AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवसेनेच्या ऑपरेशन टायगर 3.0 पूर्वीच उद्धव ठाकरेंनी गेम फिरवला, शिंदे गटाला जबर धक्का; मुंबईत मोठा पक्षप्रवेश

काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो असलेलं एक पोस्टर चांगलंच व्हायरल झालं होतं, ज्यावर वेट अँड वॉच 3.0 असा मजकूर होता. हे पोस्टर व्हायरल झाल्यानंतर पुन्हा ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू झाली, मात्र आता शिवसेना शिंदे गटालाच मोठा धक्का बसला आहे.

शिवसेनेच्या ऑपरेशन टायगर 3.0 पूर्वीच उद्धव ठाकरेंनी गेम फिरवला, शिंदे गटाला जबर धक्का; मुंबईत मोठा पक्षप्रवेश
uddhav thackerayImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 16, 2026 | 9:40 PM
Share

काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो असलेलं एक पोस्टर सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालं होतं. ज्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या फोटोसोबतच वेट अँड वॉच 3.0 असा मजकूर देखील लिहिण्यात आला होता. दरम्यान हे पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पुन्हा एकदा ऑपेरेशन टायगरच्या चर्चेला उधाण आलं. पुन्हा एकदा शिवसेना शिंदे गट ऑपरेशन टायगर राबवणार का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत होता. याव प्रतिक्रिया देताना शिवसेना शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी देखील ऑपरेशन टायगर  3.0 चे संकेत दिले मात्र त्यांनी वेळ आणि तारीख याबद्दल कोणतीही माहिती दिली नाही. तसेच शिवसेना शिंदे गटातील इतर नेत्यांकडून देखील ऑपरेशन टायगरबद्दल दावा करण्यात आला होता.

मात्र एकीकडे हे सर्व सुरू असतानाच आता राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे एकीकडे हे सर्व सुरू असताना दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाने शिवसेना शिंदे गटाला मुंबईमध्ये मोठा धक्का दिला आहे. शिवसेना शिंदे गटाच्या डोंबिवलीमधील शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते वरुण सरदेसाई यांच्या उपस्थितीमध्ये या पदाधिकाऱ्यांनी शिवसेना शिंदे गटाची साथ सोडत शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला.

दरम्यान यावेळी प्रतिक्रिया देताना  काही पदाधिकारी सत्तेत राहून कामे करून घेण्यासाठी तिकडेच थांबले आहेत, वेळ आल्यावर तेही येतील, असा दावाही यावेळी  वरुण सरदेसाई यांनी केला आहे. भविष्यात आणखी मोठे पक्षप्रवेश होणार आहेत, असा इशाराही यावेळी सरदेसाई यांनी दिला. हा शिंदे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

दरम्यान दुसरीकडे आज मनसेनं देखील शिवसेना शिंदे गटाला धक्का दिला आहे. दक्षिण रत्नागिरीमधील 100 ते 150 पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आज मनसेमध्ये प्रवेश केला. दादर येथील मनसे कार्यालयात अमित ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश झाला आहे. त्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटात देखील शकडो कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केला आहे.

Follow Us
'ते' मफलरमॅन फडणवीस? रोहित पवारांचा आरोप; थेट व्हिडीओच दाखवला
Rohit Pawar : 'ते' मफलरमॅन फडणवीस? रोहित पवारांचा आरोप; थेट व्हिडीओच दाखवला
अजितदादांच्या आठवणीने फडणवीस भावुक; अमित शाहांकडे केली मागणी...
अजितदादांच्या आठवणीने फडणवीस भावुक; चौकशी अहवालाबाबत अमित शाहांकडे केली मोठी मागणी!
गृहमंत्री शाहांकडून दादांचं भरभरुन कौतुक; सांगितला 'तो' किस्सा
Amit Shah Speech : गृहमंत्री शाहांकडून दादांचं भरभरुन कौतुक; सांगितला 'तो' किस्सा
अजित दादांनी राजकारणापलीकडे नातं जपण्याचं काम केलं; शिंदेंचं विधान
अजित दादांनी राजकारणापलीकडे नातं जपण्याचं काम केलं; एकनाथ शिंदे यांचं भावनिक विधान
पुण्यात अजितदादांच्या पुतळ्याचे अनावरण; सुनेत्रा पवार भावुक...
Sunetra Pawar : पुण्यात अजितदादांच्या पुतळ्याचे अनावरण; सुनेत्रा पवार भावुक
लातूर बँक निवडणुकीत धीरज देशमुखांचा दबदबा! 19 पैकी 19 जागांचा निकाल पह
लातूर बँक निवडणुकीत धीरज देशमुखांचा दबदबा! 19 पैकी 19 जागांचा निकाल पहा...
मुलगी नताशाच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड ठाम भूमिका; शरद पवारांचा...
मुलगी नताशाच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड ठाम भूमिका; शरद पवारांचा उल्लेख करत म्हणाले...
बिनविरोध निवडीचा मान कायम! जय शाह पुन्हा सांभाळणार आयसीसीची धुरा
Jay Shah : बिनविरोध निवडीचा मान कायम! जय शाह पुन्हा सांभाळणार आयसीसीची धुरा
अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याबाहेर गोळीबाराचा कट उधळला; बिश्नोई
अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याबाहेर गोळीबाराचा कट उधळला; बिश्नोई गँगशी कनेक्शन उघड
पुण्यात दिवंगत नेते अजित पवारांच्या पुतळ्याचे अनावरण; अमित शाहांसह...
पुण्यात दिवंगत नेते अजित पवारांच्या पुतळ्याचे अनावरण; अमित शाहांसह अनेक नेत्यांची उपस्थिती!