AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल वापरण्याची...

मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल वापरण्याची…

| Updated on: Nov 08, 2026 | 11:23 AM
Share

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळावर भाष्य केले. बोअरवेल बंदी सरसकट उठवली जाणार नसून, फळबागा वाचवण्यासाठी १५ डिसेंबरपर्यंत तात्पुरती मुदत दिली आहे. शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून, वन्यप्राण्यांच्या त्रासावर सौर कुंपणाची योजना प्रभावीपणे राबवली जाईल. दीर्घकालीन उपाय म्हणून नदीजोड प्रकल्पांवर भर दिला जात आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या समस्यांवर नुकतेच भाष्य केले. बोअरवेल बंदी सरसकट उठवली जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, फळबागांना पाणी पुरवण्यासाठी आणि त्यांना वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना १५ डिसेंबरपर्यंत मर्यादित वेळेसाठी बोरवेल वापरण्याची परवानगी दिली आहे. यामुळे अनेक वर्षांपासून जोपासलेल्या फळझाडांना जीवदान मिळेल, अशी अपेक्षा आहे.

फडणवीस यांनी सांगितले की, दुष्काळामुळे पिण्याच्या पाण्याची, सिंचनाची आणि जनावरांच्या आरोग्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. सरकारने शेतकऱ्यांसोबत आणि सरपंचांसोबत चर्चा करून या समस्या समजून घेतल्या आहेत. वन्यप्राण्यांमुळे होणाऱ्या त्रासावरही त्यांनी लक्ष वेधले. विशेषतः जंगल परिसरातील शेतकऱ्यांना गवाऱ्यांमुळे होणाऱ्या नुकसानीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सौर कुंपणाच्या योजना अधिक प्रभावीपणे राबवण्यावर भर दिला जाईल. सरकार तात्पुरत्या उपाययोजनांसोबतच दुष्काळावर कायमस्वरूपी मात करण्यासाठी दीर्घकालीन प्रकल्पांवरही काम करत आहे.

Published on: Nov 08, 2026 11:23 AM

Follow Us