AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sushma Jaywant : अंगावरचं सोनं काढायचं आणि कपडेही…’कमळी’ फेम अभिनेत्रीनं सांगितला धक्कादायक प्रसंग; म्हणाली, मी स्वामी म्हटलं अन्…

Sushma Jaywant : 'कमळी' फेम सुषमा जयवंतनं एका मुलाखतीत तिच्यासोबत घडलेला धक्कादायक प्रसंग सांगितला आहे.

Sushma Jaywant : अंगावरचं सोनं काढायचं आणि कपडेही...'कमळी' फेम अभिनेत्रीनं सांगितला धक्कादायक प्रसंग; म्हणाली, मी स्वामी म्हटलं अन्...
| Updated on: Nov 16, 2026 | 9:39 PM
Share

मराठी मनोरंजनविश्वातील अभिनेत्री सुषमा जयवंत यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांच्यासोबत घडलेला अंगावर शहारे आणणारा प्रसंग सांगितला आहे. बोरिवलीच्या नॅशनल पार्कमध्ये मैत्रिणींसोबत फिरायला गेल्या असताना दोन गुंडांनी त्यांना घेरलं होतं. त्यांच्यापैकी एकाने सुषमा यांच्या मानेवर चाकू ठेवला आणि अंगावरील सोनं तसेच कपडे काढण्याची धमकी दिली. मात्र, अशा जीवघेण्या प्रसंगात त्यांनी स्वामी समर्थांचा धावा केला आणि त्यानंतर जे घडलं, त्याने अभिनेत्रीची स्वामींवरील श्रद्धा अधिकच दृढ झाली.

सुषमा जयवंत यांनी सांगितला प्रसंग प्रसंग सांगताना सुषमा जयवंत म्हणाल्या की, ‘मी आधी नास्तिक होते. पण, नंतर स्वामींना कळलं हिला माझी गरज आहे. म्हणून स्वामी आले. एकदा आम्ही लॅन्डस्केपसाठी नॅशनल पार्क बोरीवली येथे गेलेलो. अजिबात इच्छा नव्हती पेंटिंग करायची. त्यामुळे आम्ही मैत्रिणींनी दुसरीकडे जायचं ठरवलं. आम्ही रस्ता चुकलो. आम्हाला नॅशनल पार्कचं काहीच माहित नव्हतं. आम्ही तिथे खेळत होतो. बाजूला सगळे कपल्स बसले होते.’

सुषमा पुढे म्हणाल्या की, ‘थोड्या वेळाने आम्ही पाहिलं तर एकही कपल तिथे नव्हतं. तेव्हा आम्हाला भीती वाटली. आम्ही निघालो आणि तेवढ्यात दोन मुलं समोर आली. एकाकडे बंदूक आणि एकाकडे चाकू होता. तो म्हणाला, ‘अंगावरचं सोनं काढायचं आणि कपडेही काढायचे. त्याने माझ्या मानेवर चाकू धरताच मी पटकन ‘स्वामी’ असं म्हटलं. तेवढ्यात एका धिप्पाड पुरुषाने शिट्टी वाजवावी तशी शिट्टी वाजली आणि म्हणाला ‘सोड तिला.’ आम्ही पाचही जण घाबरलो. कोणीच नव्हतं तिथे. ती मुलंही पळून गेली. माझ्या मैत्रिणी म्हणत होत्या, पोलीस होते असतील. पण मी म्हटलं, जर पोलीस असते तर त्यांनी येऊन आमची विचारपूस केली असती.’ ‘सोनचाफा’ला दिलेल्या मुलाखतीत सुषमा जयवंत बोलत होत्या.

दरम्यान, सुषमा यांच्या कामाबद्दल सांगायचं तर सध्या त्या ‘कमळी’ मालिकेत झळकत असून यापूर्वी त्यांनी ‘कुंडली भाग्य’, ‘क्युंकी सास भी कभी बहु थी’, ‘इश्क मै मरजावा’यांसारख्या हिंदी मालिकांमध्येही काम केलं आहे.

Follow Us
'ते' मफलरमॅन फडणवीस? रोहित पवारांचा आरोप; थेट व्हिडीओच दाखवला
Rohit Pawar : 'ते' मफलरमॅन फडणवीस? रोहित पवारांचा आरोप; थेट व्हिडीओच दाखवला
अजितदादांच्या आठवणीने फडणवीस भावुक; अमित शाहांकडे केली मागणी...
अजितदादांच्या आठवणीने फडणवीस भावुक; चौकशी अहवालाबाबत अमित शाहांकडे केली मोठी मागणी!
गृहमंत्री शाहांकडून दादांचं भरभरुन कौतुक; सांगितला 'तो' किस्सा
Amit Shah Speech : गृहमंत्री शाहांकडून दादांचं भरभरुन कौतुक; सांगितला 'तो' किस्सा
अजित दादांनी राजकारणापलीकडे नातं जपण्याचं काम केलं; शिंदेंचं विधान
अजित दादांनी राजकारणापलीकडे नातं जपण्याचं काम केलं; एकनाथ शिंदे यांचं भावनिक विधान
पुण्यात अजितदादांच्या पुतळ्याचे अनावरण; सुनेत्रा पवार भावुक...
Sunetra Pawar : पुण्यात अजितदादांच्या पुतळ्याचे अनावरण; सुनेत्रा पवार भावुक
लातूर बँक निवडणुकीत धीरज देशमुखांचा दबदबा! 19 पैकी 19 जागांचा निकाल पह
लातूर बँक निवडणुकीत धीरज देशमुखांचा दबदबा! 19 पैकी 19 जागांचा निकाल पहा...
मुलगी नताशाच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड ठाम भूमिका; शरद पवारांचा...
मुलगी नताशाच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड ठाम भूमिका; शरद पवारांचा उल्लेख करत म्हणाले...
बिनविरोध निवडीचा मान कायम! जय शाह पुन्हा सांभाळणार आयसीसीची धुरा
Jay Shah : बिनविरोध निवडीचा मान कायम! जय शाह पुन्हा सांभाळणार आयसीसीची धुरा
अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याबाहेर गोळीबाराचा कट उधळला; बिश्नोई
अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याबाहेर गोळीबाराचा कट उधळला; बिश्नोई गँगशी कनेक्शन उघड
पुण्यात दिवंगत नेते अजित पवारांच्या पुतळ्याचे अनावरण; अमित शाहांसह...
पुण्यात दिवंगत नेते अजित पवारांच्या पुतळ्याचे अनावरण; अमित शाहांसह अनेक नेत्यांची उपस्थिती!