AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! पेट्रोलमध्ये 20% नव्हे, तर तब्बल 31% इथेनॉल; कर्नाटक सरकारच्या आरोपाने खळबळ

मोठी बातमी! पेट्रोलमध्ये 20% नव्हे, तर तब्बल 31% इथेनॉल; कर्नाटक सरकारच्या आरोपाने खळबळ

| Updated on: Nov 07, 2026 | 10:02 PM
Share

कर्नाटक सरकारने पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाबाबत केलेल्या तपासणीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. निर्धारित 20% पेक्षा अधिक, काही नमुन्यांमध्ये तब्बल 31% पर्यंत इथेनॉल आढळल्याचा दावा कर्नाटक सरकारने केला आहे. या अहवालामुळे वाहनचालकांना मिळणाऱ्या इंधनाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, तेल कंपन्यांनी मात्र हे आरोप फेटाळले आहेत.

पेट्रोलमध्ये 20% नव्हे, तर तब्बल 31% इथेनॉल मिसळण्यात आल्याचा गंभीर आरोप कर्नाटक सरकारने केला आहे. कर्नाटकच्या विविध जिल्ह्यांमधून गोळा केलेल्या पेट्रोलच्या नमुन्यांची तपासणी केल्यानंतर हा धक्कादायक अहवाल समोर आला आहे. केंद्र सरकारने E20 पेट्रोलमध्ये केवळ 20% इथेनॉल मिसळण्यास परवानगी दिली असताना, प्रत्यक्षात त्याहून अधिक इथेनॉल आढळल्याचे कर्नाटक सरकारचे म्हणणे आहे. कर्नाटक सरकारने बंगळूरु, कोलार, चिकबल्लापूर, बंगळूरु ग्रामीण, रामनगर, मंगळूरु आणि तुमकर या सात जिल्ह्यांमधून पेट्रोलचे 14 नमुने घेतले. बंगळूरु येथील श्रीराम रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये या नमुन्यांची तपासणी करण्यात आली.

अहवालानुसार, 14 पैकी 11 नमुन्यांमध्ये इथेनॉलचे प्रमाण 20 टक्क्यांपेक्षा जास्त आढळले. इंडियन ऑईलच्या एका नमुन्यात 31.2% आणि हिंदुस्तान पेट्रोलियमच्या एका नमुन्यात 30.5% इथेनॉल सापडले. या अहवालानंतर कर्नाटक सरकारने तेल कंपन्यांवर कठोर कारवाई करण्याची आणि वाहन मालकांना भरपाई देण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. दुसरीकडे, पेट्रोलियम कंपन्यांनी कर्नाटक सरकारचे हे दावे फेटाळून लावले आहेत. वाहनचालक महागडे पेट्रोल खरेदी करत असताना, त्यांना नेमकं काय मिळत आहे, हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

Published on: Nov 07, 2026 10:02 PM

Follow Us