Sanjay Raut On NCP Merger : विलिनीकरणाचा एक-दोन दिवसात ‘द एंड’ होईल, राऊतांचा दावा; असं काय म्हणाले?
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील विलिनीकरणाच्या चर्चांना पूर्णपणे फेटाळून लावले आहे. हे विलिनीकरण म्हणजे एक "दंतकथा" असून, येत्या एक-दोन दिवसांत या चर्चांचा द एंड होईल, असा दावा राऊत यांनी केला आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील विलिनीकरणाच्या चर्चांना पूर्णपणे फेटाळून लावले आहे. हे विलिनीकरण म्हणजे एक “दंतकथा” असून, येत्या एक-दोन दिवसांत या चर्चांचा द एंड होईल, असा दावा राऊत यांनी केला आहे. राऊत यांनी स्पष्ट केले की, सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यात कोणतीही बैठक झालेली नाही. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार किंवा सुप्रिया सुळे हे अमित शहा यांच्या गटासोबत जातील असे त्यांना वाटत नाही. ज्या विचारधारेतून शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्रात काम केले आहे, त्यात अमित शहा यांचा गट बसत नाही, असे राऊत यांनी म्हटले आहे.
संभ्रम निर्माण करण्याचे काम समोरच्या पक्षाकडून किंवा भाजपकडून केले जात असल्याचेही त्यांनी नमूद केले. राऊत यांच्या मते, एक गट सत्तेत राहण्यासाठी आणि दुसरा गट सत्तेत जाण्यासाठी धडपडत आहे, मात्र विलिनीकरण हा केवळ एक भ्रम आहे.
Published on: Nov 14, 2026 01:10 PM
विलिनीकरणाचा एक-दोन दिवसात 'द एंड' होईल, राऊतांचा दावा; नेमकं काय..
भोसरीत मतदार यादीचा घोळ? तब्बल 15 हजार मतदारांची नावे दुसरीकडे शिफ्ट,
मालाडमध्ये छठपूजेचा उत्साह! मनसे नेत्यांकडून जय्यत तयारी...
मुंबईनंतर पुण्यातही मफलरवाला पोस्टर; अजितदादांचा अपघात की घातपात?

