हरल्यानंतर कसं वाटतंय ट्रम्प ? पत्रकारांनी प्रश्न विचारताच ट्रम्प यांचा काढता पाय…
एका पत्रकाराने डोनाल्ड ट्रम्प यांना हे देखील विचारले की निवडणूकीत पराभवाचा सामना केल्यानंतर त्यांना आता कसे वाटत आहे? ट्रम्प यांनी या प्रश्नाला कोणतेही उत्तर न देता तेथून लागलीच काढता पाय घेतला. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

अमेरिकेत मध्यावती निवडणूकात डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पार्टीला मोठा झटका बसला आहे. त्यामुळे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे पत्रकारांच्या प्रश्नांपासून अंतर राखताना दिसले. व्हाईट हाऊसच्या बाहेर पत्रकारांनी त्यांना विचारले की त्यांच्या चीफ ऑफ स्टाफ सूसी वाईल्स यांना हटवून स्टीफन मिलर यांच्यावर जबाबदारी सोपवण्याचा निर्णय त्यांनी का घेतला. या दरम्यान एका पत्रकाराने ट्रम्प यांना हे देखील विचारले की निवडणूका पराजयाचा सामना करावा लागल्याने आता कसे वाटत आहे? ट्रम्प यांनी या प्रश्नाला कोणतेही उत्तर न देता तेथून काढता पाय घेतला. या घटनेचा व्हिडीओ देखील व्हायरल होत आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी सूसी वाईल्स यांना हटवण्याच्या निर्णयावर स्पष्टीकरण देताना सांगितले की त्यांना बदल हवा होता. ते म्हणाले की कधी-कधी जीवनात बदल करावा लागतो. आणि आम्हालाही काही पावले उचलावी लागतात. याआधी ट्रम्प यांनी सुसी वाईल्स यांना पदावरुन हटवण्याची तयारी चालवली असल्याच्या बातम्यांवर निराधार बातम्या असल्याचे म्हटले होते. मात्र, या आठवड्यात मध्यावती निवडणूकात रिपब्लिकन पार्टीला मोठा पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर व्हाईट हाऊसमध्ये मोठे बदल होतील अशी चर्चा सुरु झाली आहे. ट्रम्प यांनी स्टीफन मिलर यांना नवा चीफ ऑफ स्टाफ बनवण्याचा निर्णय याच फेरबदलाचा एक भाग असल्याचे म्हटले जात आहे.
इराण सोबतच्या संघर्षावर काय म्हणाले ट्रम्प?
पत्रकारांशी बोलताना ट्रम्प यांनी इराणचा देखील उल्लेख केला. त्यांनी दावा केला की अमेरिकेने इराणला हरवले आहे. आणि दोन्ही देशात चर्चा सुरु आहे. ट्रम्प यांनी म्हटले की इराणच्या सोबत अमेरिकेच्या संबंधात चांगली स्थिती आहे. त्यांनी दावा केला की गेल्या ६-७ महिन्यात अमेरिकेचा एक सैनिक शहीद झालेला नाही. मात्र,हा दावा आधी समोर आलेल्या सैन्याला झालेल्या दुखापतीच्या बातम्यांशी मेळ खात नाहीए. याच वर्षी जुलैमध्ये ट्रम्प इराणच्या हल्ल्यात ठार झालेल्या ४ अमेरिकन सैनिकांच्या अंत्यसंस्कारात सामील झाले होते.
याशिवाय ऑक्टोबरपर्यंत इराणच्या विरोधातील अमेरिकन सैन्य मोहिमात २३ सैनिकांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली होती. ट्रम्प प्रशासनावर सैनिकांच्या मृत्यू संदर्भात आकड्यांना लपवण्याचा आरोपही होत आहेत. शुक्रवारी बातचीत करताना ट्रम्प यांनी पत्रकारांच्या. प्रश्नांना उत्तर देणे लवकर बंद केले आणि तेथून त्यांनी काढता पाय घेतला. ट्रम्प यांनी पाठी वळून कोणतेही उत्तर दिले नाही आणि पुढे चालत गेले. या घटनेचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून युजर त्यावर निरनिराळ्या प्रतिक्रीया देत आहेत.
