AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! अखेर अभिजीत दीपके विदेशी फंडींगबाबत व्यक्त, थेट अमित शाहांचं नाव घेत हल्ला

मोठी बातमी! अखेर अभिजीत दीपके विदेशी फंडींगबाबत व्यक्त, थेट अमित शाहांचं नाव घेत हल्ला

| Updated on: Jul 30, 2026 | 12:34 PM
Share

सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी नुकत्याच माध्यमांशी संवाद साधताना विविध मुद्द्यांवर भूमिका मांडली. यावेळी त्यांनी सोशल मीडियावरील ट्रोलिंगपासून ते कथित विदेशी फंडिंगच्या आरोपांपर्यंत अनेक विषयांवर भाष्य केले. त्यांच्या वक्तव्याची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

नीट पेपरफुटी प्रकरणानंतर सीजेपीच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांसाठी मोठे आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाची देशभरात चर्चा झाली होती. याच पार्श्वभूमीवर अभिजीत दीपके यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावरही थेट निशाणा साधला.

माध्यमांशी बोलताना अभिजीत दीपके म्हणाले, “अमित शाह यांनी राजीनामा दिला पाहिजे. कॉकरोच जनता पार्टीला (CJP) बाहेरून फंडिंग येतंय तर अमित शाह असताना हे शक्य कसं झालं. अमित शाह असताना कोणाला विदेशी फंडींग येणं हे त्यांचं अपयश आहे. जर आम्हाला बाहेरून फंडिंग येतंय. तर तुम्ही चाणक्य कसले. जर बाहेरून फंडिंग येतंय आणि बाहेरून चालवलं जात असेल तर तुम्ही राजीनामा दिला पाहिजे. 20 तारखेला विद्यार्थ्यांचं रक्त सांडलं. दिल्ली पोलिसांच्या माध्यमातून. ते अमित शाह यांच्या ऑर्डर शिवाय हे शक्य नाही.”

Published on: Jul 30, 2026 12:24 PM

Follow Us