Beed | बीडमध्ये घरगुती गॅस वापरणाऱ्या हॉटेल्सवर छापेमारी; 28 सिलेंडर जप्त
बीड जिल्ह्यात घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर करणाऱ्या हॉटेल्सवर महसूल प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. जिल्ह्यात विविध ठिकाणी छापेमारी करून घरगुती गॅस सिलेंडरचा गैरवापर होत असल्याच्या तक्रारींची तपासणी करण्यात आली. यासाठी जिल्हाभरात तब्बल 19 पथकांची नियुक्ती करण्यात आली होती.
बीड जिल्ह्यात घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर करणाऱ्या हॉटेल्सवर महसूल प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. जिल्ह्यात विविध ठिकाणी छापेमारी करून घरगुती गॅस सिलेंडरचा गैरवापर होत असल्याच्या तक्रारींची तपासणी करण्यात आली. यासाठी जिल्हाभरात तब्बल 19 पथकांची नियुक्ती करण्यात आली होती. या पथकांनी वेगवेगळ्या भागांमध्ये 203 ठिकाणी छापेमारी करत तपासणी केली. या कारवाईदरम्यान 28 घरगुती गॅस सिलेंडर जप्त करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. प्रशासनाच्या माहितीनुसार, बीड जिल्ह्यात सध्या गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांना घरगुती गॅसचा पुरवठा सुरळीत सुरू आहे. घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर रोखण्यासाठी अशी कारवाई पुढेही सुरू ठेवण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
लाडकी बहिणींची चिंताच मिटली, शिंदेंनी दिली Good News, योजनेबाबत मोठी
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरणी आणखी एकाची धरपकड, अटकेचं का
धक्कादायक! सहा महिन्यात 34 आदिवासी मुली बेपत्ता, भाजप नेत्याचे खळबळजनक
अक्षय तृतीयानिमित्त सिद्धिविनायकमध्ये बाप्पाच्या दागिन्यांच्या लिलाव,

