Pune Case : पुण्यातील प्रसिद्ध वैशाली, रुपाली हॉटेलवर FDA ची मोठी कारवाई; परवाने रद्द!
पुण्यातील प्रसिद्ध वैशाली आणि रुपाली या हॉटेल्सचे परवाने अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाने रद्द केले आहेत. अस्वच्छता आणि उघड्यावर अन्नपदार्थ साठवल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. परवाने पूर्ववत होईपर्यंत या हॉटेल्समधून विक्री, पार्सल आणि होम डिलिव्हरी बंद राहणार आहे. यामुळे पुणेकरांमध्ये मोठी चर्चा सुरू झाली आहे.
पुण्यातील दोन अत्यंत प्रसिद्ध हॉटेल्स, वैशाली आणि रुपाली, यांचे परवाने अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाने रद्द केले आहेत. अस्वच्छता आणि उघड्यावर अन्नपदार्थ साठवणूक केल्याच्या गंभीर आरोपांखाली एफडीएने ही कठोर कारवाई केली आहे. या कारवाईमुळे दोन्ही हॉटेल्सना मोठा धक्का बसला असून, त्यांचे नियमित ग्राहक असलेले पुणेकरही आश्चर्यचकित झाले आहेत. एफडीएने केलेल्या तपासणीमध्ये हॉटेल वैशालीला ९८ पैकी केवळ ५८ गुण मिळाले. अन्न व औषध प्रशासनाने घालून दिलेल्या स्वच्छतेच्या नियमांचे पालन या हॉटेल्समध्ये होत नसल्याचे तपासणीत उघड झाले.
परवाने पूर्ववत होईपर्यंत वैशाली आणि रुपाली या दोन्ही हॉटेल्समधून विक्री, पार्सल आणि होम डिलिव्हरी पूर्णपणे बंद राहील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. यापूर्वीही त्यांना सूचना देण्यात आल्या होत्या, मात्र त्यात सुधारणा झाली नसल्याचे एफडीएन म्हटले आहे. अनेक पुणेकर नाश्त्यासाठी किंवा खाद्यपदार्थांसाठी या हॉटेल्सबाहेर रांगेत उभे राहत असत. या कारवाईमुळे पुण्यातील खाद्यप्रेमींना धक्का बसला असून, शहरातील इतर रेस्टॉरंट्सच्या स्वच्छतेबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Published on: Nov 14, 2026 01:20 PM
पुण्यातील प्रसिद्ध वैशाली, रुपाली हॉटेलवर FDA ची मोठी कारवाई; परवाने..
विलिनीकरणाचा एक-दोन दिवसात 'द एंड' होईल, राऊतांचा दावा; नेमकं काय..
भोसरीत मतदार यादीचा घोळ? तब्बल 15 हजार मतदारांची नावे दुसरीकडे शिफ्ट,
मालाडमध्ये छठपूजेचा उत्साह! मनसे नेत्यांकडून जय्यत तयारी...

