AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aditi Tatkare On NCP Merger : विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून तटकरेंना खलनायक का ठरवलं जातंय? आदिती तटकरेंचा थेट सवाल

Aditi Tatkare On NCP Merger : विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून तटकरेंना खलनायक का ठरवलं जातंय? आदिती तटकरेंचा थेट सवाल

| Updated on: Nov 13, 2026 | 3:15 PM
Share

एनसीपी विलीनीकरणाच्या चर्चेत तटकरेंना खलनायक ठरवण्यावर आदिती तटकरेंनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तटकरेंवरील टीकेवर त्यांनी खंत व्यक्त केली. विलीनीकरणाबाबतचा अंतिम निर्णय दोन्ही पक्षातील वरिष्ठ नेते घेतील असे आदिती तटकरेंनी स्पष्ट केले, तसेच टीकांकडे दुर्लक्ष करून काम करत राहण्याचे आवाहन केले.

एनसीपी विलीनीकरणाच्या चर्चेत सध्या राजकीय वर्तुळात मोठे वादळ निर्माण झाले आहे. याच संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आदिती तटकरे यांनी एक महत्त्वाचे विधान केले आहे. विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून तटकरेंना खलनायक का ठरवले जात आहे, असा थेट सवाल आदिती तटकरे यांनी उपस्थित केला आहे.

तटकरेंवर सुरू असलेल्या टीकेवर आदिती तटकरे यांनी आपली खंत व्यक्त केली. या संदर्भात बोलताना त्या म्हणाल्या की, विलीनीकरणाबाबतचा कोणताही निर्णय दोन्ही पक्षातील वरिष्ठ नेतेच घेतील. यावर इतकी टीका-टिप्पणी करण्याची आवश्यकता नाही.

आपल्या भावना व्यक्त करताना आदिती तटकरे यांनी वैयक्तिक पातळीवरही भाष्य केले. त्या म्हणाल्या, “एक मुलगी म्हणून मी बोलेन की मला नेहमी दुर्दैव वाटतं, कारण मी त्यांना आणि दादांना नेहमीच गेल्या अनेक वर्षांपासून सोबत बघितलं आहे.” राजकीय वर्तुळात होणाऱ्या टीका-टिप्पणीकडे फारसे लक्ष न देता, ज्या चांगल्या उद्दिष्टाने आपण काम करत आहोत, त्याच उद्दिष्टाने ते काम करत राहू, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. सद्यस्थितीत सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवर त्यांनी तटस्थ भूमिका घेतली असून, वरिष्ठ नेत्यांच्या निर्णयावर विश्वास व्यक्त केला आहे.

 

Published on: Nov 13, 2026 03:15 PM

Follow Us