Rahul Gandhi | राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे परराष्ट्र धोरण नाही म्हणत मोदींवर निशाणा
राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींची मिमिक्री करत गळाभेट घेणं म्हणजे परराष्ट्र धोरण नाही अशी टीका केली. या व्हायरल व्हिडिओनंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींनी माफी मागावी अशी मागणी केली, तर संजय राऊत आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनीही यावर प्रतिक्रिया दिल्या.
राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परराष्ट्र धोरणावर मिमिक्री करत जोरदार टीका केली आहे. गळाभेट घेणं म्हणजे परराष्ट्र धोरण नाही असे म्हणत राहुल गांधींनी मोदींच्या परराष्ट्र धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
या व्हिडिओमुळे राजकीय वर्तुळात मोठे वादळ निर्माण झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींच्या कृतीची तीव्र शब्दांत निंदा केली असून, त्यांनी पंतप्रधान मोदींची माफी मागावी अशी मागणी केली आहे. फडणवीस यांनी राहुल गांधींच्या वर्तनाला छछोरगिरी असे संबोधले आणि गल्लीतले नेतेही अशा प्रकारे वागत नाहीत असे म्हटले.
दुसरीकडे, शिवसेना नेते संजय राऊत यांनी राहुल गांधींच्या टीकेचे समर्थन करत पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. मिठ्या मारणं, जबरदस्तीच्या मिठ्या मारणं याला परराष्ट्र धोरण म्हणत नाहीत. यामुळे देशाच्या पंतप्रधानांची छी-थू झाली, असे राऊत म्हणाले. यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, राहुल गांधींकडे आता व्यंग करण्याशिवाय काही उरले नाही आणि व्यंग करून माणसे मोठी होत नाहीत. या घटनेमुळे देशाच्या राजकारणात एक नवा वाद निर्माण झाला आहे.
Published on: Aug 14, 2026 05:45 PM
राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे...
शिवसेना तालुकाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी? ऑडिओ व्हायरल
केळेवाडी ते चर्नी रोड पूल कधी होणार? मनसेचा प्रशासनाला सवाल
हातात बंदुका, आता रॅम्पवर कॅटवॉक! नक्षलवाद्यांचा भन्नाट नवा अवतार बघाच

