AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Shastra : घरात या तीन मूर्ती असाव्यातच, आयुष्यात कधी पैसा कमी पडणार नाही

हिंदू धर्मामध्ये वास्तुशास्त्र खूप महत्त्वाचं मानलं गेलं आहे. वास्तुशास्त्रानुसार अशा काही मूर्ती आहेत, ज्या मूर्ती जर एखाद्या घरात असतील तर त्या घरात आयुष्यात कधी पैशांची कमी पडत नाही, आज आपण त्याबद्दलच जाणून घेणार आहोत.

Vastu Shastra : घरात या तीन मूर्ती असाव्यातच, आयुष्यात कधी पैसा कमी पडणार नाही
Vastu ShastraImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 16, 2026 | 10:01 PM
Share

हिंदू धर्मशास्त्रामध्ये वास्तुशास्त्राला खूप महत्त्वाचं मानलं गेलं आहे. वास्तुशास्त्रामध्ये केवळ तुमचं घर कसं असावं? किंवा त्याची रचना कशी असावी याबद्दलच माहिती देण्यात आली नाही. तर आपल्याला आपल्या दैनंदिन आयुष्यात ज्या काही समस्या भेडसावतात, जसं की काहीही कारण नसताना घरात सारखी भांडणं होत राहतात, सारख्या आर्थिक समस्या येतात. हातात पैसा टिकत नाही, यावर देखील  वास्तुशास्त्रामध्ये काही उपाय सांगण्यात आले आहेत. वास्तुशास्त्रानुसार अशा काही मूर्ती असतात, ज्या घरात चुंबकाप्रमाणे पैसा खेचून आणतात. या मूर्ती  घरात असल्या पाहिजेत. आज आपण अशाच काही मूर्तींबद्दल जाणून घेणार आहोत.

बालाजीची मूर्ती – वास्तुशास्त्रानुसार तुमच्या देवघरात एकतरी बालाजीची मूर्ती ही हवीच. ज्या घरात बालाजीची मूर्ती असते, अशा घरात सदैव सुख, समृद्धी नांदते. अशा घरात कधीही पैशांची समस्या येत नाही. तसेच खर्चावर देखील नियंत्रण राहते. सतत कुटुंबातील माणसांची प्रगती होत राहते, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. त्यामुळे तुमच्या देवघरात बालाजीची मूर्ती असावी, असा सल्ला वास्तुशास्त्रामध्ये देण्यता आला आहे.

लक्ष्मीची मूर्ती – लक्ष्मी मातेला धनाची देवता मानलं जातं. ज्या व्यक्तीवर लक्ष्मी माता प्रसन्न होते, त्याला त्याच्या आयुष्यात कधीही धनाची कमी भासत नाही, असा व्यक्ती श्रीमंत होतो. घरातील सर्व प्रकारच्या नकारात्मक शक्ती नष्ट होतात. त्यामुळेच वास्तुशास्त्रामध्ये दररोज सकाळी अंघोळीनंतर लक्ष्मी मातेची पूजा करण्याचा सल्ला देण्यता आला आहे. यामुळे घरातील सर्व प्रकारचे दोष दूर होतात. लक्ष्मी मातेला दरोज एक लाल फूल देखील अर्पण करावं.

कुबेराची मूर्ती- कुबेराला देखील धनाची देवता म्हटलं जातं. कुबेराच्या  आशीर्वादाने घरावरील सर्व आर्थिक संकट दूर होतात, त्यामुळे देवघरात कुबेराची देखील मूर्ती असावी असं वास्तुशास्त्र सांगतं. त्याचसोबत घराच्या उत्तर दिशेला कुबेराचा फोटो लावणं देखील शुभ माण्यात आलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
'ते' मफलरमॅन फडणवीस? रोहित पवारांचा आरोप; थेट व्हिडीओच दाखवला
Rohit Pawar : 'ते' मफलरमॅन फडणवीस? रोहित पवारांचा आरोप; थेट व्हिडीओच दाखवला
अजितदादांच्या आठवणीने फडणवीस भावुक; अमित शाहांकडे केली मागणी...
अजितदादांच्या आठवणीने फडणवीस भावुक; चौकशी अहवालाबाबत अमित शाहांकडे केली मोठी मागणी!
गृहमंत्री शाहांकडून दादांचं भरभरुन कौतुक; सांगितला 'तो' किस्सा
Amit Shah Speech : गृहमंत्री शाहांकडून दादांचं भरभरुन कौतुक; सांगितला 'तो' किस्सा
अजित दादांनी राजकारणापलीकडे नातं जपण्याचं काम केलं; शिंदेंचं विधान
अजित दादांनी राजकारणापलीकडे नातं जपण्याचं काम केलं; एकनाथ शिंदे यांचं भावनिक विधान
पुण्यात अजितदादांच्या पुतळ्याचे अनावरण; सुनेत्रा पवार भावुक...
Sunetra Pawar : पुण्यात अजितदादांच्या पुतळ्याचे अनावरण; सुनेत्रा पवार भावुक
लातूर बँक निवडणुकीत धीरज देशमुखांचा दबदबा! 19 पैकी 19 जागांचा निकाल पह
लातूर बँक निवडणुकीत धीरज देशमुखांचा दबदबा! 19 पैकी 19 जागांचा निकाल पहा...
मुलगी नताशाच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड ठाम भूमिका; शरद पवारांचा...
मुलगी नताशाच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड ठाम भूमिका; शरद पवारांचा उल्लेख करत म्हणाले...
बिनविरोध निवडीचा मान कायम! जय शाह पुन्हा सांभाळणार आयसीसीची धुरा
Jay Shah : बिनविरोध निवडीचा मान कायम! जय शाह पुन्हा सांभाळणार आयसीसीची धुरा
अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याबाहेर गोळीबाराचा कट उधळला; बिश्नोई
अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याबाहेर गोळीबाराचा कट उधळला; बिश्नोई गँगशी कनेक्शन उघड
पुण्यात दिवंगत नेते अजित पवारांच्या पुतळ्याचे अनावरण; अमित शाहांसह...
पुण्यात दिवंगत नेते अजित पवारांच्या पुतळ्याचे अनावरण; अमित शाहांसह अनेक नेत्यांची उपस्थिती!