AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दुष्काळाने शेतकरी हतबल! जनावरे विकण्याची वेळ, रोहित पवार पाहणीसाठी गेले असताना शेतकऱ्यान मांडली व्यथा

दुष्काळाने शेतकरी हतबल! जनावरे विकण्याची वेळ, रोहित पवार पाहणीसाठी गेले असताना शेतकऱ्यान मांडली व्यथा

| Updated on: Nov 08, 2026 | 10:52 AM
Share

रोहित पवारांनी अक्कलकोट तालुक्यातील जेऊर गावात दुष्काळग्रस्त शेतकरी सदाशिव कनोजे यांच्या व्यथा ऐकल्या. ऊस आणि मिरची पिकाच्या नुकसानीमुळे तसेच जनावरे विकावी लागल्याने शेतकऱ्याला अश्रू अनावर झाले. मुलीच्या शिक्षणासाठी पैशांची चणचण, कर्जमाफीचा अभाव आणि मायक्रो फायनान्सचे उच्च व्याजदर यामुळे शेतकरी कुटुंबाचे भीषण वास्तव समोर आले.

अक्कलकोट तालुक्यातील जेऊर गावातील शेतकरी सदाशिव कनोजे यांच्या शेतात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी नुकतीच पाहणी केली. दिवाळीच्या दिवसांतही दुष्काळामुळे राज्यातील शेतकऱ्यांसमोर उभ्या ठाकलेल्या गंभीर परिस्थितीचे दर्शन यावेळी घडले. कनोजे यांनी मिरची पिकासाठी टँकरने पाणी वापरूनही रोग पडल्याने झालेले नुकसान आणि दोन एकर ऊसाचे पीक जळून गेल्याने आलेले आर्थिक संकट रोहित पवारांसमोर मांडले. या संकटामुळे कनोजे कुटुंबीयांनी आपली जनावरे कवडीमोल भावाने विकली.

एक लाखाची म्हैस चाळीस हजारात आणि ऐंशी हजाराची गाय तीस-पस्तीस हजारात विकावी लागल्याची व्यथा सांगताना त्यांना आणि त्यांच्या मुलीला अश्रू अनावर झाले. मुलाने बहिणींच्या शिक्षणासाठी बारावीनंतर शिक्षण सोडल्याचे आणि मुलीला शिकण्याची इच्छा असूनही पैशाअभावी ते शक्य नसल्याचे पाहून रोहित पवारही भावनिक झाले. शेतकऱ्यांच्या जीवनातील हा बिकट प्रसंग पाहता, सरकारने तातडीने मदत करण्याची मागणी रोहित पवारांनी केली.

Published on: Nov 08, 2026 10:52 AM

Follow Us