मोठी बातमी! मीनाक्षी शिंदे यांचा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा; ठाण्याच्या राजकारणात काय काय घडतंय?
मीनाक्षी शिंदे यांनी ठाणे जिल्हा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सुपूर्द केला आहे. नेतृत्वाची बदनामी टाळण्यासाठी आणि पक्षाची प्रतिष्ठा जपण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे त्यांनी म्हटले आहे. प्रदीप पुर्णेकर हत्या प्रकरणातील चौकशीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा राजीनामा दिला आहे.
ठाण्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. मीनाक्षी शिंदे यांनी ठाणे जिल्हा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सुपूर्द केला आहे. नेतृत्वाची बदनामी होऊ नये आणि पक्षाची प्रतिष्ठा जपण्यासाठी आपण राजीनामा देत असल्याचे मीनाक्षी शिंदे यांनी पत्रात नमूद केले आहे. हा राजीनामा नाराजीतून दिलेला नसून, नेतृत्वाचा सन्मान राखण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. प्रदीप पुर्णेकर हत्याकांडात त्यांच्या नावाचा उल्लेख झाल्याने त्यांची चौकशी करण्यात आली होती. याच चौकशीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा तडकाफडकी निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.
या प्रकरणावरून सध्या ठाण्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आदित्य ठाकरे, माजी खासदार राजन विचारे आणि मनसेचे नेते अविनाश जाधव यांनीही या प्रकरणी प्रशासनाकडे योग्य कारवाईची मागणी केली आहे. मीनाक्षी शिंदे यांच्या राजीनाम्याने ठाण्याच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
Published on: Oct 29, 2026 04:27 PM
मोठी बातमी! मीनाक्षी शिंदे यांचा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा;
ठाण्यात शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन! ठाकरे गटाला प्रत्युत्तर, राजकारण...
नागपूर पदवीधरचा निकाल कराळे मास्तरांमुळे फिरला? 25 हजार मतांनी...
भाजपमध्ये पक्षप्रवेशाची ऑफर आली तर...कराळे मास्तरांनी थेट सांगून टाकलं

