AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रेशनपाणी भरा, बॅगा तयार ठेवा! पलायन करावं लागू शकतं, ब्रिटनमध्ये एमर्जन्सी लिस्ट जारी

ब्रिटन सरकारने नागरिकांना संभाव्य आणीबाणीसाठी तयार राहण्याची सूचना केली आहे. पोलर व्हॉर्टेक्समुळे येणाऱ्या तीव्र थंडीच्या लाटेचा आणि सायबर हल्ल्यांसारख्या इतर धोक्यांचा सामना करण्यासाठी नागरिकांना आवश्यक वस्तूंची किट तयार ठेवण्यास सांगितले आहे. पाणी, अन्न, औषधे आणि इतर मूलभूत गरजांसाठी किमान तीन दिवसांचे सामान जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

रेशनपाणी भरा, बॅगा तयार ठेवा! पलायन करावं लागू शकतं, ब्रिटनमध्ये एमर्जन्सी लिस्ट जारी
UK emergency warningImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 16, 2026 | 10:18 PM
Share

एकदा विचार करा. सरकारनेच जर तुम्हाला रेशनपाणी भरून ठेवा, बॅगा सज्ज ठेवा. पलायन करण्याची वेळ येऊ शकते, असं म्हटलं तर काय होईल? ब्रिटनमध्ये असंच झालंय. सरकारने नागरिकांना वॉर्निंग दिली आहे. एक किटबॅग भरून ठेवण्यास सरकारने सांगितलं आहे. सरकारने स्वत:चा 15 महत्त्वाच्या सामानांची यादीच नागरिकांना दिली आहे. हे सामान नागरिकांना भरून ठेवावं लागणार आहे. काही दिवस तरी पुरेल एवढ्या या सामानांची ही लिस्ट आहे.

ब्रिटनमध्ये सध्या एक मोठं संकट निर्माण झालं आहे. हवामानाचं हे संकट आहे. त्यामुळे सर्वच हादरून गेले आहेत. पोलर वोर्टेक्स अचानक कोसळणार आहे. त्यामुळे नोव्हेंबरच्या अखेरीपासून डिसेंबरपर्यंत देशात थंडीची तीव्र लाट येणार आहे, असं हवामान विभागाने म्हटलं आहे. अचानक स्ट्रॅटोस्फेरिक वार्मिंगच्या घटनेने पोलर वोर्टेक्सला ऋतूच्या सुरुवातीलाच अत्यंत कमजोर केलं आहे. अशी घटना यापूर्वी कधीच घडली नव्हती. ही अत्यंत दुर्मिळ घटना आहे, असं मॅट ऑफिसच्या हवामान शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे.

ब्रिटनला धोका

एकीकडे पोलर वोर्टेक्सचा धोका आणि दुसरीकडे सातत्याने येत असलेल्या वादळामुळे आधीच तयारी करून ठेवणं योग्य राहणार असल्याचं सरकारला वाटत आहे. ब्रिटिश संरक्षण मंत्री वेस स्ट्रीटिंग यांनी प्रत्येक धोक्याचा सामना करण्यासाठी तयार राहण्यास सांगितलं आहे. यात इंटरनेट, पेमेंट सिस्टिमपासून वीज आणि सरकारी प्रणालीवर सायबर हल्ल्याचीही भीती वर्तवली आहे. सुरक्षेसाठी पलायन करण्याकरिता घराजवळचा सर्वात चांगला रस्ता शोधून ठेवा. जवळच्याच सार्वजनिक ठिकाणी भेटण्याचा प्लान करा, असं वेस यांनी म्हटलं आहे.

जेव्हा पृथ्वीच्या ध्रुवांच्या आसपास अतिशय उंचावर घोंघावणाऱ्या अत्यंत वेगवान थंड हवेच्या विशाल वादळासारखी सिस्टिम बनते, तेव्हा त्याला पोलर वोर्टेक्स म्हटलं जातं. यामुळे कडाक्याची आणि जीवघेणी थंडी पडते. पोलर वोर्टेक्स कमकुवत होतो किंवा क्षीण होऊन जातो, तेव्हा हा हिमवारा दक्षिणेकडे पसरतो. त्यामुळे जीवघेणी थंडी पडते. यामुळे स्थिर अटलांटिक जेट स्ट्रिमला धोका पोहोचवण्याची शक्यता असल्याने ब्रिटनसाठी हा मोठा धोका आहे.

सरकार काय म्हणाले?

सरकारने ब्रिटिश नागरिकांना सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. तसेच आणीबाणीच्या प्रसंगाला समोरे जाण्याचा सल्ला दिला आहे. कॅबिनेट ऑफिसने ऑक्टोबरच्या शेवटी आपात्कालीन परिस्थितीसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या. प्रत्येक घरात कमीत कमी तीन दिवस पुरेल एवढं सामान साठवून ठेवण्याचा सल्लाही दिला होता.

या वस्तू बॅगेत ठेवा

बाटलीबंद पाणी, डिब्बाबंद सुके जेवण, हँड सॅनिटायजर, वेट वाइप्स, बाथरूमचं सामान, टॉर्च आणि अतिरिक्त बॅटऱ्या, कांबळ, स्लीपिंग बॅग आणि उष्ण कपडे, बत्तीगुल झाल्यावर अपडेटसाठी एफएम, फुल चार्ज पॉवर बँक, रोक रक्कम आणि कार्ड. आयडी कार्डची कॉपी, डायरीत फोन नंबर लिहून ठेवा. त्याशिवाय फर्स्ट एड किट आणि औषधेही सोबत ठेवा. मुलं आणि पाळीव प्राणी असतील तर त्यांच्यासाठीच्या आवश्यक गोष्टीही सोबत ठेवण्याचा सरकारने सल्ला दिला आहे.

Follow Us
'ते' मफलरमॅन फडणवीस? रोहित पवारांचा आरोप; थेट व्हिडीओच दाखवला
Rohit Pawar : 'ते' मफलरमॅन फडणवीस? रोहित पवारांचा आरोप; थेट व्हिडीओच दाखवला
अजितदादांच्या आठवणीने फडणवीस भावुक; अमित शाहांकडे केली मागणी...
अजितदादांच्या आठवणीने फडणवीस भावुक; चौकशी अहवालाबाबत अमित शाहांकडे केली मोठी मागणी!
गृहमंत्री शाहांकडून दादांचं भरभरुन कौतुक; सांगितला 'तो' किस्सा
Amit Shah Speech : गृहमंत्री शाहांकडून दादांचं भरभरुन कौतुक; सांगितला 'तो' किस्सा
अजित दादांनी राजकारणापलीकडे नातं जपण्याचं काम केलं; शिंदेंचं विधान
अजित दादांनी राजकारणापलीकडे नातं जपण्याचं काम केलं; एकनाथ शिंदे यांचं भावनिक विधान
पुण्यात अजितदादांच्या पुतळ्याचे अनावरण; सुनेत्रा पवार भावुक...
Sunetra Pawar : पुण्यात अजितदादांच्या पुतळ्याचे अनावरण; सुनेत्रा पवार भावुक
लातूर बँक निवडणुकीत धीरज देशमुखांचा दबदबा! 19 पैकी 19 जागांचा निकाल पह
लातूर बँक निवडणुकीत धीरज देशमुखांचा दबदबा! 19 पैकी 19 जागांचा निकाल पहा...
मुलगी नताशाच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड ठाम भूमिका; शरद पवारांचा...
मुलगी नताशाच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड ठाम भूमिका; शरद पवारांचा उल्लेख करत म्हणाले...
बिनविरोध निवडीचा मान कायम! जय शाह पुन्हा सांभाळणार आयसीसीची धुरा
Jay Shah : बिनविरोध निवडीचा मान कायम! जय शाह पुन्हा सांभाळणार आयसीसीची धुरा
अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याबाहेर गोळीबाराचा कट उधळला; बिश्नोई
अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याबाहेर गोळीबाराचा कट उधळला; बिश्नोई गँगशी कनेक्शन उघड
पुण्यात दिवंगत नेते अजित पवारांच्या पुतळ्याचे अनावरण; अमित शाहांसह...
पुण्यात दिवंगत नेते अजित पवारांच्या पुतळ्याचे अनावरण; अमित शाहांसह अनेक नेत्यांची उपस्थिती!