AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Diwali Fire Incidents: दिवाळीत फटाक्यांचा कहर! ठिणग्यांनी कुठे घरं-दुकानं पेटली, तर कुठे ऊसशेती जळाली; महाराष्ट्रात किती नुकसान झालं?

Diwali Fire Incidents Across Maharashtra: दिवाळीत फटाक्यांची आतषबाजी धोकादायक ठरत आहे. राज्यात अनेक ठिकाणी आगीच्या घटना घडल्याचे दिसून आले आहे.

Diwali Fire Incidents: दिवाळीत फटाक्यांचा कहर! ठिणग्यांनी कुठे घरं-दुकानं पेटली, तर कुठे ऊसशेती जळाली; महाराष्ट्रात किती नुकसान झालं?
Diwali Celebrations Marred by Fire Accident
| Updated on: Nov 08, 2026 | 10:55 PM
Share

दिवाळीचा सण म्हणजे आनंद, उत्साह आणि रोषणाईचा उत्सव. मात्र यंदा फटाक्यांच्या आतषबाजीमुळे अनेक ठिकाणी या आनंदावर आगीचे विरजण पडल्याचं चित्र पाहायला मिळालं. राज्यातील विविध भागांत फटाक्यांमुळे आग लागल्याच्या घटना समोर आल्या आहेत. अनेक कुटुंबांचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. कुठे घरांना आग लागली, कुठे दुकानं जळून खाक झाली, तर कुठे शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी पडला.

धाराशिव जिल्ह्यातील उमरगा शहरातील पतंगे रोड परिसरात फटाक्यांमुळे मंगलाबाई गायकवाड यांच्या घराला आग लागली. या दुर्घटनेत घरातील संसारोपयोगी साहित्य जळून खाक झालं. घटनेची माहिती मिळताच माजी आमदार ज्ञानराज चौगुले घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. तसेच संकटात सापडलेल्या गायकवाड कुटुंबाला आर्थिक मदतीचा हात दिला.

याच उमरगा तालुक्यातील मुरूम येथील आनंदनगर परिसरातही फटाक्यांमुळे घर आणि गोठ्याला आग लागली. या आगीत घरातील साहित्य, गोठ्यातील वस्तू आणि शेतीची अवजारं जळून मोठं नुकसान झालं. संगमनेर शहरातही दिवाळीच्या दिवशी आगीची मोठी दुर्घटना घडली. अकोले रोडवरील बॅटरीच्या दुकानाला आग लागली. प्राथमिक माहितीनुसार, फटाक्यांमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. आगीची तीव्रता लक्षात घेऊन तीन अग्निशमन केंद्रांच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. या दुर्घटनेत दोन दुकानांचं मोठं नुकसान झालं.

नवी मुंबईतील सीवूड्स सेक्टर ५० मधील माऊली इमारतीच्या पाचव्या मजल्यावर आग लागली. अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवलं. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. तर विरार पश्चिमेतील एचडीआयएल सोसायटीत रात्री दहाच्या सुमारास एका घराला भीषण आग लागली. फटाक्यांमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली. आगीच्या ज्वाळा वरच्या मजल्यांपर्यंत पोहोचत असल्याने रहिवाशांना सुरक्षित बाहेर काढण्याचे प्रयत्न करण्यात आले.

बीड जिल्ह्यातील केज शहरातील बीड रोडवर काही दुकानांना अचानक आग लागली. अग्निशमन दलाने वेळीच आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र आगीचं नेमकं कारण आणि आर्थिक नुकसानीचा आकडा अद्याप स्पष्ट झालेला नाही. या आगींच्या घटनांमध्ये केवळ घरं आणि दुकानंच नाही, तर शेतीचंही मोठं नुकसान झालं. परभणी जिल्ह्यातील गंगाखेड शहरालगत शेतकरी अनिल चौधरी यांच्या सहा एकरांवरील उसाला आग लागून संपूर्ण पीक जळून खाक झालं.

आग नेमकी कशामुळे लागली, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली; मात्र आग नियंत्रणात आणण्यासाठी अतिरिक्त मदत मागवावी लागली. एकीकडे दिवाळीचा आनंद साजरा होत असताना दुसरीकडे या दुर्घटनांमुळे अनेक कुटुंबांवर आर्थिक संकट ओढवलं आहे. फटाके फोडताना योग्य खबरदारी न घेतल्यास काही क्षणांचा उत्साह मोठ्या दुर्घटनेला कारणीभूत ठरू शकतो, हे या घटनांनी पुन्हा एकदा अधोरेखित केलं आहे.

Follow Us
पुण्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! चटणी-भाकरी खाऊन सरकारचा...
पुण्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! चटणी-भाकरी खाऊन सरकारचा निषेध, शेतकऱ्यांसाठी अनुदानाची मागणी
सिलसिला बैठकांचा निर्णय विलीनीकरणाचा? पार्थ पवारांची पुन्हा एकदा...
NCP Merger : सिलसिला बैठकांचा निर्णय विलीनीकरणाचा? पार्थ पवारांची पुन्हा एकदा सिल्व्हर ओकवर बैठक
दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकर...
Omraje Nimbalkar : दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकरांचं मोठं विधान
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय...
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय म्हणाले?
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी;
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी; हर हर महादेवचा जयघोष!
नक्षलवाद्यांची आर्थिक कंबर मोडली! मोदींनी सांगितली सरकारच्या कठोर...
नक्षलवाद्यांची आर्थिक कंबर मोडली! मोदींनी सांगितली सरकारच्या कठोर निर्णयांची Inside Story
नाशिक TCS प्रकरणात मोठी अपडेट! इम्तियाज जलील, मतीन पटेल यांच्यासह...
नाशिक TCS प्रकरणात मोठी अपडेट! इम्तियाज जलील, मतीन पटेल यांच्यासह 11 जणांविरोधात पुरवणी दोषारोपपत्र दाखल
मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल...
मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल वापरण्याची...
मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी दिवाळीवर संजय राऊतांचा सवाल; 5000 रुपयांत...
मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी दिवाळीवर संजय राऊतांचा सवाल; 5000 रुपयांत कशी साजरी होणार दिवाळी?
दुष्काळाने शेतकरी हतबल! जनावरे विकण्याची वेळ, रोहित पवार पाहणीसाठी...
दुष्काळाने शेतकरी हतबल! जनावरे विकण्याची वेळ, रोहित पवार पाहणीसाठी गेले असताना शेतकऱ्यान मांडली व्यथा