AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाण्यात प्रदीप पुरणेकर प्रकरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस आयुक्तांच्या भेटीला

ठाण्यात प्रदीप पुरणेकर प्रकरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस आयुक्तांच्या भेटीला

| Updated on: Oct 29, 2026 | 5:14 PM
Share

ठाण्यातील प्रदीप पुरणेकर हत्याप्रकरणी ठोस कारवाईच्या मागणीसाठी आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी पुरणेकर कुटुंबियांची भेट घेऊन पोलीस आयुक्तांची भेट घेतली. मीनाक्षी शिंदे आणि राजेश शिंदे यांच्या अटकेची मागणी करत ठाकरे गटाने राजकीय दबावाचा आरोप केला. ठाणे पोलीस मुख्यालयाबाहेर शिवसैनिकांनी तीव्र निदर्शने केली.

ठाण्यातील प्रदीप पुरणेकर हत्याप्रकरणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांनी आज ठाण्यात पोलीस आयुक्तांची भेट घेतली. या भेटीपूर्वी त्यांनी पुरणेकर कुटुंबियांचे सांत्वन केले. गेल्या महिनाभरात या प्रकरणी ठोस तपास न झाल्याने आणि मीनाक्षी शिंदे व राजेश शिंदे यांना अटक न झाल्याने ठाकरे गटाने पोलिसांवर राजकीय दबाव असल्याचा आरोप केला आहे. ठाणे पोलीस मुख्यालयाबाहेर मोठ्या संख्येने ठाकरे गटाचे शिवसैनिक जमले होते. त्यांनी शिंदे गट आणि पोलिसांविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आपला संताप व्यक्त केला. कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

मीनाक्षी शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सुपूर्द केला असला तरी, त्यांच्या आणि राजेश शिंदे यांच्या चौकशीनंतरही अटकेची कारवाई न झाल्याने शिवसैनिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. राम पुरणेकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या प्रकरणी तातडीने कारवाई करण्याची मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे.

Published on: Oct 29, 2026 05:14 PM

Follow Us