नरेंद्र मोदी
नरेंद्र मोदी भारताचे (Prime Minister of India) विद्यमान पंतप्रधान आहेत. मे 2024 पासून मोदी देशाचे पंतप्रधान म्हणून काम पाहत आहेत. यापूर्वी ते गुजरातचे मुख्यमंत्री होते. 2001 ते 2014पर्यंत मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते. मोदी उत्तर प्रदेशातील वाराणासी लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे भाजपचे मोठे नेते आहेत. ते संघाचेही स्वयंसेवक होते. 17 सप्टेंबर 1950 मध्ये मोदींचा गुजरातच्या वडनगरमध्ये जन्म झाला होता. मोदी यांच्या नेतृत्वात 2014मध्ये लोकसभेची निवडणूक लढवली गेली. या निवडणुकीत भाजपने मोठं यश मिळवलं. त्यामुळे मोदी पंतप्रधान झाले. मोदींच्या लाटेमुळेच 2014मध्ये भाजपला देशातील अनेक राज्यात विधानसभा निवडणुकीत विजय मिळाला. 2019ची लोकसभा निवडणूकही मोदींच्याच नेतृत्वात लढवण्यात आली. यावेळीही भाजपला घवघवीत यश मिळालं. मोदींनी त्यांच्या कार्यकाळात अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. धाडसी निर्णयामुळे त्यांची लोकप्रियता अधिक वाढली. नोटाबंदी, जीएसटी लागू करणे, पाकिस्तानात सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईक, जम्मू-काश्मीरमधून 370 कलम हटवणे आणि तीन तलाकच्या कायद्याबाबतचे निर्णय त्यांनी घेतले.
Expalined : मैत्री दाखवायला पण मोदी-पुतिन यांची सीक्रेट स्ट्रॅटेजी काय? रशियाला जे हव आहे, ती भारताची प्राथमिकताच नाही
Putin India Visit : युक्रेन युद्धानंतर पुतिन यांचा हा पहिला भारत दौरा आहे. हा दौरा म्हणजे भारत-रशिया संबंधांची अग्निपरीक्षा आहे. या दौऱ्याचे वेगवेगळे पैलू, प्राथमिकता, दृष्टीकोन आहे. रशियाला जे हवं आहे, ती सध्याच्या घडीला भारताची पहिली प्राथमिकता नाहीय. समजून घेऊया पुतिन यांच्या भारत भेटीमागचा उद्देश.
- Dinananth Parab
- Updated on: Dec 5, 2025
- 10:01 am
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले अत्यंत मोठे गिफ्ट, थेट विमानतळावरच..
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन भारताच्या दाैऱ्यावर आहेत. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुतिन यांचे स्वागत केले. पुतिन यांच्या भारत दाैऱ्याकडे संपूर्ण जगाच्या नजरा आहेत. विमानतळावरील स्वागताचे काही फोटोही व्हायरल होत आहेत.
- शितल मुंडे
- Updated on: Dec 5, 2025
- 7:57 am
Modi Meets BJP MP : जनसंपर्क ठेवा… महाराष्ट्रातील भाजप खासदारांनी मोदींची घेतली भेट, पंतप्रधानांनी काय दिल्या सूचना?
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रातील भाजप खासदारांना जनसंपर्क वाढवण्यासोबतच सरकारी योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचे निर्देश दिले आहेत. लोकांच्या समस्या सोडवणे, सांस्कृतिक कार्यक्रमांवर भर देणे आणि संसदेत पूर्णवेळ उपस्थित राहून कामकाजात सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी केले.
- Harshada Shinkar
- Updated on: Dec 4, 2025
- 2:56 pm
Petrol-Diesel Price: मोठी बातमी! पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार? पुतीन यांच्या दौऱ्यादरम्यान मोठी अपडेट, खिश्यात पैसा खुळखुळणार?
Petrol-Diesel Price Reduce: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे भारत दौऱ्यावर आहेत. त्यापूर्वीच रशियन लष्करी तळ भारताला वापरण्याला मंजुरी मिळाली आहे. तर एका वृत्तानुसार, कच्चा तेलाच्या Crude Oil किंमतीत मोठी सवलत मिळू शकते. त्यामुळे पेट्रोल-डिझेलची स्वस्ताई येऊ शकते.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Dec 4, 2025
- 1:08 pm
PM Modi : नैसर्गिक शेती हे भारताचे भविष्य, पंतप्रधान नरेंद्र मोदींची लिंक्डइनवर खास पोस्ट
PM Modi and Natural Farming : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लिंक्डइनवर एक पोस्ट करत नैसर्गिक शेतीबद्दल आपले विचार माडंले आहेत. "दोन आठवड्यांपूर्वी मी कोइम्बतूर येथे झालेल्या नैसर्गिक शेतीवरील शिखर परिषदेत सहभागी होतो, यामुळे मी प्रभावित झाले असं पंतप्रधानांनी म्हटले आहे.
- बापू गायकवाड
- Updated on: Dec 3, 2025
- 6:32 pm
Explainer: रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन भारत दौऱ्यावर;अमेरिकेला थेट संदेश काय? या भेटीचे फलीत काय?
Vladimir Putin visit to India: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन भारत दौऱ्यावर आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाशी संबंध तोडण्यासाठी भारतावर ना ना प्रकारचा दबाव टाकला. आता थेट पुतीनच भारत भेटीवर असल्याने अमेरिकेला थेट संदेश गेला आहे. काय आहे या दौऱ्याचे फलीत?
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Dec 3, 2025
- 10:16 am
PM Modi : दितवाह चक्रीवादळामुळे मोठे नुकसान, PM मोदींचा श्रीलंकेच्या राष्ट्रपतींना फोन, मदतीचे दिले आश्वासन
Cyclone Ditwah : आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुरा कुमार दिसानायके यांच्याशी फोनवरून संवाद साधत दितवाह चक्रीवादळात जीवित आणि वित्तहानीबद्दल शोक व्यक्त केला. या कठीण काळात भारत श्रीलंकेच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे असं मोदींनी म्हटले.
- बापू गायकवाड
- Updated on: Dec 1, 2025
- 10:02 pm
Parliament Winter Session : नुसत्या घोषणा देऊ नका, त्यापेक्षा तुम्ही.., अधिवेशन सुरू होण्याआधी PM मोदींचा विरोधकांना मोलाचा सल्ला
संसदेचं हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. कामकाज सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, या अधिवेशनात संसद देशाबद्दल काय विचार करत आहे आणि देशासाठी काय करणार आहे यावर लक्ष केंद्रीत केलं पाहिजे. विरोधकांनी पराभवाच्या निराशेवर मात करावी, असा सल्ला त्यांनी दिला.
- स्वाती वेमूल
- Updated on: Dec 1, 2025
- 11:40 am
भारत-रशियात सर्वात मोठा करार, डोनाल्ड ट्रम्प यांना जबर झटका, अमेरिकाला सडेतोड उत्तर!
भारताने रशियासोबतचा आपला व्यापार कमी करावा यासाठी अमेरिकेकडून दबाव टाकला जात आहे. असे असतानाच आता ट्रम्प यांना धक्का देणारा मोठा निर्णय रशिया आणि भारताने घेतला आहे.
- Prajwal Dhage
- Updated on: Nov 29, 2025
- 5:04 pm
टी20 वर्ल्डकप विजेत्या वुमन्स ब्लाइंड क्रिकेट संघासोबत पंतप्रधान मोदींची ‘मन की बात’
वुमन्स ब्लाइंड क्रिकेट टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारताने जेतेपद पटकावलं. यानंतर सर्वच स्तरातून संघावर कौतुकाचा वर्षाव सुरु झाला. या जेतेपदानंतर भारतीय महिला संघाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी संपूर्ण संघाला आपल्या हाताने मिठाई भरवली.
- Rakesh Thakur
- Updated on: Nov 27, 2025
- 8:47 pm
Prakash Ambedkar: ७५ वर्षांनी पुन्हा भाजप-RSS यांनी तेच…, प्रकाश आंबेडकरांचं संविधानाबाबत मोठे वक्तव्य
Prakash Ambedkar on RSS-BJP: अयोध्येत काल राम मंदिरावर धर्मध्वज फडकवण्यात आला. तर आज संविधान दिवस साजरा होत आहे. यावरून वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपवर निशाणा साधला आहे.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Nov 26, 2025
- 2:26 pm
Maharashtra News LIVE : मालवणमध्ये पैसे वाटप होत असल्याची तक्रार, निलेश राणेंची धाड
Maharashtra Breaking news : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार याची अमेडिया कंपनी अडचणीत सापडली असून गंभीर आरोप केली जात आहेत. पुण्यातील जमीन घोटाळा प्रकरणात काही आरोप केली जात आहेत. त्यामध्ये मुद्रांक शुल्काबाबत कंपनीने वेळ मागून घेतला आहे.
- शितल मुंडे
- Updated on: Nov 27, 2025
- 8:27 am
PM Modi : लोकशाहीची जननी भारत, गुलामीच्या मानसिकतेतून भारताला मुक्त करणारच… PM मोदींचा निर्धार
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राम मंदिराच्या प्रांगणात भारताच्या समृद्ध वारशावर गर्व करण्यावर आणि गुलामीच्या मानसिकतेतून पूर्णपणे मुक्त होण्यावर भर दिला. 1835 मध्ये मॅकॉलेने रुजवलेलेल्या मानसिक गुलामगिरीतून देशाला 2035 पर्यंत बाहेर काढण्याचे आवाहन त्यांनी केले. भारत लोकशाहीची जननी असल्याचे सांगत, त्यांनी स्वदेशी अस्मिता आणि आत्मविश्वासाच्या पुनरुत्थानाचे महत्त्व अधोरेखित केले.
- Harshada Shinkar
- Updated on: Nov 25, 2025
- 1:54 pm
PM Modi : अयोध्येतील राम मंदिरावरील धर्मध्वज हा केवळ ध्वज नाही तर… पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केलं महत्त्व
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अयोध्येतील धर्मध्वज केवळ ध्वज नसून भारतीय सभ्यतेच्या पुनरुज्जीवनाचे प्रतीक असल्याचे प्रतिपादन केले आहे. ५०० वर्षांच्या अथक प्रयत्नांची आणि श्रद्धेची परिणती म्हणून हा ध्वज रामराज्याची कीर्ती दर्शवतो. हा संघर्ष, यश आणि स्वप्नांच्या पूर्ततेचा साक्षीदार असून तो प्रभू रामाच्या आदर्शांचा उद्घोष करेल.
- Harshada Shinkar
- Updated on: Nov 25, 2025
- 1:40 pm
Narendra Modi: भारतात नवीन शिक्षण पद्धत लागू होणार? मेकॉलेवर टीका करताना पंतप्रधान मोदी यांचे मोठे संकेत
New Education System Implemented?: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या मंदिरावर धर्मध्वजाचे आरोहण झाले. यावेळी त्यांनी भाषणातून शिक्षण पद्धतीतील मोठ्या बदलाचे संकेत दिले. काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Nov 25, 2025
- 1:32 pm