AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chandrashekhar Bawankule: राष्ट्रवादीतून लाथाडलं म्हणून रोहित पवार असं वागतायत; चंद्रशेखर बावनकुळेंचा खळबळजनक दावा, पक्षांतर्गत राजकारणावरही भाष्य

Chandrashekhar Bawankule On Rohit Pawar: आधी स्वतःची उंची ओळखा, मगच देवेंद्र फडणवीसांवर आरोप करा, असं म्हणत चंद्रशेखर बावनकुळेंनी रोहित पवारांना सुनावलं आहे.

Chandrashekhar Bawankule: राष्ट्रवादीतून लाथाडलं म्हणून रोहित पवार असं वागतायत; चंद्रशेखर बावनकुळेंचा खळबळजनक दावा, पक्षांतर्गत राजकारणावरही भाष्य
Chandrashekhar Bawankule Hits Back at Rohit Pawar
| Updated on: Nov 16, 2026 | 9:49 PM
Share

भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी आमदार रोहित पवारांवर टीका केली आहे. ते म्हणाले की, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर रोहित पवारांनी जो आरोप केला आहे मला असं वाटतं की रोहित पवार यांना प्रसिद्धीचा हाव आला आहे. ते हावरट नेत्यांसारखे वागत आहेत. खरंतर रोहित पवारांनी आपली उंची शोधून आरोप करायला पाहिजे. त्या कंपनीच्या विमानाने कितीतरी वेळा रोहित पवार फिरले आहेत. त्याचे फोटो तुम्हाला दिसतील, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं की, त्या विमान कंपनीने राज्यातील 90 टक्के नेत्यांनी प्रवास केला असेल, याचा अर्थ त्यांच्यासोबत संबंध आहे असा अर्थ होत नाही, अत्यंत खालच्या पद्धतीचा राजकारण रोहित पवार करत आहेत. त्यांना प्रसिद्धीमध्ये येण्याचा चंग लागलाय आणि मला असं वाटतं माननीय अमित शहा यांनी माननीय दिवंगत नेते अजित पवारांचा जो पुतळ्याचा लोकार्पण केला तो कार्यक्रम रोहित पवारांना आवडला नाही. म्हणून रोहित पवारांनी या कार्यक्रमाला अजितदादांच्या पुतळ्याच्या लोकार्पण कार्यक्रमाला खाली दाखवण्याकरिता जाणीवपूर्वक या ठिकाणी अशा पद्धतीचे आरोप केले.

ते म्हणाले की, शरद पवार साहेबांनी ज्या प्रकारे महाराष्ट्राची संस्कृती जपली, त्यांनी प्रसिद्धीचा कधीही असा हाव केला नाही, रोहित पवारांनी शरद पवारांकडून शिकला पाहिजे की या राज्याला संस्कार दिले. मला असं वाटतं या पद्धतीने रोहित पवार वागत आहेत. बोलत आहेत आणि जो काही आरोप देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला आहे याबद्दल राष्ट्रवादीचे नेत्यांनी अधिक स्पष्टीकरण दिलं पाहिजे. कारण रोहित पवार हे माननीय देवेंद्र फडणवीस यांना अजित पवार यांच्या विषयी बोलताना महाराष्ट्राची प्रतिमा खराब करत आहे, असं म्हणत चंद्रशेखर बावनकुळेंनी समाचार घेतला आहे.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस आणि अजितदादांचे संबंध कसे होते हे मला माहित आहे. त्यांनी एकमेकांना भावासारखा सांभाळलं आहे. रोहित पवार हे फार बालिश आहेत. बालिशपणाचा अत्यंत खालच्या स्तरावरच राजकारण रोहित पवारांनी केलं आहे. खरंतर या पद्धतीचा राजकारण करून या महाराष्ट्राची उंची कमी करण्याचं काम रोहित पवारांनी केल. आहे. मला असं वाटतं दोन बाबी आहेत, एक तर रोहित पवारांना अजित दादांच्या पुतळ्याचा अनावरण झालं त्याबद्दल त्या कार्यक्रमाची उंची कमी करण्याकरिता रोहित पवार असं वागत आहेत. दुसरं रोहित पवार असं वागले ज्याप्रमाणे त्यांच्या पक्षात त्यांना कोणी विचारत नाही.

त्यांनी सांगितलं की, त्यांना वेगळे वळण लागलं कारण सुप्रिया ताईंनी जे म्हटलं ते या देशाच्या विकासाकरिता मतदार संघ छोटे असले पाहिजे. लोकप्रतिनिधींना त्या ठिकाणी कमी आकाराचे मतदारसंघ असायला पाहिजे. ३०० किलोमीटरचे लोकसभा, दीडशे किलोमीटरचे विधानसभा क्षेत्र आहेत. 40-40 लाख लोकसंख्येचे मतदारसंघ झाले आहेत. त्यामुळे डीलिमिटेशन आवश्यक आहे. विकसित भारताच्या जडणघडणमध्ये जेवढे लोकप्रतिनिधी जास्त असतील तेवढा विकसित भारताचा संकल्प पुढे जाणार आहे.

चंद्रशेखर बावनकुळे पुढे म्हणाले की, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी म्हणून चांगल्या पद्धतीचा डेव्हलपमेंट होऊ शकता म्हणून डीलिमिटेशनला जर सुप्रियाताई मदत करत असतील तर मी त्यांचा अभिनंदन करेल. रोहित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस मधून लाथाडलय असं दिसत आहे. म्हणून ते असं वागत आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करणे हे चुकीचा आहे, रोहित पवार जाणीवपूर्वक या ठिकाणी काहीतरी रेषा टाकून शरद पवार गटातून त्यांना बाहेर जायचं आहे.

ते म्हणाले की, आधीपासून आमची भूमिका हीच आहे की अजितदादांची जी काही दुर्घटना झाली त्याचा पूर्णपणे पर्दाफाश झाला पाहिजे. यासाठी देवेंद्रजी खूप प्रयत्न करत आहेत. मला माहित आहे की देवेंद्रजींनी काय काय प्रयत्न केले आहे. सार्वजनिकरित्या ते बोलू शकत नाही. असे आरोप लावल्याने देवेंद्रजींच्या इमेज वर काही फरक पडत नाही. मात्र दुःख होतो की ज्यांच्या सोबत पारिवारिक संबंध आहे त्यांच्यावर अशी आरोप लावणं सहन होत नाही. अशा लोकांना काय डीफिमेशन पाठवायचे? खरं तर त्यांनी स्वतः समजून घेतलं पाहिजे. या राज्याच्या जनतेच्या मनातून रोहित पवारांची इमेज कमी झाली आहे हेच डीफेमेशन आहे, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं आहे.

Follow Us
'ते' मफलरमॅन फडणवीस? रोहित पवारांचा आरोप; थेट व्हिडीओच दाखवला
Rohit Pawar : 'ते' मफलरमॅन फडणवीस? रोहित पवारांचा आरोप; थेट व्हिडीओच दाखवला
अजितदादांच्या आठवणीने फडणवीस भावुक; अमित शाहांकडे केली मागणी...
अजितदादांच्या आठवणीने फडणवीस भावुक; चौकशी अहवालाबाबत अमित शाहांकडे केली मोठी मागणी!
गृहमंत्री शाहांकडून दादांचं भरभरुन कौतुक; सांगितला 'तो' किस्सा
Amit Shah Speech : गृहमंत्री शाहांकडून दादांचं भरभरुन कौतुक; सांगितला 'तो' किस्सा
अजित दादांनी राजकारणापलीकडे नातं जपण्याचं काम केलं; शिंदेंचं विधान
अजित दादांनी राजकारणापलीकडे नातं जपण्याचं काम केलं; एकनाथ शिंदे यांचं भावनिक विधान
पुण्यात अजितदादांच्या पुतळ्याचे अनावरण; सुनेत्रा पवार भावुक...
Sunetra Pawar : पुण्यात अजितदादांच्या पुतळ्याचे अनावरण; सुनेत्रा पवार भावुक
लातूर बँक निवडणुकीत धीरज देशमुखांचा दबदबा! 19 पैकी 19 जागांचा निकाल पह
लातूर बँक निवडणुकीत धीरज देशमुखांचा दबदबा! 19 पैकी 19 जागांचा निकाल पहा...
मुलगी नताशाच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड ठाम भूमिका; शरद पवारांचा...
मुलगी नताशाच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड ठाम भूमिका; शरद पवारांचा उल्लेख करत म्हणाले...
बिनविरोध निवडीचा मान कायम! जय शाह पुन्हा सांभाळणार आयसीसीची धुरा
Jay Shah : बिनविरोध निवडीचा मान कायम! जय शाह पुन्हा सांभाळणार आयसीसीची धुरा
अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याबाहेर गोळीबाराचा कट उधळला; बिश्नोई
अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याबाहेर गोळीबाराचा कट उधळला; बिश्नोई गँगशी कनेक्शन उघड
पुण्यात दिवंगत नेते अजित पवारांच्या पुतळ्याचे अनावरण; अमित शाहांसह...
पुण्यात दिवंगत नेते अजित पवारांच्या पुतळ्याचे अनावरण; अमित शाहांसह अनेक नेत्यांची उपस्थिती!