AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Supriya Sule On NCP Merger : भावासोबत पुढे जायचं होतं पण...; आता काय चर्चा करायची? चर्चांना पूर्णविराम!

Supriya Sule On NCP Merger : भावासोबत पुढे जायचं होतं पण…; आता काय चर्चा करायची? चर्चांना पूर्णविराम!

| Updated on: Nov 14, 2026 | 11:59 AM
Share

सुप्रिया सुळेंनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. "ज्या दिवशी माझा भाऊ (अजित पवार) गेला, त्याच दिवशी विलीनीकरणावर पूर्णविराम लागला," असे त्यांनी सांगितले. भावासोबत पुढे जाण्याचे ठरवले होते, पण आता तोच सोबत नसल्याने चर्चेला अर्थ नाही, असेही त्यांनी नमूद केले. अजित पवार गटाकडून कोणताही संपर्क झाला नसल्याचेही सुळे यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) विलीनीकरणासंदर्भात खासदार सुप्रिया सुळे यांनी आपली अत्यंत स्पष्ट आणि ठाम भूमिका मांडली आहे. पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की, “ज्या दिवशी माझा भाऊ (अजित पवार) गेला, त्याच दिवशी विलीनीकरणाच्या चर्चेवर पूर्णविराम लागला आहे.”

सुप्रिया सुळे यांनी या भूमिकेचा पुनरुच्चार करताना म्हटले की, “भावासोबत पुढे जायचं होतं, पण तोच आता राहिलेला नाही. मग आता काय चर्चा करायची?” सत्तेत सहभागी होण्याचा विषयच येत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या मनात, अंतकरणात आणि पक्षामध्ये विलीनीकरणाचा अध्याय त्याच दिवशी संपला, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर त्यांच्या गटाकडून विलीनीकरणाबाबत एकही विधान केले गेले नाही, असा दावाही त्यांनी केला.

अजित पवार गटाकडून आलेल्या कोणत्याही निवेदनावर आपण प्रतिक्रिया दिली नसल्याचेही सुळे यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, “माझा भाऊ गेलेला आहे, आमच्या घरातला कर्ता पुरुष गेलेला आहे. जे नातं पुढे एकत्र जायचं ठरलं होतं, ते माझ्या भावाबरोबर होतं. माझा भाऊच नाही राहिला, काय आता चर्चा करायची?” अजित पवार गटाकडून आपल्याला कोणताही फोन, व्हॉट्सॲप, एसएमएस, पत्र किंवा ईमेल आला नसल्याचेही सुप्रिया सुळे यांनी या वेळी स्पष्ट केले.

Published on: Nov 14, 2026 11:59 AM

Follow Us