AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजितदादांचा विमान अपघात झाला त्यावेळी कागदं का जळाले नाहीत? मोठी माहिती समोर

अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला, या अपघातामध्ये विमानात असलेल्या पाचही जणांचा मृत्यू झाला, मात्र विमानातील कागदपत्रं जळाले नाहीत, त्यावरून शंका व्यक्त केली जातं होती, आता या संदर्भात मोठी बातमी समोर येत आहे.

अजितदादांचा विमान अपघात झाला त्यावेळी कागदं का जळाले नाहीत? मोठी माहिती समोर
अजित पवार यांचा विमान अपघात Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 06, 2026 | 8:30 PM
Share

अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला, या अपघातामध्ये त्यांचं निधन झालं. ते मुंबईवरून बारामतीला निघाले होते. विमान धावपट्टीवर उतरत असतानाच विमानाचं नियंत्रण सुटलं आणि विमान थेट जमिनीवर धडकलं, विमान जमिनीवर धडकताच मोठा स्फोट झाला आणि विमानानं पेट घेतला. या अपघातामध्ये अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. दरम्यान विमानाच्या अपघातामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला, विमानाला भीषण आग लागली होती, मात्र त्यामध्ये विमानामध्ये असलेली कागदपत्रं जळाली नाहीत, म्हणून अनेकांनी या अपघातावर शंका उपस्थित केली, आता त्याबद्दल एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. माजी एअर फोर्स अधिकारी अजय परांजपे यांनी यासंदर्भात एक महत्त्वाची माहिती दिली आहे.

नेमकं काय म्हणाले अजय परांजपे?

अजित पवार यांच्या विमानाचा घातपात करणे शक्य नाही, इतका अचूक घातपात करणं हे खूप कठीण काम आहे. विमानात सीसीटीव्ही बसवायला हवेत, पण का बसवले जात नाहीत हे कळत नाही.  विमान कधीच एका कारणाने क्रॅश होत नाही. त्यामागे दोन  ते तीन कारणं असतात. मुंबईवरून आलेले विमान थेट रणवेवर उतरू शकत होत. त्याच दिशेने धावपट्टी होती. विमान वळवायची गरज नव्हती.सूर्य उगवला होता. त्याची किरणे असल्याने पायलटला धावपट्टी न दिसण्याची शक्यता खूपच कमी आहे. दृश्यमानता  तीन किलोमीटरपर्यंत होती असं एटीसीने सांगितलं आहे.  मात्र बारामतीच्या एअरपोर्टवर एअर कंट्रोनिक सोयी नाहीत, त्यामुळे तिथे दृश्यमानतेची गरज ही पाच किलोमीटरची आहे, हे नोट करण्यासारखं आहे, असं परांजपे यांनी म्हटलं आहे. ते विमान रणवेच्या खूप जवळच असल्याने विमानाला जास्त उंची भेटली नाही. रणवेचा अंदाज आला नाही, आणि ते कोसळलं, असंही ते म्हणाले.

दरम्यान विमानाचा अपघात झाला, त्यानंतर विमानाला आग लागली, मात्र या आगीमध्ये विमानातील कांगदपत्रं जळाली नाहीत, यावर देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विमान क्रॅश झालं आहे,  त्यामुळे त्याचे तुकडे झाले. अशावेळी कुठलीही गोष्ट कुठेही फेकली जाते. कागदं हे बांधलेले नव्हते म्हणून ते बाहेर उडाले असं यावेळी परांजपे म्हणाले.

Follow Us
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवानाच रद्द केला
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवाना रद्द केला, नेमकं कारण काय?
काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात
Eknath shinde | काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात, 45 सरकारांचा दाखला देत म्हणाले...
शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल
Nagpur Farmer | शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! नागपूरच्या शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल चर्चेत, व्हिडिओ होतोय व्हायरल
राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे...
Rahul Gandhi | राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे परराष्ट्र धोरण नाही म्हणत मोदींवर निशाणा
शिवसेना तालुकाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी? ऑडिओ व्हायरल
तू तेव्हा वाचला आहेस, आता वाचणार नाहीस! शिवसेना तालुकाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी? ऑडिओ व्हायरल
केळेवाडी ते चर्नी रोड पूल कधी होणार? मनसेचा प्रशासनाला सवाल
MNS Protest | केळेवाडी ते चर्नी रोड पूल कधी होणार? मनसेचा प्रशासनाला सवाल; आंदोलन पेटलं
हातात बंदुका, आता रॅम्पवर कॅटवॉक! नक्षलवाद्यांचा भन्नाट नवा अवतार बघाच
Ramp Walk | हातात बंदुका, आता रॅम्पवर कॅटवॉक! आत्मसमर्पित महिला नक्षलवाद्यांचा भन्नाट नवा अवतार बघाच
Jalna Triple S City! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन....
Jalna Triple S City! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन; रेशीम उद्योगाला मिळणार नवी झेप
राष्ट्रवादी शरद पवारांचीच!; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान
Supriya Sule | राष्ट्रवादी शरद पवारांचीच!; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाल्या...
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश