Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवाना रद्द केला, नेमकं कारण काय?
पुण्यातील कॅम्प परिसरातील प्रसिद्ध बर्गर किंगवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई केली आहे. खाद्यपदार्थांशी संबंधित गंभीर त्रुटी आढळल्याने एफडीएकडून बर्गर किंगचा परवाना रद्द करण्यात आला आहे. या कारवाईमुळे अन्नसुरक्षेबाबतच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक संदेश दिला गेला आहे.
पुण्यातील कॅम्प परिसरातील प्रसिद्ध बर्गर किंगवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई केली आहे. एफडीएनं बर्गर किंगचा परवाना रद्द केला आहे. खाद्यपदार्थांच्या निर्मिती आणि साठवणुकीमध्ये गंभीर त्रुटी आढळल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे कॅम्प परिसरातील बर्गर किंग आउटलेटची एफडीएच्या अधिकाऱ्यांनी अचानक पाहणी केली. या तपासणीमध्ये अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे मोठ्या प्रमाणावर उल्लंघन झाल्याचे समोर आले. बर्गर किंगमध्ये ग्राहकांना पुरवल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांमध्ये गंभीर स्वरूपाच्या उणिवा असल्याने प्रशासनाने तात्काळ परवाना रद्द करण्याचा निर्णय घेतला.
या कारवाईमुळे पुण्यातील तसेच राज्यातील इतर खाद्यपदार्थ विक्रेत्यांना अन्नसुरक्षेचे नियम पाळण्यासंदर्भात गंभीर इशारा मिळाला आहे. एफडीएने स्पष्ट केले आहे की, ग्राहकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही. भविष्यातही अशा त्रुटी आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल.
Published on: Aug 14, 2026 06:37 PM
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवानाच रद्द केला
काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात
शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल
राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे...

