2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश
जनगणना 2027 संदर्भात केंद्र सरकारने 40 प्रश्नांची अधिसूचना जारी केली आहे. या जनगणनेत पहिल्यांदाच जातनिहाय माहिती घेतली जाणार असून, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीशी संबंधित माहितीचाही समावेश करण्यात आला आहे. जनगणनेदरम्यान नागरिकांकडून जात, धर्म, मातृभाषा, शिक्षण, रोजगार आणि कुटुंबाशी संबंधित माहिती घेतली जाणार आहे. यासोबतच आधार क्रमांक, मतदार ओळखपत्र आणि मोबाईल क्रमांकाची माहितीही विचारली जाणार […]
जनगणना 2027 संदर्भात केंद्र सरकारने 40 प्रश्नांची अधिसूचना जारी केली आहे. या जनगणनेत पहिल्यांदाच जातनिहाय माहिती घेतली जाणार असून, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीशी संबंधित माहितीचाही समावेश करण्यात आला आहे.
जनगणनेदरम्यान नागरिकांकडून जात, धर्म, मातृभाषा, शिक्षण, रोजगार आणि कुटुंबाशी संबंधित माहिती घेतली जाणार आहे. यासोबतच आधार क्रमांक, मतदार ओळखपत्र आणि मोबाईल क्रमांकाची माहितीही विचारली जाणार आहे. भारतीय पासपोर्ट असल्यास पासपोर्ट क्रमांकाची माहिती द्यावी लागणार आहे.
विशेष म्हणजे, कोविड-19 लस कोणत्या कंपनीची घेतली आणि ती कुठे घेतली, यासंबंधीची माहितीही जनगणनेतील प्रश्नांमध्ये समाविष्ट करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे.
ही जनगणना दोन टप्प्यांत होणार आहे. लडाख, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या बर्फवृष्टीच्या भागात 1 ते 30 सप्टेंबरदरम्यान जनगणना होणार असून, उर्वरित देशात फेब्रुवारी 2027 मध्ये जनगणना प्रक्रिया पार पडणार आहे. रजिस्ट्रार जनरल आणि जनगणना आयुक्तांकडून यासंदर्भातील आदेश जारी करण्यात आला आहे.
Published on: Aug 14, 2026 01:56 PM
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी

