AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! शिवसेना शिंदे गटात बंडखोरी, पक्षात मोठी फूट

महापालिका निवडणुकीनंतर आता महापौरपदाच्या निवडीसाठी राज्यात घडामोडींना वेग आला असतानाच मोठी बातमी समोर आली आहे, शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसला असून पक्षात बंडखोरी पहायला मिळत आहे.

मोठी बातमी! शिवसेना शिंदे गटात बंडखोरी, पक्षात मोठी फूट
एकनाथ शिंदे Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 06, 2026 | 3:46 PM
Share

काही दिवसांपूर्वीच राज्यात महापालिकांच्या निवडणुका पार पडल्या, या निवडणुकांमध्ये भाजपला मोठं यश आलं. भाजप हा नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकांप्रमाणेच या निवडणुकीमध्ये देखील राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला. महापालिका निवडणुकीसाठी भाजपनं राज्यात अनेक ठिकाणी शिवसेना शिंदे गटासोबत युती केली होती. भाजप जरी राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी देखील अनेक महापालिकांमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत न मिळाल्यानं त्यांना शिवसेना शिंदे गटाच्या पाठिंब्याची गरज लागणार आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी भाजपकडे महापौरपद तर शिवसेना शिंदे गटाकडे उपमहापौरपद राहण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर आता छत्रपती संभाजीनगरमधून मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील महापालिका निवडणुकीत भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला, तर एमआएएम हा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना शिंदे गट आणि भाजप जरी वेगवेगळे निवडणूक लढले असले तरी देखील शिवसेना शिंदे गटानं भाजपला पाठिंबा दिला आहे, त्यामुळे आता या महापालिकेत भाजपचा महापौर तर शिवसेना शिंदे गटाचा उपमहापौर असणार आहे.

मात्र उपमहापौर पदाच्या निवडीआधीच मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे इथे शिवसेना शिंदे गटात फुट पडल्याचं दिसून येत आहे. शिवसेनेकडून त्रिंबक तुपे, अनिता घोडले, हर्षदा शिरसाट हे उपमहापौर पदासाठी पक्ष आदेश डावलून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.  तसेच जिल्हा परिषद मतदान पार पडल्यानंतर मंत्री संजय शिरसाट यांच्यासह सर्व नगरसेवक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाचे नेते  राजेंद्र जंजाळ हे देखील उपमहापौरपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळे 10 तारखेला महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडीच्या दिवशी काय राजकीय स्थिती निर्माण होणार हे बघणं महत्वाचं असणार आहे.

सध्या स्थितीमध्ये  त्रिंबक तुपे, अनिता घोडले, हर्षदा शिरसाट, सिद्धांत शिरसाट, छाया वाघचौरे, श्वेता त्रिवेदी, किशोर नागरे, अभिजित जीवनवाल, प्रेमलता दाभाडे आणि राजू राजपूत हे नगरसेवक मंत्री संजय शिरसाट यांच्या बाजूने आहेत, तर दुसरीकडे  ऋषीकेश जैस्वाल आणि यशोदा शेळके हे दोन नगरसेवक राजेंद्र जंजाळ यांच्या बाजुने आहेत. त्यामुळे आता या निवडणुकीच्या निमित्तानं संजय शिरसाट विरूद्ध राजेंद्र जंजाळ असा राजीकय संघर्ष पहायला मिळण्याची शक्यता आहे.

Follow Us
...अन् ते थेट कोर्टाच्या रेकॉर्डवर आलं.’ राऊतांनी सांगितली कोर्टातील म
Sanjay Raut | ...अन् ते थेट कोर्टाच्या रेकॉर्डवर आलं.’ राऊतांनी सांगितली कोर्टातील महत्त्वाची बाब
देशाच्या संविधानावर विश्वास...राऊतांच्या एका पोस्टने रंगवलं राजकारण
Sanjay Raut | देशाच्या संविधानावर विश्वास..., खेळ कायदेशीर मार्गानेच आटोपतोय... संजय राऊतांच्या एका पोस्टने रंगवलं राजकारण
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे...
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे दृश्य पाहाच!
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं....
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं बरळण्यापेक्षा...
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया...
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया समोर, एका वाक्यातच...
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी अखेर Metaने मागितली माफी, पहा व्हिडीओ
वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळ
Walmik Karad | वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळबळ
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत?
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत? सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut On SC Hearing | शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर संजय राऊतांचा मोठा दावा