Hingoli | हिंगोलीत गॅस तुटवडा; व्यावसायिक सिलेंडर बंद, स्वीटमार्ट आणि हॉटेल्सवर परिणाम
देशात युद्ध सुरू असले तरी त्याचा फटका महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याला जाणवत आहे. हिंगोली जिल्ह्यात गॅसचा तुटवडा जाणवत असून, व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा थांबवण्यात आला आहे. पुरवठा अधिकाऱ्यांच्या माहितीप्रमाणे, उपलब्ध गॅस फक्त घरगुती वापरासाठी राखला जात आहे. हिंगोली शहरातील सर्वात मोठ्या प्रभुदास स्वीटमार्टमध्ये तळलेले पदार्थ कमी करण्यात आले आहेत
देशात युद्ध सुरू असले तरी त्याचा फटका महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याला जाणवत आहे. हिंगोली जिल्ह्यात गॅसचा तुटवडा जाणवत असून, व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा थांबवण्यात आला आहे. पुरवठा अधिकाऱ्यांच्या माहितीप्रमाणे, उपलब्ध गॅस फक्त घरगुती वापरासाठी राखला जात आहे. हिंगोली शहरातील सर्वात मोठ्या प्रभुदास स्वीटमार्टमध्ये तळलेले पदार्थ कमी करण्यात आले आहेत आणि आता बिस्कीट आणि इतर म्यानुफॅक्चर केलेल्या पदार्थांवर जोर दिला जात आहे. स्वीटमार्टचे मालक सांगतात की, जर गॅस सिलेंडर लवकर उपलब्ध झाले नाही तर उत्पादन अजून कमी करावे लागेल. मागील दोन दिवसापासून व्यावसायिक सिलेंडर बंद असल्यामुळे दुकानदार, हॉटेल्स आणि स्वीटमार्ट यांना मोठा फटका बसला आहे. तरीही हॉटेल संचालक काही पर्यायी उपाययोजना करत आहेत, मात्र काही दिवस सिलेंडर मिळण्यास विलंब होण्याची शक्यता आहे.
Published on: Mar 13, 2026 02:53 PM
काय ठरलं, CJP पुन्हा जंतर-मंतरवर उतरणार? आंदोलकांवरील...
16.96 लाख शेतकऱ्यांची यादी तयार; बँकांना सरकारचे थेट आदेश
84% पेरणी पूर्ण; खताचा तुटवडा नाही! कृषिमंत्र्यांची मोठी गुड न्यूज
सगळीकडे पाणीच पाणी! हजारो क्युसेकने विसर्ग सुरु, महाराष्ट्रातील...

