राज्यभरातून एकनाथ शिंदे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. केवळ राज्यातच नाही तर अयोध्येत देखील एकनाथ शिंदे यांच्या अभिनंदनाचे बॅनर लागले आहेत. अयोध्येतील शिवससैनिकांकडून एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन करण्यात आलं आहे.
माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटलांना मोठा धक्का बसला आहे. त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांच्यावर पक्षविरोधी करवाई केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
एसटी बस तोट्यात आहे, आता हा तोटा भरून काढण्यासाठी एसटी महामंडळाकडून अनोखा उपक्रम राबवण्यात येत आहे. भंगारातून नवीन गाड्यांची पुनर्बांधणी करण्यात येत असून, यातून लाखो रुपयांची बचत होत आहे.
संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना खोचक टोला लगावला आहे. शिवसेनेतून 40 आमदार बाहेर पडले, हा खरा भूकंप नव्हे. तर फडणवीस यांना एकनाथ शिंदे यांच्या हाताखाली काम करावे लागणे हा खरा भूकंप असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.
के. चंद्रशेखर राव यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर निशाणा साधला आहे. देशात सध्या अनेक चुकीच्या घटना सुरू आहेत. त्यामुळे देशाची मान खाली जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
सर्कल रेटपेक्षा कमी किंमतीचं अॅग्रीमेंट करू नये. सध्या रजिस्ट्री करताना खरेदीदार आणि विक्रेता या दोघांचंही आधार आणि पॅनकार्ड बंधनकारक आहे. त्यामुळे प्रॉपर्टी विक्री किंवा खरेदीचा संपूर्ण व्यवहार आयकर विभागाच्या रडारवर असतो.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील समिती सभागृहात राज्यातील आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत.
अमरावतीमध्ये 21 जूनला एका व्हेटर्नरी मेडिकल व्यावसायिकांची गळा कापून निर्घृण हत्या करण्यात आली होती. उमेश कोल्हे असे या व्यवसायिकाचे नाव आहे. दरम्यान आता या हत्याप्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
शिवसेनेच्या नेत्या दिपाली सय्यद यांनी शिवसैनिकांना भावनिक आवाहन केले आहे. आज शिवसेना संकटातून मार्ग काढत आहे. सर्व शिवसैनिकांनी आपल्या विभागासाठी, प्रभागासाठी, गावांसाठी, महाराष्ट्रासाठी शिवसेनेला बळकट करावे असे त्यांनी म्हटले आहे.
जून महिन्यात घर खरेदी विक्रीच्या व्यवहारांमधून मिळणाऱ्या महसुलात मोठी वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहिमध्ये महसूल 113 टक्क्यांनी वाढला आहे.