साधारण डब्बा वाटला. डब्ब्याच्या वरच्या भागात घरातील काही किरकोळ सामान होतं आणि काही चांदीची नाणी होती. पण एक्सपर्ट्सने जेव्हा हा डब्बा खोलून त्याची सखोल पाहणी केली, तेव्हा त्यांनाही धक्काच बसला. त्या डब्ब्यात तळाला त्यांना सोन्यांच्या नाण्याचा एक साठाच सापडला. हे संपूर्ण सोनं असली होतं. ओरिजिनल मिंट पॅकेजिंगमध्ये ते सुरक्षित ठेवलेलं होतं.

62 सोन्याची नाणी

‘द इंडिपेंडेंट’च्या वृत्तानुसार, डब्ब्याच्या वर आधी चांदीची नाणी होती. त्यानंतर खाली सोन्याची नाणी ठेवली होती. एक दोन नव्हे तर संपूर्ण 62 सोन्याची नाणी या डब्ब्यात होती. त्यामुळे ही महिला रातोरात श्रीमंत बनली आहे.

कुठून आलं सोनं?

या महिलेच्या नवऱ्याने 50 वर्षापूर्वी म्हणजे 1975 मध्ये ही सोन्याची नाणी खरेदी केली होती. त्यावेळी ब्रिटनची आर्थिक स्थिती वाईट होती. महागाई वाढली होती. त्यामुळे भविष्याची काळजी म्हणून या महिलेच्या नवऱ्याने 70 ते 80 पाऊंड प्रति दराने ही नाणी खरेदी केली होती. विशेष म्हणजे त्याने या खरेदीची माहिती त्याच्या घरातील कुणालाच दिली नव्हती. त्याने ही नाणी बिस्किटच्या डब्ब्यात भरून शेडमध्ये लपवली होती. त्यानंतर तोही याबाबत विसरून गेला होता. त्याने त्या काळात अगदी कवडीमोल भावात हे सोनं खरेदी केलं होतं. आज ते अत्यंत महागडं ठरलं आहे.

किती कोटीला विकलं?

त्यानंतर या 62 सोन्याच्या नाण्यांचा लिलाव करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही नाणी खरेदी करण्यासाठी ब्रिटनमधील शेकडो लोक आले. सोन्यात गुंतवणूक करणारे आणि खरेदीदारींनी तर गर्दीच केली. त्यामुळे या सोन्याच्या नाण्यांना मोठी बोली लागली. या बिस्किटच्या डब्ब्यातून निघालेली ही प्रत्येक नाणी विकल्या गेली. ही सर्व नाणी 1,13,000 पाउंड म्हणजे भारतीय रुपयानुसार सवा कोटीहून अधिक किंमतीला विकली गेली. लिलावातील ही सर्व रक्कम या विधवा महिलेला देण्यात आली. नवऱ्याच्या मृत्यूनंतर एकाकी पडलेली ही महिला एका रात्रीत गर्भश्रीमंत झाली.

Follow Us
'ते' मफलरमॅन फडणवीस? रोहित पवारांचा आरोप; थेट व्हिडीओच दाखवला
Rohit Pawar : 'ते' मफलरमॅन फडणवीस? रोहित पवारांचा आरोप; थेट व्हिडीओच दाखवला
अजितदादांच्या आठवणीने फडणवीस भावुक; अमित शाहांकडे केली मागणी...
अजितदादांच्या आठवणीने फडणवीस भावुक; चौकशी अहवालाबाबत अमित शाहांकडे केली मोठी मागणी!
गृहमंत्री शाहांकडून दादांचं भरभरुन कौतुक; सांगितला 'तो' किस्सा
Amit Shah Speech : गृहमंत्री शाहांकडून दादांचं भरभरुन कौतुक; सांगितला 'तो' किस्सा
अजित दादांनी राजकारणापलीकडे नातं जपण्याचं काम केलं; शिंदेंचं विधान
अजित दादांनी राजकारणापलीकडे नातं जपण्याचं काम केलं; एकनाथ शिंदे यांचं भावनिक विधान
पुण्यात अजितदादांच्या पुतळ्याचे अनावरण; सुनेत्रा पवार भावुक...
Sunetra Pawar : पुण्यात अजितदादांच्या पुतळ्याचे अनावरण; सुनेत्रा पवार भावुक
लातूर बँक निवडणुकीत धीरज देशमुखांचा दबदबा! 19 पैकी 19 जागांचा निकाल पह
लातूर बँक निवडणुकीत धीरज देशमुखांचा दबदबा! 19 पैकी 19 जागांचा निकाल पहा...
मुलगी नताशाच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड ठाम भूमिका; शरद पवारांचा...
मुलगी नताशाच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड ठाम भूमिका; शरद पवारांचा उल्लेख करत म्हणाले...
बिनविरोध निवडीचा मान कायम! जय शाह पुन्हा सांभाळणार आयसीसीची धुरा
Jay Shah : बिनविरोध निवडीचा मान कायम! जय शाह पुन्हा सांभाळणार आयसीसीची धुरा
अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याबाहेर गोळीबाराचा कट उधळला; बिश्नोई
अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याबाहेर गोळीबाराचा कट उधळला; बिश्नोई गँगशी कनेक्शन उघड
पुण्यात दिवंगत नेते अजित पवारांच्या पुतळ्याचे अनावरण; अमित शाहांसह...
पुण्यात दिवंगत नेते अजित पवारांच्या पुतळ्याचे अनावरण; अमित शाहांसह अनेक नेत्यांची उपस्थिती!