AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut | मिठी नदीच्या नाल्यातून गॅस निर्मितीचा प्रकल्प उभारा, उद्घाटनाला मोदींना बोलवा; संजय राऊत यांनी इंधन टंचाईवरून डिवचले

Sanjay Raut | मिठी नदीच्या नाल्यातून गॅस निर्मितीचा प्रकल्प उभारा, उद्घाटनाला मोदींना बोलवा; संजय राऊत यांनी इंधन टंचाईवरून डिवचले

| Updated on: Mar 11, 2026 | 11:18 AM
Share

पश्चिम आशियातील इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यात वाढत चाललेल्या संघर्षाचा परिणाम आता महाराष्ट्रातही दिसू लागला आहे. ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ बंद झाल्यामुळे जागतिक स्तरावर इंधन पुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात ऑटो एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माण झाला असून काही उद्योगांवर त्याचा परिणाम होत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे.

पश्चिम आशियातील इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यात वाढत चाललेल्या संघर्षाचा परिणाम आता महाराष्ट्रातही दिसू लागला आहे. ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ बंद झाल्यामुळे जागतिक स्तरावर इंधन पुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात ऑटो एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माण झाला असून काही उद्योगांवर त्याचा परिणाम होत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. त्यांच्या मते, इराण-अमेरिका तणावामुळे सातारा, सांगली आणि कोल्हापूरमधील इंजिनिअरिंग उद्योग तसेच छत्रपती संभाजीनगर आणि चाकणमधील वाहन उद्योग अडचणीत आले आहेत. या उद्योगांना लागणाऱ्या गॅसचा पुरवठा कमी झाल्याने उत्पादनावर परिणाम होत असल्याचे त्यांनी सांगितले. इंधन टंचाईच्या मुद्द्यावर बोलताना राऊत यांनी पंतप्रधान मोदींच्या जुन्या विधानाचा उल्लेख करत टीका केली. नाल्यातील गॅसचा वापर करून चुली पेटवता येतात, असे विधान मोदींनी पूर्वी केले होते, असा दाखला देत त्यांनी टोला लगावला आहे. राऊत म्हणाले की, मुंबईतील मिठी नदीच्या किनारी असा प्रकल्प सुरू करता येईल. नाल्यातून गॅस निर्मितीच्या पहिल्या प्रकल्पाचे उद्घाटन मुंबईतील मिठी नदीच्या किनाऱ्यावर करावे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महापौरांनी यासाठी मोदींना निमंत्रित करावे. या प्रकल्पासाठी लागणारे पाईप किंवा इतर साहित्याची व्यवस्था शिवसेना करायला तयार आहे. हा प्रयोग यशस्वी झाला तर यमुना नदीतही असे प्रकल्प राबवता येतील आणि देशातील इंधन टंचाई मोदींच्या कृपेने दूर होईल, महाराष्ट्रात सध्या इंधनाची स्थिती अत्यंत गंभीर आहे. जर कोणाला या प्रकल्पासाठी कर्ज हवे असेल, तर देवेंद्र फडणवीस यांनी ते तातडीने मंजूर करावे. प्रकल्प मोठा असेल तर मी स्वतः मोदींना उद्घाटनासाठी बोलाविन,” असा टोलाही राऊत यांनी लगावला.

Published on: Mar 11, 2026 11:18 AM
Follow Us