AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Diwali 2026 : भव्य रांगोळी, झगमग रोषणाई... दिवाळी पहाटचा उत्साह; पहा सुंदर व्हिडीओ...

Diwali 2026 : भव्य रांगोळी, झगमग रोषणाई… दिवाळी पहाटचा उत्साह; पहा सुंदर व्हिडीओ…

| Updated on: Nov 08, 2026 | 9:23 AM
Share

दिवाळी पहाटसाठी डोंबिवलीचा प्रसिद्ध फडके रोड पूर्णपणे सज्ज झाला आहे. ग्रामदैवत गणपती मंदिराला विद्युत रोषणाई आणि फुलांची सुंदर सजावट करण्यात आली आहे. परिसरात भव्य रांगोळ्या काढण्यात आल्या असून, तरुण-तरुणींच्या स्वागतासाठी रोड उत्सुक आहे. सुरक्षिततेसाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात आहे.

डोंबिवलीचा प्रसिद्ध फडके रोड दिवाळी पहाटच्या उत्साहासाठी सज्ज झाला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही येथे मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात आली आहे. डोंबिवलीच्या ग्रामदैवत गणपती मंदिराला विद्युत रोषणाईने उजळले असून, फुलांची आकर्षक सजावटही लक्ष वेधून घेत आहे. दिवाळी पहाटनिमित्त फडके रोडवर भव्य रांगोळ्या काढण्यात आल्या आहेत आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. पहाटेपासूनच येथे तरुण-तरुणी, दाम्पत्य आणि डोंबिवलीकर नागरिक गणपतीच्या दर्शनासाठी गर्दी करतात. पारंपरिक वेशभूषेत येऊन एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्याची येथे परंपरा आहे. डोंबिवलीसह आसपासच्या शहरांमधूनही हजारोच्या संख्येने तरुण-तरुणी या ठिकाणी येतात. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटाही तैनात करण्यात आला आहे.

Published on: Nov 08, 2026 09:23 AM

Follow Us