मधहोश रात्रीचं ऑलटाईम हिट मराठी रोमँटिक गाणं, प्रेमात पडलेलं कपल फक्त ऐकत राहतं
रात्रीच्या शांत वातावरणात किंवा जोडीदारासोबत ऐकावंसं वाटणारं एक खास रोमँटिक मराठी गाणं, जे १९८८ मध्ये आलं होतं. या गाण्याची जादू आजही कायम आहे. तुम्हीही या गाण्याला पसंत कराल.

Romantic marathi song : प्रेमाच्या अनेक भावना असतात. कधी स्थिर तर कधी अधीर. अनेकदा शांत, संयमी तर अनेकदा बेधुंद. कधी रोमँटिक तर कधी जवळीकता वाढवणाऱ्या. या सगळ्या भावना अनेक सिनेमांमधून अन् त्यांतील गाण्यांमधून वेळोवेळी समोर येत असतात. पण काही गाणी अतिशय रोमांचकारी असतात. ही गाणी अनेकांना केवळ रात्रीच्यावेळीच ऐकायला आवडतात. किंवा मग काही श्रोत्यांना ही गाणी त्यांच्या जोडीदारासोबतच ऐकायला आवडतात. असंच एक मराठी गाणं आहे, जे १९८८ मध्ये तयार झालेलं.
कोणतं आहे गाणं?
लेखक आणि दिग्दर्शक सचिन पिळगावकर यांचा १९८८ मधला माझा पती करोडपती हा सिनेमाही प्रचंड गाजला. या सिनेमात स्वत: सचिन पिळगावकर सुप्रिया पिळगावकर, अशोक सराफ, किशोरी शहाणे निळू फुले, सुहास भालेकर मच्छिंद्र कांबळी, जयराम कुलकर्णी, शुभा खोटे यांनी अभिनय केला आहे. हा सिनेमा एक विनोदी सिनेमा होता. पण यातील गाणी म्हणजे सिनेप्रेमींसाठी खजिनाच जणू. ‘रात अशी प्रीत अशी’ हे गाणं याच सिनेमातील असून अनेकांना हे गाणं प्रचंड आवडतं. या गाण्याला संगीत आहे अरुण पौडवाल यांचं तर गायक सचिन पिळगावकर आणि अनुराधा पौडवाल यांनी केलं आहे. तर गीतकार आहेत प्रसिद्ध लेखक-कवी शांताराम नांदगावकर.
गाण्याचे बोल
रात अशी ही प्रीत रसीली तु असा दूर का सजना ये ना रात अशी ही प्रीत रसीली
बेधुंद हा गंध स्वप्नाळ ली रातरानी तारयात वारयात पाण्यात ही प्रेम गाणी ओ मी इथे प्रीती दे सजनी ये ना रात अशी ही प्रीत रसीली
नयनात अदरात हृदयात तू तू तूचे राणी भाळी तुझ्या लावितो चांदनी ही मी जानी ओ मी तुझी स्वामिनी सजना ये ना
रात अशी ही प्रीत रसीली ओ मी इथे प्रीती दे सजनी ये ना रात अशी ही प्रीत रसीली रात अशी ही प्रीत रसीली रात अशी ही प्रीत रसीली
सिनेमाचं कथानक
शंकू (सुप्रिया पिळगावकर) ही एक गरीब मुलगी असते, जिचे स्वप्न असते की तिने एखाद्या श्रीमंत (करोडपती) व्यक्तीशीच लग्न करावे. श्रीमंत नरेनला (सचिन पिळगावकर) भुरळ पाडण्यासाठी ती एक विधवा असल्याचा बनाव करते. मात्र, नरेनची अट असते की त्याला फक्त एखाद्या विधवेशीच लग्न करायचे असते. पुढे कथेत अनेक विनोदी पेचप्रसंग निर्माण होतात आणि खोट्या गोष्टी उघडकीस येण्याच्या मार्गावर धमाल घडत जाते.
